Friday, July 29, 2016

केल्याने देशाटन : ०१ - कोरल बेट, THAILAND

नमस्कार ...!
बेट ...( मग ते कोणतंहीअसो , कोणत्याही देशातील असो ) मला पहिल्या पासून आकर्षित करतं. चारही बाजूला समुद्राचं निळशार पाणी आणि संपूर्ण जगापासून तुटलेले आपण ...मनात एकवेगळीच भावना निर्माण करतं..! म्हणून Thailand च्या भेटीत असे एखादा बेटावर जायचं ठरविलेच होते. Pattaya च्या दोन दिवसाच्या भेटीत अर्धा दिवस बेटावर घालवावा असे नियोजन होते. Pattaya शहरापासून स्पीडबोट ने १तासाच्या अंतरावर हे कोरल बेटआहे. पारदर्शी निळ्या समुद्रातून प्रवास करताना अंगावर रोमांच उभे राहिले. या पूर्वी फक्त अशा समुद्रावर नायक - नायिकेची हिंदी चित्रपटातील गाणी च पहिली होती. आज प्रत्यक्षात ते सृष्टीसौंदर्य अनुभवत होतो...4 किमी लांब आणि 2 किमी रुंद असलेल्या या बेटावर फारशी मनुष्यवस्ती नाही..परंतु पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असे हे स्थळ आहे...वरती निळाशार आकाश आणि आणि खाली त्याचेच प्रतिबिंब असलेला समुद्र...! निसर्ग मानवाला एवढं सुख घेऊन येतो...आपण मात्र त्याच्या सान्निध्यात जात नाही...एकदातरी सिमेंटच्या जंगलातून निघून निसर्गाच्या सौंदर्याची चव मनमुराद चाखायला हवी नाही का..?
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, July 25, 2016

'ग्लोबल इंग्लिश स्कूल' दिवा, ठाणे - 'आदर्श पालकत्व ' या विषयावर सेमिनार

नमस्कार..!
'ग्लोबल इंग्लिश स्कूल' दिवा, ठाणे यांच्या माध्यमातून 'आदर्श पालकत्व ' या विषयावर ' संजीवन मार्ग ' तर्फे माझ्या सेमिनारचेआयोजन केले होते. पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्यामुळे सकाळ आणि दुपार या दोन सत्रात सेमिनारआयोजित करावा लागला. ' ग्लोबल स्कूल' चे नेटकेआयोजन,संस्थेचेअध्यक्ष श्री. महेंद्र दळवी आणि त्यांचे सहकारी , शिक्षकवर्ग यांच्या अपार मेहनतीमुळे हा सेमिनार प्रचंड यशस्वी झाला. पालकांच्या समस्या सोडविताना अनेक नवीन गोष्टी सुद्धा शिकायला मिळाल्या. ग्लोबल च्या सर्व कार्यकारिणीला धन्यवाद,,सर्व पालकांचे मन:पूर्वक आभार...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, July 21, 2016

गुरुपौर्णिमा - एन आय माध्यमिक विद्यालय उरण

नमस्कार..!
नेटिव्ह इन्स्टिट्यूट माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज यांनी आयोजित केलेल्या 'गुरुपोर्णिमा ' निमित्त कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योगआला. सर्व शिक्षकांचा सत्कार आणि १० वी , १२ वी मध्ये प्राविण्य मिळालेल्या मुला-मुलींच्या मुलाखतींचा कार्यक्रम असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना खूप खूपआनंद झाला. पारंपारिक परंतु अत्यंत नाविन्यपूर्ण स्वरुपात विद्यार्थ्यांनीच या कार्यक्रमाचेआयोजन केले होते. नवीन पिढीच्या मनात आपल्या गुरुंविषयी श्रद्धा, आदर पाहिल्यानंतर त्यांचे कौतुक केल्यावाचून राहवले नाही. प्रसाद मांडेलकर, सन्माननीय प्राचार्य , आणि सर्व शिक्षकवृंद आणि विध्यार्थ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, July 18, 2016

नवी मुंबई - बंद ..! प्रकल्पग्रस्तांचा विजय असो ...!

नमस्कार..!
कुठेतरी एक सुंदर शेर वाचला होता...
"जिंदगी बीत जाति है, एक घर बनाने में...
तुम्हे तो वक्त हि नही लगता बस्तीया उजाडने में....! 
आज आमच्याच जागेवर बांधलेली घरे वाचविण्यासाठी आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागत आहे ...आम्ही प्रकल्पग्रस्त बांधवानी आपल्या जमिनी कवडीमोल किमतीत दिल्यानंतर हि नवी मुंबई अस्तित्वात आली आणि आज आमच्याच भूमीतआम्ही 'अनधिकृत' ? सगळे व्यवसाय, उद्योगधंदे , आमच्या उरावर आणून बसविल्यानंतर आताआमच्याच गावांना, घरांना, अनियमित घोषित करून ती तोडा....हाच एक पर्याय आहे का ? आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी नाकारणे हि कोणतं लोकशाहीच लक्षण आहे ? प्रकल्पग्रास्तांवरील अन्याय काही नवीन नाही...जन्मल्यापासून आम्ही तो झेलतआहोत.. इतक्या वर्ष सिडको, महानगरपालिका आणि तत्सम संस्थाआपल्या तोंडाला पानेच पुसत आल्याआहेत...पिढ्या नि पिढ्या या मातीत जगल्याआमच्या ...आमच्या साहिष्णूतेमुळे एवढेमोठेअत्याधुनिक शहर वसविता आले. आम्ही कधी या शहराच्या जडण घडणी मध्ये अडथळा निर्माण केला आहे का ? आमची बाजू समजून न घेता ..'फक्त तोडा' ..अशी ताठरपणाची भूमिका अधिकार्यांनी सोडावी..एवढीच विनंती...! .नाहीतर लढणे आमच्या रक्तात आहे.. यापुढे सुशिक्षित झालेला तरुण हि लढाई कायदेशीर स्तरावर हि लढेल....आजही प्रत्येक गोष्टआम्ही संघर्ष करूनच मिळविलीआहे...यापुढेही तो संघर्ष सुरूच राहील...!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, July 14, 2016

'केल्याने देशाटन ' आणि ग्रेट भेट ' नवीन दोन सदरे ब्लॉग वर सुरु करत आहे.

नमस्कार ...!
'गेल्या काही महिन्यात खूप प्रवास घडला..तसा आयुष्यात खूप कमी 'फिरलेला' माणूस असल्यामुळे या प्रवासाचं खूप औत्सुक्य होतं. पहिल्यांदाच परदेश ची सफर म्हणून थायलंड ची भेट घडली. आपल्यापैकी अनेक जण कदाचित या देशाला भेट देऊन आलेही असतील...! गेल्या काही दिवसात अल्पावधीतच थायलंड , मलेशिया आणि सिंगापूर या देशांना भेट देण्याचा योग आला. यातले काही बरे-वाईट अनुभव आपल्या बरोबर बोलावे असे मनात आले म्हणून 'केल्याने देशाटन ' हे सदर माझ्या ब्लॉग वर सुरु करत आहे. तसेच व्यवसाय, समाजकारण, राजकारण, कला, शिक्षण, संस्कृती या सर्व क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तिमत्व यांना भेटण्याचा योग येतो. यासाठी ब्लॉगवर 'ग्रेट भेट ' नावाची लेखमालिका सुरु करतआहे. या ना त्या निमित्ताने आपली रोज भेट घडावी हे खरे कारण ...! आपण या सर्वांचे स्वागत कराल याची खात्री आहे...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Sunday, July 10, 2016

Panamax Institute commences 10th batch of Diploma in Logistics & shipping

Namaskar ...!
Panamax Institute of Logistics and shipping commence 10th batch of Diploma in logistics & shipping. The orientation session was held at the Sai mandir vahal, panvel where students meet the faculty team and the operation team ..! 30 students have taken the admission for this course. Mr. Vinod Mhatre ( MD VHM Logistics ), Mr. Shekhar Mhatre ( Operation manager Cosco Shipping ) & Mr. Atul Dayal ( Sr. faculty in port operations ) & Mr. Jitendra Mhatre ( Nhava ) also present on this occasion. My special Thanks to Suraj Bhagat, Reena Gharat and Nilesh Thakur, they put tremendous effort to organise this batch. Thanks to all ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Friday, July 8, 2016

'Yal Tar Hasal' organized by Apcotex Industries Limited

Namaskar ...!
Performing my show ' Yal Tar Hasal' organized by Apcotex Industries Limited on their ' Executive and Management meet' . They celebrated my birthday on this occasion. It was a wonderful evening with them . I am extremely thankful to the management team and the entire Apcotex family for the respect & love. Special thanks to Mr. Sawant ( HR Head )
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, July 4, 2016

साई संस्थान, साईनगर वहाळ - २०० झाडे लावण्याच्या स्तुत्य उपक्रम

नमस्कार ...!
दि. १ जुलै - साई संस्थान ,साईनगर वहाळ आणि सन्माननीय रवीशेठ पाटील यांच्या माध्यमातून माझा वाढदिवस मंदिरात साजरा झाला आणि २०० झाडे लावण्याच्या स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि लगेचच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यासाठी' याल तर हसाल" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साई संस्थान, साईनगर वहाळ आणि सर्व मित्रमंडळी यांचे मन:पूर्वक धन्यवाद..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Sunday, July 3, 2016

१ जुलै- आपल्या शुभेच्छाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ...!

नमस्कार ..!
दि. १ जुलै २०१६ सकाळ पासून सगळीकडे जोरदार पाउस पडत होता आणि माझ्यावर वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत होता...सकाळी साई मंदिर वहाळ येथे श्री. रवीशेठ पाटील यांनी आयोजित केलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि नंतर " याल तर हसाल " चे सलग दोन कार्यक्रम या मुळे पूर्ण दिवस कधी संपला समजलेच नाही. whatsup , फोन, फेसबुक च्या माध्यमातूनआणि काहींनी प्रत्यक्ष भेटून जे प्रेम दिलत या मधून उतराई होणे कधीच शक्य नाही...माझे चाहते, मित्रमंडळी , विद्यार्थी , हितचिंतक आणि आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
जितना दिया भगवान ने मुझको
उतनी मेरी औकात नाही
ये तो करम है उनका वरना
मुझमे ऐसी कोई बात नही...!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवनम्हात्रे