Wednesday, December 30, 2015

नमस्कार ..!
आज थर्टी फर्स्ट डिसेंबर ... ! संध्याकाळची पार्टी  कशी साजरी करायची  याचे प्लान गेल्या  महिना-दोन महिना अगोदर आखले गेले  असतील ...मज्जा करायची ...वर्ष सरले याचा आनंद घ्यायचा ..! थर्टी फर्स्ट आता संपूर्ण जगभर एक सार्वभौम "मजा करण्याचा " सण म्हणून एक वेगळं विकृत रूप घेऊ लागला आहे. मला 'थर्टी फर्स्ट' साजरा करायचा कि नाही या वादात नाही जायचे ...हे आपलं नवीन वर्ष आहे कि नाही याही वादात नाही पडायचे ...माझ्या सर्व  तमाम चाहते , रसिक प्रेक्षक , मित्रमंडळी , विद्यार्थी , वाचक , हितचिंतक या सर्वाना एवढचं सांगायचआहे ..." भूतकाळ साजरा करताना भविष्यकाळ खराब होणार नाही याचे भान ठेवा" ..! आनंद जरूर घ्या पण तो कुठेही विकृत होणार नाही याचे भान ठेवा आणि आपल्या या आनंदाचा कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या . थर्टी फर्स्ट साजरा करायला गेलात तर शक्यतो रात्री मद्यपान करून गाडी चालविणे टाळा..! नवीन वर्ष येतंय ...त्यामध्ये आपल्या आयुष्यातला आनंद सतत वाढत जावो ...त्यासाठी थोडसं भान ठेवा ..काळजी घ्या ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन  म्हात्रे. 

Sunday, December 27, 2015

"याल तर हसाल" देवळी , पेण येथे झालेला कार्यक्रम ..! शो क्रमांक - ५४२

नमस्कार ..!
पेण तालुक्यातील देवळी नावाच्या एक छोट्याशा गावामध्ये " याल तर हसाल " चा कार्यक्रम दत्तजयंती निमित्त आयोजित केला होता . रसिक प्रेक्षकांची एवढी गर्दी झाली होती कि बसायला कुठेच जागा नव्हती. ३८ वर्षे सातत्याने चाललेल्या देवळी गावच्या दत्तजयंती उत्सवात प्रथमच ' याल तर हसाल ' चा कार्यक्रम होता.  तरुणाईने हट्टाने हा कार्यक्रम आयोजित केला होता ...आणि याल तर हसाल ने रसिकांना प्रचंड हसवत एवढ्या थंडीत सुद्धा हास्याची उब जागविली. आयोजक आणि  देवळी ग्रामस्थ या सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Friday, December 25, 2015

चार्ली ...तू हवा होतास ..!!.चार्ली चाप्लिन च्या पुण्यतिथी च्या निमित्ताने ..

" Any fool can play a tragedy, but comedy is damn serious business" कुणीतरी म्हटलेलं वाक्य सहज वाचनात आलं आणि पटलं सुद्धा ...! लोकांना सास्वीने हे काय सोप्पं काम नाही .. आणि एक शतकापूर्वी हे काम एक अवलिया अगदी सहज करून गेला. आजही त्याच फक्त चेहरा आठवला कि मूर्तिमंत हास्य आणि त्यामागे अलगद लपलेलं कारुण्य याची मूर्तिमंत छबी डोळ्यासमोर उभी राहते ..!
         चार्ली चाप्लिन... ! या एका सध्या दिसणाऱ्या माणसाने संपूर्ण जगाला पोट दिखेपर्यंत हसवलं ...आणि हसस्त हसता रडायलाही शिकवलं ..! साधाभोळा . निरागस , बावळट तरीही हवा हवासा वाटणारा , कमालीचा बोलका चेहरा , प्रचंड चपळ देहबोली वापरणारा आणि आपल्या  उत्कृष्ट अभिनयाने अंत:करणात सहज प्रवेश करणारा एक अवलिया कलाकार ..! संपूर्ण जगतावर हास्याचे अधिराज्य प्रस्थापित करणारा एक महान चित्रपट, निर्माता , दिग्दर्शक , लेखक आणि कलाकार ..म्हणजेच शंभर वर्षानंतर सुद्धा अबालवृद्धांचा लाडका अभिनेता ...चार्ली चाप्लिन ..! अत्यंत कमी साधन सामग्री , आताच्या तुलनेत खूप कमी विकसित असलेले चित्रपट तंत्रज्ञान आणि असे असताना सुद्धा  त्याने ज्या अजरामर चित्रपट कलाकृती संपूर्ण जगाला दिल्या ...तो चित्रपट सृष्टीचा अनमोल ठेवा आहे ...!
               कोणत्याही अभिव्यक्ती साठी हास्य रासास्ची निवड करणे काही सोपी गोष्ट नाही. तारेवरची कसरत असते ती ...विनोद थोदासास जरी चाकोरीबाहेर गेला ..तर तो वात्रटपणा , चावटपणा, आगाउपणा , गावंढळपणा , मूर्खपणा अशी अनेक बिरूद त्याला सहज चिकटतात आणि त्यामधून काही सामाजिक संदेश देणे तर ते त्याहूनही कठीण..! परंतु हे आव्हान त्याने सहज पेलले. सर्व जगतातातील लहानथोरांना मग ते कोणत्याही देशातील असो , जाती धर्मातील असो , कोणत्याही वयोगटातील असो सर्वाना आपल्या अभिनयाने निखळ आनंद वाटणारा आणि सर्वाना पटणारा एक 'univarsal' विनोद निर्माण करणारा अनभिषिक्त सम्राट चार्ली ..! एका शतकानंतर सुद्धा संपूर्ण जागतिक चित्रपट सृष्टीला ज्याचा विसर पडत नाही ..यातच सर्व काही आले...!
              चार्ली म्झान्जे जगातील सर्व हास्य्कालाकारांसाठीच नव्हे तर चित्रपट इर्मता ,दिग्दर्शक , आणि कलाकारांसाठी सुद्धा एक जागतिक महाविद्यालय ..! १९१४ ते १९६७ या कालावधीत तो संपूर्ण जगातील चित्रपटसृष्टीचा एक 'Cinematic IDOL' होता. १९१० ते १९२० या दशकामध्ये तर त्याला " The most famous personality on this PLANET " म्हणून त्याच्याकडे त्यावेळी  पहिले जात होते. ज्यावेळी 'ऑस्कर ' सुरु झाले नव्हते त्यावेळी लेखन , दिग्दर्शन, निर्माता आणि कलाकार म्हणू सर्व ' Academy Awards' एकाच वेळी जिंकणारा जगातील तो एकमेव कलाकार आहे . आपल्या सास्म्पूर्ण कारकिर्दीत ८० च्या वर चित्रपट देणारा हा महान अवलिया संपूर्ण जगासाठी एक विनोदाचा अनमोल खजाना ठेवून गेला आहे .
               आज संपूर्ण जग दहशतवादाने ग्रासले आहे. धर्मांधता, देशांचे सीमावाद , त्यामधून होणारी युद्धे , स्थलांतर करणारे लोक आणि त्यावरील अत्याचार, मध्येच अनेक देशात उद्भवणारी यादवी युद्धे , प्रचंड भ्रष्टाचार, बलात्कार , खून , मारामाऱ्या , हत्याकांडे . या बरोबरच यांत्रीकतेमुळे हरवलेली मानवता , तुटणारी कुटुंबव्यवस्था ,ऱ्हास होणारा जगभरातील निसर्ग ,कोसळणारी समाजव्यवस्था , या मुळे संपूर्ण जग प्रचंड तणावाखाली जगत आहे. 'जिवन' सर्व बाजूनी चिणले जात आहे. हजारो माणसे प्रचंड यंत्रांमुळे चीर्दाली जात आहेत, अपघात, अतिरेक्यांचे हल्ले, बॉम्बस्फोट , घातपात, दंगली , भावनिक संघर्ष यामुळे जीवन प्रचंड अस्थिर झाले आहे. ' शाश्वत ' असे काही उरले नाही. 
             या संपूर्ण जगाला दुख:च्या मरणप्राय वेढ्यातून सोडवायचे असेल , त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचे असेल , हे दु:ख त्यांना विसारायचे असेल तर अशा अवलिअयचि गरज प्रकर्षाने जाणवते. ' मनाचिया घावावर ..मनाची फुंकर ' घालणारे कलाकार हवे आहेत. ' संवेदनशीलता ' जपणारे आणि संपूर्ण विश्वाला पुन्हा एकदा निरागस हसविणारे कलाकारांची हि दुनिया वाट पाहत आहे....आणि अशावेळी सहजच वाटून जातं...आज चार्ली असायला हवा होता ...!
              आज त्याच्या भिव्याक्तीला लाखो पंख फुटले असते ...आपल्या मूक अभिनयाने, शंभर वर्षापूर्वी त्याने ज्या अजरामर कलाकृती दिल्या ...आज अत्यंत प्रगत तंत्रज्ञान, धुळीचा कान सुद्धा टिपणारे प्रगत कॅमेरा तंत्रज्ञान , सर्वच क्षेत्रात होणारी तांत्रिक प्रगती यामुळे त्याच्या कल्पनाशक्तीला एक वेगळीच धार आली असती, त्याची लेखणी जगातील सर्व अन्याय , अत्याचारावर तर्ल्वारीसारखी चालली असती,, त्याचा चेहरा जगातील सर्वसामन्यांच्या संवेदना सहज अभिव्यक्त करू शकला असता, आपल्या चित्रपटांनी आजही तो सर्व प्रश्नांना, दु:खान , संकटाना वाचा फोडणारा एक क्रांतिकारक ठरला असता...!
              भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची , ढोंगी  बुवा बाबांची , धर्माच्या ठेकेदारांची , बहिरे झालेल्या राजकारण्यांची आपल्या अभिव्यक्तीने त्याने भंबेरी उडवून दिली असती . धर्म, राजकारण, दहशतवाद , गुंडगिरी, भ्रष्टाचार , यांचे संपूर्णपणे निर्दालन करून देशभक्ती , प्रेम, संस्कृती, सद्भाव निर्माण करणारा एक सर्व्सास्न्मान्य नायक त्याने जन्माला घातला असता, आणि हे करताना लोकांना मनमुराद हसवायला तो अजिबात विसरला नसता ...त्याला हे अचूक ठाऊक होतं...कि हास्याने जनतेच्या मनाची कवाडे उघडतात आणि त्या उघडलेल्या मनामध्ये हे सद्गुणाची पेरणी सहज होऊ शकते.चार्ली ...तू आम्हा सर्व विनोद्विरांचा आद्यपुरुष आहेस ...तुझ्याकडून प्रेरणा घेऊन, तुझी 'स्टाईल'  जगभर कोणी करून अनेकांनी आपली कारकीर्द घडविली. परंतु ते तारे होते ...या ताऱ्याना प्रकाश देणारा तू सूर्य आहेस ....या सर्वांचा तू अनभिषिक्त स्साम्रात आहेस ...आणि या दुनियेला हास्याची प्रेरणा देणारा ' परमेश्वरच दूत' आहेस ...पुन्हा या दुनियेत आलास चार्ली.......तर हि दुनीयाने आनंदाने वेडी होऊन जाईल....हे शक्य नाही ...म्हणू तुझी पुन्हा पुन्हा आठवण...!

- हास्यप्रबोधनकार  संजीवन म्हात्रे .

Tuesday, December 22, 2015

"याल तर हसाल " चे २०१५ मधील शेवटचे काही कार्यक्रम ..!

नमस्कार ..!
२०१५ मध्ये " याल तर हसाल" चा धमाका कायम राहिला ...या वर्षातील शेवटच्या आठवड्यातील कार्यक्रम ...
दि. २४ डिसेंबर - देवळी,पेण. वेळ  - रात्री . ९ वाजता - दत्तजयंती उत्सव
दि. २५ डिसेंबर - कुर्डूस , अलिबाग, वेळ - रात्री ९ वाजता , दत्तजयंती उत्सव
दि. २६ डिसेंबर - करावे , नवी मुंबई , वेळ - सध्या. ८ वाजता , करावे शाळेचा रौप्यमहोत्सव
दि. २९ डिसेंबर - ओतूर , पुणे , वेळ - दुपारी २ वाजता , ओतूर हायस्कूल चे स्नेहसंमेलन
दि. ३० डिसेंबर - ठाणे महोत्सव , ठाणे., वेळ संध्या - ८ वाजता , आगरी, कोळी महोत्सव
येणाऱ्या २०१६  या वर्षात  हे 'हास्यअभियान ' असेच फोफावत राहू द्या हि रसिकांना विनंती  आणि ईश्वरचरणी प्रार्थना ...! सर्व आयोजक , रसिक प्रेक्षक, आणि मित्रमंडळी हितचिंतकांचे मन;पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Monday, December 21, 2015

द्रोणागिरी महोत्सव - २०१५

नमस्कार ..!
द्रोणागिरी युवा महोत्सव - २०१५ यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला. सलग १५ वर्षे हा महोत्सव सातत्याने आयोजित केला जातोय त्याबद्दल अध्यक्ष श्री. महादेव घरत आणि त्यांचे सहकारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन ..! शैक्षणिक , क्रीडा , सांस्कृतिक , मनोरंजन इत्यादी अनेक कार्यक्रमातून उरण मधील कलाकार , खेळाडू , इत्यादींना  एक समर्थ व्यासपीठ या महोत्सवाने निर्माण केले आहे. उरण चे नावलौकिक करणारे अनेक गुणी कलावंत , आणि खेळाडू या अशा महोत्सवामधून पुढे आलेले आहेत.  आपण  (द्रोणागिरी स्पोर्ट्स असोशिएशन )  मला बोलावून जो मानसन्मान दिलात  आणि या महोत्सवाची शोभा वाढविण्यात मला खारीचा वाटा उचलण्याची संधी दिलीत या बद्दल  मी आपला खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Friday, December 18, 2015

अप्पांना मिळाला " द्रोणागिरी भूषण " पुरस्कार

नमस्कार ...!
आज हि पोस्ट टाकताना मला अत्यंत आनंद होत आहे ..नेहमी मी माझे   चाहते , रसिक , मित्रमंडळी ,  विद्यार्थी , वाचक यांच्यासाठी माझ्या आणि माझ्या सर्व कार्यक्रमांविषयी पोस्ट टाकत असतो पण आज वेगळाच आनंद  मला होत आहे. माझ्या वडिलांना ( श्री. धनाजी अनंत म्हात्रे गुरुजी ) यांना या वर्षीचा ' द्रोणागिरी भूषण २०१५ "  पुरस्कार त्यांना त्यांच्या स्पोर्ट्स मधील योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला . या वर्षी ७५ व्या वर्षात पदार्पण करणारे अप्पा ...आम्हा सर्व कुटुंबियांसाठी आदर्श आहेत आणि माझे रोल मॉडेल सुद्धा ..! स्पोर्ट्स ( त्या काळातील उत्कृष्ट व्हॉलीबौल खेळाडू, काब्बडीचे राष्ट्रीय दर्जाचे पंच, जलतरण मध्ये अनेक मोठ्या जलतरण पटू चे मार्गदर्शक ) , विविध शिक्षक संघटनांचे अध्यक्ष , निवृत्त शिक्षक संघटना चे अध्यक्ष, निरंकारी समाज चे उरण तालुक्याचे मुखिया अशा अनेक क्षेत्रात अप्पा सक्रीय कार्यरत आहेत. आमच्यासाठी ते दीपस्तंभ आहेत. माझ्या अनेक कार्यक्रमात आई, आप्पा उपस्थित असतात पण कधी हि लोकांसमोर येत नाहीत ...! मला माझ्या वडिलांचा खूप खूप अभिमान वाटतो ..! धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Wednesday, December 16, 2015

"याल तर हसाल " च्या कामोठे महोत्सवातील कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद … !
सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा -हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 

Tuesday, December 15, 2015

कामोठे महोत्सव - सलग तिसऱ्या वर्षी " याल तर हसाल " कार्यक्रम

नमस्कार ...!
कामोठे महोत्सव - २०१५ . आज सादर होतोय "याल तर हसाल " चा ५४१ वा  कार्यक्रम ..! सलग तिसऱ्या वर्षी या महोत्सवामध्ये हा कार्यक्रम होतोय. सलग तीन वर्षे रिपीट होणारा या महोत्सवामधील हा एकमेव कार्यक्रम असावा  या बद्दल कामोठे महोत्सव चे आयोजक आणि जय पावणेकर यांचे मन;पूर्वक  धन्यवाद ...! २०१३ मध्ये " याल तर हसाल' चा ३९४ व कार्यक्रम , २०१४ मध्ये ४७१ वा आणि आज २०१५ मध्ये  ५४१वा  कार्यक्रम ..! वर्ष बदलले ...महोत्सवाचे स्वरूप पालटले ...महोत्सव भव्य होत गेला तसाच ..."याल तर हसाल ' हि आता व्यावसायिक रंगभूमी गाजवतोय ....काळ बदलला ...सर्व काही भव्य दिव्य होत गेलं....सर्व काही बदललं....पण बदलले नाहीत माझे रसिक प्रेक्षक ...माझे चाहते ..त्यांचे प्रेम वाढतच चाललय ...आणि त्या प्रेम आणि शुभेच्छांच्या बळावर " याल तर हसाल " रोज नवीन स्वरुपात पुन्हा पुन्हा रसिकांचे मनोरंजन  करतोय ..! सर्व  कामोठे मधील रसिक प्रेक्षकांचे  आयोजकांचे मन;पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Saturday, December 12, 2015

नवी मुंबई पोलिस यांच्यासाठी कार्यक्रम - विष्णुदास भावे वाशी - ११ डिसेंबर 2015

                                                            नमस्कार ..! विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये नवी मुबई पोलिस यांनी  सागर तटरक्षक दल, ग्राम रक्षक दल , पोलिस मित्र आणि कोळी मच्छिमार बांधव यांच्यासाठी आयोजित केलेला,  मनोरंजन आणि प्रबोधन असलेला कार्यक्रम करताना खूप धम्माल आली. दादुस यांची कोळीगीते आणि " याल तर हसाल " ची मस्त धमाल यांचा सुवर्णमध्य या कार्यक्रमाने साधला. पोलिस आयुक्त श्री. प्रभात रंजन साहेब, अपर पोलिस आयुक्त श्री. विजय चव्हाण साहेब, पोलिस सह आयुक्त श्री. मेंगडे साहेव , पोलिस सह आयुक्त श्री. उमाप साहेब आणि सर्व त्यांचे पोलिस सहकारी यांनी अत्यंत मेहनतीने आणि नियोजन बद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातून सागरी किनारयाच्या सुरक्षेविषयी  असलेली सर्व  पोलिसांची यंत्रणा , त्यांची तळमळ , सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी असलेल्या उपाययोजना , अद्ययावत तांत्रिक उपकरणे  याची माहिती मिळाली नवी मुंबई पोलिस  झोन -०१ आणि झोन - ०२  मधील सर्वच पोलिस अधिकारी मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य समजतात , सन्मान करतात याचा मला खूप अभिमान आहे. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद आणि आभार ..! आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 
नमस्कार …!
   "नवी मुंबई एविअशन अकॅडमी " च्या माध्यमातून अनेक दिग्गज व्यक्तींशी संवाद साधण्याचा योग आला . नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री . रंजन प्रभात , सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री .संजय भाटीया , सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही . राधा , आय . ए . एस . अधिकारी प्रज्ञा सरोदे , सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे , माजी . आमदार श्री . विवेक पाटील , आमदार श्री . संदीप नाईक ,आमदार श्री . प्रशांत ठाकूर , आमदार श्री . मनोहर भोईर अशा अनेक दिग्गजांच्या कौतुकाने भारावून गेलो आणि चांगल काही करण्याची प्रेरणा आणखी दृढ झाली . सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ……. !
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .  

Tuesday, December 8, 2015

नमस्कार ..!
डिसेंबर म्हटलं कि जरा Relax व्हायचं ....शांत होऊन जरा सरलेल्या वर्षाकडे पहायचं...काय चुकलं ..काय बरोबर ...याचं गणित मांडायचं ...आणि नवीन येणाऱ्या वर्षासाठी पुन्हा स्वप्नांची यादी गुंफायची ...वाईट मोडीत कडून चांगलं जोडीत जायचं ...आणि भूतकाळाला विसरत ...भविष्यकाळाला सजविण्यासाठी ...वतर्मानात जगायचं ....एवढं साधं सरळ ..आयुष्याचं गणित  ...अभ्यासक्रम तोच प्रत्त्येकाचा ...पण प्रश्नपत्रिका वेगळी सर्वांची ...कॉपी नाही करता येत आयुष्याच्या परीक्षेत ..म्हणून सामोरं जायचं सर्व सुख;दु:खाना  ......आणि तेच ...जरा RELAX राहायचं ...!!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Sunday, December 6, 2015

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट


नमस्कार ...!
नवी मुंबई एविअशन अकॅडेमी च्या " स्मार्ट सिटी " मध्ये आयोजित केलेल्या 'प्रदर्शनीय स्टौल'  सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय भाटीया यांनी मुख्यमंत्र्यांना आमची ओळख करून दिली. मुख्यमंत्र्यांनी अकॅडेमी विषयी माहिती घेतली आणि 'प्रकल्पग्रस्तानी प्रकल्प ग्रस्तांसाठी'  चालविलेल्या या प्रयत्नांचे खूप कौतुक केले. सर्वांनी केलेल्या कौतुकामुळे आता जबाबदारी खूप वाढली आहे असे वाटते. तसेच माझ्याकडून आणि माझ्या टीम कडून समाज बांधवाना  असलेल्या अपेक्षा पूर्ण करेन असा आत्मविश्वास  सुद्धा वाटला ..! सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Saturday, December 5, 2015

नवी मुंबई एविअशन अकॅडेमी

एक नवीन स्वप्न घेऊन मी आणि माझी टीम गेले सहा महिने प्रयत्न करीत राहिलो. ते स्वप्न होते नवी मुंबई एविएशन अकॅडेमी चे ..! याची खरी कल्पना भूपेश म्हात्रे आणि सुरज भगत यांची ...त्याला सन्माननिय रवीशेठ पाटील यांचा आधार आणि मार्गदर्शन ..शिरीष कडू , अनिल भोईर , रीना घरत, शेखर म्हात्रे,साईचरण पाटील या सर्वांनी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ , न्हावाशेवा - शिवडी सागरी सेतू , आणि जे एन पी टी चे चौथे terminal यामध्ये प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात , त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्याचा चंग या संस्थेने बांधला आहे. सिडको च्या माध्यमातून हि संस्था मंजूर करून घेतली. आणि प्रकल्प ग्रस्त तरुणांमध्ये जनजागृती करून त्यांना आधुनिक काळात खर्या अर्थाने 'स्मार्ट ' बनवावे हे आमचे ध्येय आहे. सिडकोने कोणत्याही कोर्स ची ९०% फी भरण्याचे मान्य केले असून लवकरच पहिले तीन कोर्सेस ची सुरुवात करण्यात येईल. गेल्या सहा महिण्यात अनेकांचा सहभाग , मदत, आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला लाभले त्या सर्वांचे , सर्व टीम चे, आणि सिडको प्रशासनाचे  मन:पूर्वक धन्यवाद ..! 
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Tuesday, November 24, 2015

भविष्यकाळ ...!

नमस्कार ...!
भविष्यकाळात अनेक योजना आहेत ...! माझे काही चाहते नेहमी विचारत असतात कि ५३५ प्रयोगानंतर सुद्धा अजून कोणत्याही वाहिनीवर झळकलो नाही ...अनेक मोठे कलाकार शो मध्ये येऊन गेले परंतु अजून कोणताही चित्रपट वैगेरे नाही. 'याल तर हसाल'  चे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयोग का नाहीत ?  'चला हवा येऊ द्या ' मध्ये किंवा 'कॉमेडी एक्सप्रेस' मध्ये का जात नाहीत .....  असे अनेक प्रश्न आहेत आणि माझे चाहते सतत याची चिंता करत असतात कि माझे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झळकायला पाहिजे ..!  माझे हितचिंतक , मार्गदर्शक सतत यासाठी प्रयत्न करत असतात. त्या बद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. आणि या ऋणातून मला  आजन्म मुक्त व्हायचे नाही ..!  या ऋणातून उतराई होणे शक्य नाही ..!
     माझ्या चाहत्यांचा मला खूप आधार वाटतो ...आणि आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करण्याचा मि जरूर प्रयत्न करीन. ..आपल्या प्रेम आणि आशीर्वाद असेल तर सर्व काही शक्य आहे. संकल्प आहेत ...तर सिध्दी पण असणारच ..! सध्या " याल तर हसाल " व्यावसायिक रंगभूमीवर हळूहळू स्थिरावतोय ...अजून खूप पुढे जायचे आहे ...आणि सर्वांची साथ असेल तर ...sky is the LIMIT....!!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Wednesday, November 18, 2015


 


















नमस्कार … ! 
नवी मुंबई पोलिस परिमंडळ-२ यांनी आयोजित केलेल्या दिवाळी मेळाव्यामध्ये उपस्थित राहण्याचा योग आला . सन्माननिय पोलिस उपायुक्त श्री . विश्वास पांढरे साहेब आणि सहआयुक्त श्री . शेषराव सूर्यवंशी साहेब , श्री . बाजीराव भोसले साहेब आणि त्यांचे सहकारी पोलिस अधिकारी आणि नवी मुंबई पोलिस यांनी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मेळावा आयोजित केला होता . या समारंभात अंध कलाकारांचा वाद्यवृंद यांनी आपली कला सादर करून सर्वांनाच थक्क करून सोडले . अत्यंत निटनेटके आयोजन ,खेळीमेळीचे वातावरण यामुळे सतत कौटुंबिक जिव्हाळ्याचा स्पर्श या कार्यक्रमात जाणवत होता . पोलिस आयुक्त प्रभात रंजन साहेब यांची उपस्थिती ,सहाय्यक पोलिस आयुक्त श्री . चव्हाण  साहेब यांनी सदर केलेली "चढता सुरज "हि कव्वाली आणि पांढरे साहेबांनी सदर केलेली कविता या सर्वांमुळे कार्यक्रमाला ' चार चांद ' लागले असेच म्हणावे लागेल . सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा भाग म्हणून या कार्यक्रमात सहभागी होण्याचा सन्मान दिला सर्व अधिकारी मित्रांचे मन:पूर्वक धन्यवाद ……। आणि खूप खूप आभार ……. !

शनिवार दिनांक ७ नोव्हेंबर २०१५ रोजी नवी मुंबईतील प्रकल्प ग्रस्त गावांमधील गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याच्या  अनुषंगाने आणि प्रकल्पग्रस्त गावांना फक्त नियमित नव्हे तर स्मार्टपणे नियमित करण्याच्या अनुषंगाने " स्मार्ट विलेज " या सदराखाली 'खुले चर्चा सत्र  'कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिरातील श्री . मोरेश्वर चिंतामण पाटील सभागृहात आयोजित करण्यात आले होते . निवडक उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या चर्चा सत्रात नवी मुंबईतील विविध गावांमधील ७० एक लोकांनी यात सहभाग घेतला . आगरीकोळी हास्यप्रबोधनकार श्री . संजीवन म्हात्रे यांच्या आगरी कोळी शैलीतील मार्गदर्शनपर भाषणाने पहिल्या सत्राची सुरुवात झाली . ज्यात त्यांनी त्यांच्या शैलीत हसवत आणि चिमटे घेत सामाजिक भावनेला हात घालत चर्चासत्रासाठी पोषक अशी वातावरणनिर्मिती केली .  














"स्वराज्य तोरण " या दैनिकाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या " याल तर हसाल " च्या कार्यक्रमाला वळपाडा ,भिवंडी य़ेथे रसिकांनी तुडुंब गर्दी केली . अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रयोग खूप रंगला . भिवंडीकरांचे मन:पूर्वक धन्यवाद …. ! स्वराज्य तोरणचे संस्थापक श्री . किशोर पाटील, धर्मसेवक श्री . सोन्या पाटील, राजाराम पाटील ,जयेंद्र खुणे आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला खूप दाद दिली आणि रसिकांनी हा प्रयोग भिवंडीत वारंवार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली . सर्वांचे शतशः आभार …. !
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 
नमस्कार ….!
आज मराठी रंगभूमी दिवस …!  आयुष्यात आज जो आनंद ,मान -सन्मान जे सर्व काही आहे ते सर्व रंगभूमीने दिले आणि या सर्वांपेक्षा जास्त महत्त्वाचे माझ्या रसिकांनी माझ्यावर केलेले प्रेम …! लाखो लोकांना  दु:ख  विसरायला लावत मनसोक्त हसविण्याचे भाग्य माझ्या पदरात रंगभूमीने दिले हे माझे परमभाग्यच …! आज ५३२ कार्यक्रमानंतर सुद्धा " याल तर हसाल "प्रत्येक प्रयोगागणिक लोकप्रियता गाठतो आहे याचे सर्व श्रेय रंगभूमीचा आशीर्वाद आणि रसिक मायबाप आणि मित्रमंडळींचा सहयोग …. ! या रंगभूमीची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत घडावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना … !
आपला सर्वांचा -हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .  
Add caption











नमस्कार …….!
भिवंडीत झालेल्या " याल तर हसाल " या कार्यक्रमाची वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी ……!सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद  …… !
आपला सर्वांचा -हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .  

नमस्कार ….!
विक्रीकर भवन ,बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ,मुंबई येथे १ ऑक्टो . २०१५ रोजी विक्रीकर दिनाच्या निमित्ताने माझे   ' मार्ग सुखाचा ' हे व्याख्यान आयोजित केले होते . सदर करताना विक्रीकर कर्मचाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला . विक्रीकर उपायुक्त श्री . दीपटे  साहेब यांनी विशेष कौतुक केले आणि आभार मानले . श्री राहुल सोनावणे यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले . या सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा -हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 
नमस्कार …….!
सह्याद्री प्रतिष्ठान ,उरण ने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध गड -किल्ल्यांची माहिती देणारे चित्रप्रदर्शन साईनगर ,साई मंदिर वहाळ ,पनवेल येथे आयोजित केले होते . अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सर्व प्रकारच्या गड-किल्ल्यांची माहिती देणारे हे प्रदर्शन म्हणजे शिवप्रेमींना एक पर्वणीच होती . या कार्यक्रमाचा भाग म्हणून उपस्थित राहता आले हे माझे भाग्य समजतो . श्री ऱविशेथ पाटील यांनी आणि  सर्व साई भक्तांनी सह्याद्री प्रतीष्ठानचे खूप कौतुक केले आणि धन्यवाद दिले. त्यांनी असेच कार्य अधिक जोमाने पुढे न्यावे आणि तरुणांपुढे आदर्श निर्माण करावेत यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो .
आपला सर्वांचा -हास्यप्रबोधनकार  संजीवन म्हात्रे . 

स्पंदन फाउंडेशन चा पहिला कार्यक्रम - १५ नोव्हे. २०१५

नमस्कार ..!
स्पंदन फाउंडेशन ची स्थापना वंदना तासगावकर, वर्षा काशिद , आणि वैशाली लांडगे यांनी आपल्या वडिलांच्या कै. सीताराम कांबळे यांच्या स्मरणार्थ केली. फाउंडेशन मध्ये श्री. नंदकुमार तासगावकर, श्री महेश काशिद आणि श्री शेखर सुळगावकर या सर्व कुटुंबियांच्या बरोबरच मला या संस्थेचा संस्थापक सदस्य होण्याचा मान मिळाला याबद्दल मी या सर्व कुटुंबियांचे आभार मानतो. फाउंडेशन चा पहिलाच कार्यक्रम शेलघर च्या आदिवासी वाडीतील महिलांना साडी वाटप आणि मुलांना दिवाळी फराळ व भेटवस्तू देऊन  पार पडला. यासाठी सक्सेस फाउंडेशन चे सुरज भगत , परेश भगत , भूपेश म्हात्रे आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळीनी खूप मेहनत घेतली. 'थोडा आनंद देऊ या , थोडा आनंद घेऊ या ' या ब्रीदवाक्य असलेले हि संस्था गरीब, दिन दुबळे, दु:खी , पिडीत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सदैव संपूर्ण महाराष्ट्रात काम करेल. सर्वाना खूप शुभेच्छा आणि मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.


नमस्कार ….!
माझ्या ' याल तर हसाल ' च्या  youtube channel ज्या प्रमाणे आपण प्रतिसाद दिलात तसाच जबरदस्त प्रतिसाद माझ्या " संजीवन मार्ग  " या channel  ला सुद्धा द्याल यामध्ये मला तिळमात्र शंका नाही .…!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 
नमस्कार …!
भारतीय पुरस्कार विजेत्या संघातर्फे मला काल मान्यवरांच्या हस्ते ' राष्ट्रीय हास्य प्रबोधनकार पुरस्कार ' प्रदान करण्यात आला . माझ्या बरोबरच विविध क्षेत्रातील दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला . त्यामध्ये शिवसेनेचे उपनेते श्री. अनंत तरे ,सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे ,चित्रपट निर्माते ,दिग्दर्शक नागेश भोसले ,साई  संस्थानाचे वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील इत्यादी अनेक मान्यवरांचा यामध्ये समावेश होता . हा पुरस्कार मी माझ्या रसिक प्रेक्षकांना अर्पण करतो . आपले प्रेम सदैव असेच पाठीशी असू द्या .
आपला सर्वांचा -हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Saturday, October 24, 2015

" याल तर हसाल" विष्णुदास भावे कार्यक्रम हाउसफुल्ल ..!

नमस्कार ..!
"याल तर हसाल' च्या विष्णुदास भावे मधील कार्यक्रमास रसिक पेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. मांडवाचे मंगारी टीम ने अत्यंत मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करून दाखविला. नवी मुंबईतील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या शेवटी 'चला हवा येऊ द्या " मधील भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांनी सुद्धा  उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. सर्व रसिक प्रेक्षक , आयोजक , मान्यवर आणि सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Friday, October 23, 2015

" याल तर हसाल " दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी - विष्णुदास भावे नाट्यगृह , वाशी

नमस्कार ...!
'मांडवाचे मंगारी ' परिवारातर्फे दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या 'नाम " संस्थच्या मदतीसाठी " याल तर हसाल' चा कार्यक्रम आयोजित केला आहे. उद्या ४:३० वाजता सादर होणाऱ्या कार्यक्रमास आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करतो . याल तर हसाल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यात माझा खारीचा वाट आहे याचा मला  आणि माझ्या टीम ला खूप आनंद होतोय. उद्याचा शो आपण होऊसेफुल्ल कराल या विषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. सदैव असेच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या.
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

" आलाप" अंध कलाकारांचा वाद्यवृंद - सहभाग

नमस्कार ...!
कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमी मध्ये आयोजित केलेल्या "ट्रेन द ट्रेनर" या सत्रात "आलाप " या अंध कलाकारांच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. या सर्व कलाकारांच्या कला आविष्काराने मी खूप भारावून गेलो. त्या सर्वांचा ताळमेळ एवढा छान जमत होता कि आपण डोळे असून अंध असल्यासारखा वाटत होतं. एका वेगळ्या दुनियेत वावरताना ...या कलाकारांनी डोळसांना प्रकाश दिल्यासारखा वाटला. निवेदन तर उत्कृष्टच..!  हा कार्यक्रम ज्यांनी तयार केला त्या जाधव सरांना सलाम ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Tuesday, October 20, 2015

'याल तर हसाल " कळंबोली कार्यक्रम - २० ऑक्टो. २०१५ नवरात्रोत्सव

नमस्कार ...!
 " याल तर हसाल " चा ५३० व कार्यक्रम काल कळंबोली मध्ये झकास झाला. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि आशीर्वाद यामुळे याल तर हसाल यशाची अनेक शिखरे गाठत पुढे चालला आहे. रसिकांच्या टाळ्या आणि हशा मध्ये  त्तीन तास कधी निघून जातात काळत नाही . आयोजक आणि रसिकांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 

Wednesday, October 14, 2015

'ट्रेन द ट्रेनर' कॅंम्प - कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमी

               कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमी ने आयोजित केलेल्या 'मार्शल आर्ट्स सेल्फ डिफेन्स  फेडरेशन ' च्या संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेल्या प्रशिक्षकांसाठी "ट्रेन द ट्रेनर " या कार्यक्रमामध्ये संजीवन मार्ग या माझ्या संस्थेच्या माध्यमातून माझ्या  " तणाव नियंत्रण " या ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  या कार्यक्रमामध्ये सर्व ट्रेनर्सना  मार्गदर्शन करताना खूप धमाल आली. सर्वानी सेशन खूप एन्जॉय केले. आणि मला पाच दिवसांच्या या सत्रात पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले.  या कार्यक्रमाचे आयोजक आणि कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!!
आपला सर्वांचा - हास्य्प्रबोधंकर संजीवन म्हात्रे.  

Tuesday, October 6, 2015

लहानपण देगा देवा ...!

माझ्या गावातील ' गौरा उत्सवामध्ये ' मी नेहमीच सहभागी असतो. गेली दोन वर्षे सतत 'याल तर हसाल ' ने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या वर्षी सुद्धा एका कार्यक्रमात सहभागी झालो. कार्यक्रम संपल्यावर सगळ्या लहान मुलांबरोबर गप्पा मारल्या ....आरती म्हटली ...खूप मज्जा आली..खूप लहान झाल्यासारख वाटलं. त्यांच्यात निरागसतेचा, निष्पाप पणाचा जो 'अहसास' होता ...मनाला फार मोहवून गेला..वाटल, परमेश्वराने प्रत्येक ५ वर्षानंतर २ महिन्यासाठी माणसाला तात्पुरत छोट करावा ....म्हणजे माणसाला कळेल कि दुनियादारी सांभाळताना आपण खोटेपणाचे किती थर अंगावर चढवून घेतलेत ..याची जाणीव होण्यासाठी माणसाने लहान व्हाव...आणि तस होता येत नसेल तर लहान मुलात रमाव ....मस्त वाटतं ...अजून आयुष्य कितीतरी बाकी आहे ...आयुष्यात आनंद आहे, मस्ती आहे , हास्य आहे आणि हो .. यामध्ये स्पर्धा नाही , कर्ज नाही , प्रतिष्ठा नाही , पद नाही , काम क्रोध काहीही नाही ...असल्या दुनियेत रमायला कुणाला नाही आवडणार ...!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Monday, October 5, 2015

"याल तर हसाल" उरण बोरी कार्यक्रम - १ ऑक्टोबर २०१५


                 या महिन्यातील हा पहिलाच कार्यक्रम. बरोबर एक तारखेला. अस झालं कि त्या महिन्यात माझे खूप कार्यक्रम होतात असा माझा अनुभव ..! शिवाय या होनेश्वर मंडळाने तीन वर्ष सतत पाठपुरावा केल्यानंतर हा कार्यक्रम होत होता. विलक्षण उत्सुकता होती या कार्यक्रमाची सर्वाना..आणि त्यात कार्यक्रमाच्या वेळी पाउस  सुरु झाला. कार्यक्रम होणार कि नाही हि शंका घर करू लागली. परतू रिमझिम बरसणाऱ्या त्या पावसातही माझा एक हि रसिक प्रेक्षक उठून गेला नाही, किंवा हलला सुद्धा नाही.  सर्व रसिक श्रोते  शांतपणे कार्यक्रम एन्जॉय करत राहिले.  जणू पावसामुळे त्यांना काहिच फरक पडत नव्हता. सर्व रसिक श्रोते आणि मी सुद्धा भिजून गेलो होतो. हा एक विलक्षण अनभव होता. फार कमी कलाकारांच्या वाट्याला असे भाग्य लाभतं.  'याल तर हसाल' च्या इतिहासातील हा एक आगळा वेगळा " ओला ' कार्यक्रम होता. याचे सर्व श्रेय माझ्या रसिक प्रेक्षकांना. आणि आयोजकांना सुद्धा .! त्याच्या रसिकतेला आणि " याल तर हसाल " वरील प्रेमाला मनापासून दंडवत ...!! 
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Saturday, September 26, 2015

सर्वधर्म समभाव आरती - खांदेश्वर पोलिस स्टेशन - २५ सप्टे.२०१५

या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये खांदेश्वर पोलिस स्टेशन मध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबविला. श्री गणरायाची सर्व धर्मियांनी सामुहिक आरती करायची. .! हा उपक्रम करण्यासाठी  परिमंडळ -२ चे पोलिस उपायुक्त श्री विश्वास पांढरे , सहाय्यक पोलिस उपायुक्त श्री शेषराव सूर्यवंशी , श्री. देसाई साहेब यांच्या विशेष पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. या महाआरती मध्ये गणरायाला आरती करण्याचा मान अनेक मान्यवरांमध्ये मलाही मिळाला हे माझे मी सद्भाग्य समजतो.समाजाला एक नवी दिशा आणि प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमाचा भाग म्हणून उपस्थित राहण्याचा भाग्य मला मिळाले . श्री विश्वास पांढरे साहेब , श्री शेषराव सूर्यवंशी साहेब, देसाई साहेब आणि सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन ..! 

Wednesday, September 9, 2015

पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी विशेष कार्यक्रम

नमस्कार ...!
"याल तर हसाल " च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...!!! नवी मुंबई पोलिस अधिकारी , कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी " याल तर हसाल " चा विशेष प्रयोग सादर होतोय " वासुदेव बळवंत फडके " नाट्यगृहात..! शनिवार दिनांक १२ सप्टे. २०१५ सकाळी १० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अनेक मान्यवर पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवाय अर्जुन पुरस्कार विजेत्या अभिलाषा म्हात्रे चा विशेष सन्मान  सुद्धा होणार आहे. मुंबई पोलिसांसाठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार नेहमीच वर्षातून एकदा कार्यक्रम करतात. आपण ते टी.व्ही. वर पाहिले आहे. तेव्हा आपणही पोलिसांसाठी कार्यक्रम करून कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस दलाचे मनोरंजन करावे असे मनोमन वाटायचे. या कार्यक्रमच्या निमित्ताने हे स्वप्न पूर्ण होतेय आणि " याल तर हसाल " आणखी एक पाउल  पुढे जातोय...! श्री. विश्वास पांढरे ( पोलिस उपायुक्त परिमंडळ -२ ) आणि श्री. शेषराव सूर्यवंशी ( सहाय्यक पोलिस आयुक्त पनवेल विभाग ) यांचे मन:पूर्वक धन्यवाद ...! माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मन;पूर्वक आभार ...! 

ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट सेल ...!

नमस्कार ...!
ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट सेल च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला . शेतकरी कामगार पक्षाने हा समारंभ वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केला होता. तरुणांनी संपूर्ण सभागृह भरून गेले होते. ट्रेनिंग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर व्यासपीठावर हजार होते. त्या सर्वांमध्ये व्यासपीठ भूषविताना खूप अभिमान वाटला. माझर भाषण विशेष गाजले , सर्वाना आवडले ...अशी सर्वानी पोचपावती दिली. माझ्या भाषणाचे काही मुद्दे वरील बातमीत प्रसिद्ध झाले होते. ते माझ्या चाहत्यांसाठी देत आहे.
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Tuesday, August 25, 2015

"याल तर हसाल " विष्णुदास भावे शो - हाउसफुल्ल ..!


नमस्कार ..! 
" याल तर हसाल " चा विष्णुदास भावे मधील पहिलाच शो हाउसफुल ..! सर्व रसिक प्रेक्षक, श्रोते, मित्रमंडळी आणि मान्यवरांचे मन:पूर्वक धन्यवाद ..! नवी मुंबईकरांनी 'याल तर हसाल' चे जल्लोषात स्वागत केले .. त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत ..! श्री रवीशेठ पाटील ( वहाळ ) , मनोज म्हात्रे , निलेश पाटील ( म्हात्रे & पाटील असोसीएटस ) , बी.ए.पाटील ( घणसोली ), मंगेश म्हात्रे,  रवी मढवी , महेंद्र दळवी ( दिवा ) , सुरज भगत ( शेलघर ) , अनिल ठाकूर (जसखार ). संजीव पाटील ( मोरावे ) , भूपेश म्हात्रे ( कोपर ) , सुनील म्हात्रे ( करावे )  आणि माझे अनेक मित्रमंडळी यांनी अपर मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी श्री दिनेश पाटील ( विश्वस्त जे.एन.पी.टी. ), संतोष चौधरी ( दादुस ) , पी .सी .पाटील ( अध्यक्ष ज्ञान विकास संस्था , कोपरखैरणे ) नंदकुमार म्हात्रे ( मांडवाचे मंगारी ) अशा मान्यवरांनी कार्यक्रमाला शोभा आणली.  सर्वांचे म:पूर्वक धन्यवाद ...! ज्या पद्धतीने रसिकांनी कार्यक्रमाला गर्दी केली ....दाद दिली ...आम्हा कलाकारांचे कौतुक केले ...सर्व रसिकांना आमचे लाख लाख सलाम...!  हे सर्व रसिकांमुळेच आम्ही करू शकलो ...या यशाचे मानकरी माझे रसिक प्रेक्षकच ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार  संजीवन म्हात्रे 

Friday, August 14, 2015

"याल तर हसाल " विष्णुदास भावे - पहिला प्रयोग - १५ ऑगस्ट २०१५

नमस्कार ..!
                  खूप वर्षापसून इच्छा होती ..विष्णुदास ला प्रयोग करण्याची ..! 'याल तर हसाल' जेव्हा सुरु केला तेव्हापासून ,,हे स्वप्न पाहिलं ..! नाटक बघायला ज्यावेळी विष्णुदास भावे नाट्यगृहात  जायचो त्यावेळी मला स्वतःला रंगमंचावर बघायचो . आपल्या स्वत;च्या नाटकाचा banner इतर मोठ्या नाटकांच्या रांगेत बघायचो .. .स्वप्नच वाटायचं त्यावेळी ..!  पण आज माझ्या रसिकांच्या, श्रोत्यांच्या आणि मित्रमंडळी यांच्या  कृपेने आज इथपर्यंत येऊन पोहोचलो. आज ५२१ व्या प्रयोगापर्यंत आल्यानंतर कार्यक्रमच काही अप्रूप वाटत  नाही पण रंगमंचाच जरूर आहे ..! व्यावसायिक रंगभूमीवर यायचं काही ठरविलं नव्हत पण हौशी कलाकार म्हणून कार्यक्रम करता करता व्यावसायिक रंगभूमीवर कधी आलो कळलच नाही ...!
                 हे श्रेय वरवर माझे दिसत असले तरी यामध्ये अनेक लोकांचा वाटा आहे. खरं म्हणजे तेच या सर्व माझ्या यशाचे शिल्पकार आहेत. मी केवळ निमित्त मात्र आहे, असे प्रामाणिकपणे मला वाटते.  या कार्यक्रमाचे सर्व कलाकार , निर्माते श्री शेखर म्हात्रे , या कार्यक्रमाचे आधारस्तंभ श्री. रवीशेठ पाटील , माझे मित्र मनोज म्हात्रे आणि निलेश पाटील ( म्हात्रे & पाटील असोसिएट्स ) , रवी मढवी, महेंद्र दळवी ( दिवा ),  बी. ए. पाटील ( घणसोली ) , अनिल भोईर (जसखार), ह्रीशिकेश ठाकूर , सुरज भगत ( शेलघर ) अशी अनेक नावे सांगता येतील. आज हे लिहिताना तिकीट खिडकीचा रिपोर्ट सुद्धा एकदम जबरदस्त आहे. शो हाउसफुल होण्याच्या मार्गावर आहे .        
आयुष्यात आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याची संधी परमेश्वर देतोय ...सर्वांचे मनापासून धन्यवाद ..! अजून अनेक नाट्यगृहे आहेत, वेगवेगळे प्रयोग आहेत ...सर्व रसिकांचे आशीर्वाद आणि सहकार्य असल्यावर  काहीही अशक्य नाही ...!
संजीवन म्हात्रे . १५ ऑगस्ट २०१५ , सकाळी ६:२३ वाजता.


Friday, July 31, 2015

गुरुपौर्णिमा ...!!

नमस्कार ...!
गुरुपौर्णिमा ...आपल्या गुरुंना वंदन करून त्यांच्याविषयी आदर , प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ..!  माझ्या सर्व गुरुंना मी आजच्या दिवशी वंदन करतो, त्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशातच आजपर्यंत मार्गक्रमण करत आहे. .!
गुरु हि संकल्पना आपल्या पौराणिक काळापासून चालत आलेली ..आपल्या हजारो पिढ्यांनी हि संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचविली . काळानुसार गुरु आणि शिष्य दोन्हीही बदलले. आदर आणि समर्पण हि भावना काळानुसार कमी कमी होत गेली. पूर्वी गुरु आणि शिष्यांमध्ये वयाचे खूप अंतर असायचे. त्यामुळे साहजिकच आदर असायचा, ज्ञान मिळविण्याचे एकमेव साधन म्हणजे गुरु असायचा. परंतु आता ...शिक्षक आणि विद्यार्थी यामधील अंतर खूप कमी आहे. त्यामुळे शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मित्रच बनू लागले. आणि त्यामुळे शिक्षक आणि शिष्य यामधील आदर कमी होऊ लागला.
                        पूर्वी गुरूबद्दल आदरयुक्त भीती असायची, आता मात्र भीतीयुक्त आदर शुल्लक राहिला आहे. सर्व शिक्षकांचे म्हणणे आहे कि आता मुलांना आमच्या बद्दल प्रेम ,आदर , जिव्हाळा वाटत नाही ...तसेच आजची पिढी सुद्धा पूर्वी सारखे गुरु शिक्षक आता राहिले नाहीत असेच म्हणते. दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत . टाळी एका हाताने थोडीच वाजते ...?
                      पण आज पुन्हा एकदा चांगल्या गुरूंची खूप गरज आहे. चांगली पिढी चांगले गुरूच घडवू शकतात. त्यासाठी आताच्या पिढीने पहिल्यांदा चांगले शिष्य होण्याची गरज आहे. चांगला शिष्यच पुढे चांगला गुरु होऊ शकतो. जो चांगला शिष्य नाही तो चांगला गुरु कसा होऊ शकेल..?
                   गुरु या शब्दाबद्दल सर्वाना आदर आहे. पण मग गुरु ची संकल्पना आपल्या मनात पूर्वी पासून अशी आहे ...दाढी वाढलेले, वयस्कर, सर्वस्वाचा त्याग केलेले , अशी व्यक्ती समोर येते ...असे दिसणारे गुरु आता नाहीत , पण खूप ज्ञान असणारे , अनेक नवनवीन क्षेत्रात पारंगत , EXPERTS अशी अनेक माणसे सामाजात आहेत. आताच्या काळातील सर्व विद्या त्यांना अवगत आहेत . तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे आहे त्या क्षेत्रातील निष्णात व्यक्ती तुमचा गुरु होऊ शकते. आधुनिक भाषेत त्यांना " MENTOR" म्हणू शकतो आपण . असो.
               आयुष्याला दिशा , योग्य मार्ग आणि अनुकूल गती प्रदान करणाऱ्या माणसाला मी गुरु मानतो. आणि एक गुरु असण्यापेक्षा अनेक गुरु असावेत. प्रत्येक कडून जे चांगला असेल ते घ्याव. " ग्रंथ हे आपले गुरु असे आपण मानतो' हे सत्यच आहे. आई वडील हे सुद्धा आपले प्रथम गुरूच असतात . आणि ज्या लोकांकडून आयुष्यात जे जे आपण शिकतो, ते सर्वच आपले गुरु असतात .
                 गुरु असल्याने आपला अहंकार नाहीसा होतो, माझ्या पेक्षा यांना जास्त माहिती आहे, मी यांच्याकडून शिकलो हे मान्य केलं कि अहंकार कसा राहील ? गुरूंची महिमा अगाध आहे. आपल्या सर्वाना आयुष्यात असेक अनेक योग्य, ज्ञानी,
गुरु मिळावेत आणि आपले आयुष्य समृद्ध व्हावे अशी मी आज परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
                                                                   हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Monday, July 27, 2015

नमस्कार ...!'
माझ्या " बाल्या गारी हलू चालव , चिंता कर आस बाप्पासशी " या ओळी अनेक टेम्पो च्या मागे अपघात विषयी जनजागृती करण्यासाठी अनेक चाहत्यांनी लिहिल्या होत्या. आता माझं आणखी एक गाणं " आई बाप्पासशी वळवतान बोबरी, हि पोरा पोरींची लफरी " हे whatsup वर status म्हणून गाजतंय ..! रसिक आणि चाहत्यांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, July 20, 2015

खंत ...!


खंत ...!

                                 दु:खात एक आशा
                                        येईल सुख कधीतरी 
                                               सुखात एक निराशा 
                                                       येईल दु:ख कधीतरी 
                                                               या कधीतरी ला नसतो अंत 
                                                                       हीच तर मानवाच्या जीवनाची खंत ....!
                                                                                       संजीवन म्हात्रे .

Saturday, June 20, 2015

घाई आणि हातघाई ..!

                     
  आजकाल कुणाला वेळच नाही. प्रत्येकजण पळतोय ....प्रत्येकाला घाई आहे... कुठेतरी पोहोचण्याची...कुठे पोहोचायचं हे माहित नाही. पण फक्त पळत राहायचं ...सारखा पळत राहायचं...जो जास्त पळेल तो पुढे जातो...मग आपण आपला वेग वाढवायचा ...त्याच्या पुढे जायचं ...मग तो वाढवतो...आपल्यापुढे निघून जातो ...मग आपण काहीतरी नवीन कारवाया करून ..शर्यत जिंकायचीच ...जोरात पळायचं...  जीवघेणं पळायचं...आणि मग कुठेतरी अपघात हा ठरलेलाच आहे...तो झाला कि बाकीचे थबकतात  ...थांबतात ...भांबावून जातात ...पण मग इतर पुढे गेलेले बघून...पळणं अपरिहार्य समजून पुन्हा शर्यतीत सामील होतात ....जीवनाचा प्रवास पूर्ण होतो ...पण जगणे राहूनच जातं...!!
                                रोजची वर्तमानपत्र उघडून पहा...हजारो अपघात ..मोटारसाइकलचे अपघात...कार चे अपघात, मोठ्या गाड्यांचे अपघात, कोण रेल्वेखाली सापडलं , ...हजारो घटना रोज आपण पाहतो ...कधीतरी आपण सुद्धा याचे शिकार होऊ याची साधी कल्पना सुद्धा आपल्याला शिवत नाही ...आपण रोज त्याच रस्त्यावरून येतो....जिथे अपघात घडतात ..आपण रोज तेच करतो...जे अपघात झालं त्यांनी केलं..पण आज त्यांच्या जीवावर बेतल ..उद्या आपलाही जीव यात जाऊ शकतो....स्वत;च्या चुकीने नाही तर इतरांच्या बेजबाबदार वृत्तीने आपण मारू शकतो याचा साधा विचार हि आपल्याला कधी शिवत नाही ...आपल्याला फक्त एकाच गोष्ट असते ...सकाळ, दुपार, संध्याकाळ , रात्र आणि ती म्हणजे घाई , घाई....आणि  घाई....काम , काम आणि काम.....!!
                               त्यामुळे जीवनात आनंदाचे क्षण येताच नाही ...आले तरी ते समजत नाहीत, जाणवत नाहीत , आणि समजले तरी ते उपभोगता येत नाहीत ..कारण आपल्याला वेळच  नसतो ...मग एवढी क्षणाक्षणाला घाईत असलेली माणसे करतात तरी काय..? यांचा वेळ कुठे जातो ? का सतत मानसं एकमेकांवर उखडलेली , चिडलेली , वैतागलेली , जळलेली ...काय कारण असेल याचं ? उत्तर सोप्पं आहे अगदी ...आपण आनंदी नसल्यामुळे आपण कुणाला आनंदी बघू शकत नाही ...आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण कुणाला आरामात बसलेला बघू शकत नाही...आपल्याला सन्मान मिळत नसल्यामुळे आपण कुणाला सन्मान देत नाही....आपण सुखी नाही तर कुणाला सुखी बघायचं नाही...आणि त्याला जर काही सुखाचे क्षण मिळू द्यायचे नाही ...या वृत्तीमुळे ..स्पर्धा सुरु आहे.....स्पर्धेला वेग आहे ...वेगळा अपघात ...आणि अपघातात पडताहेत हजारो लोकांचे बळी ...!!

हे सर्व थांबले पाहिजे...!! हे थांबविण्याचे अनेक चांगले मार्ग उपलब्ध आहेत ,...आपण याचा शोध घ्यायला हवा ...थांबलो तर किर्र अंधारात सुद्धा हळू हळू दिसायला लागत नाही का ...?
संजीवन म्हात्रे ..!