Saturday, September 26, 2015

सर्वधर्म समभाव आरती - खांदेश्वर पोलिस स्टेशन - २५ सप्टे.२०१५

या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये खांदेश्वर पोलिस स्टेशन मध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबविला. श्री गणरायाची सर्व धर्मियांनी सामुहिक आरती करायची. .! हा उपक्रम करण्यासाठी  परिमंडळ -२ चे पोलिस उपायुक्त श्री विश्वास पांढरे , सहाय्यक पोलिस उपायुक्त श्री शेषराव सूर्यवंशी , श्री. देसाई साहेब यांच्या विशेष पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. या महाआरती मध्ये गणरायाला आरती करण्याचा मान अनेक मान्यवरांमध्ये मलाही मिळाला हे माझे मी सद्भाग्य समजतो.समाजाला एक नवी दिशा आणि प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमाचा भाग म्हणून उपस्थित राहण्याचा भाग्य मला मिळाले . श्री विश्वास पांढरे साहेब , श्री शेषराव सूर्यवंशी साहेब, देसाई साहेब आणि सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन ..! 

Wednesday, September 9, 2015

पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी विशेष कार्यक्रम

नमस्कार ...!
"याल तर हसाल " च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...!!! नवी मुंबई पोलिस अधिकारी , कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी " याल तर हसाल " चा विशेष प्रयोग सादर होतोय " वासुदेव बळवंत फडके " नाट्यगृहात..! शनिवार दिनांक १२ सप्टे. २०१५ सकाळी १० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अनेक मान्यवर पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवाय अर्जुन पुरस्कार विजेत्या अभिलाषा म्हात्रे चा विशेष सन्मान  सुद्धा होणार आहे. मुंबई पोलिसांसाठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार नेहमीच वर्षातून एकदा कार्यक्रम करतात. आपण ते टी.व्ही. वर पाहिले आहे. तेव्हा आपणही पोलिसांसाठी कार्यक्रम करून कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस दलाचे मनोरंजन करावे असे मनोमन वाटायचे. या कार्यक्रमच्या निमित्ताने हे स्वप्न पूर्ण होतेय आणि " याल तर हसाल " आणखी एक पाउल  पुढे जातोय...! श्री. विश्वास पांढरे ( पोलिस उपायुक्त परिमंडळ -२ ) आणि श्री. शेषराव सूर्यवंशी ( सहाय्यक पोलिस आयुक्त पनवेल विभाग ) यांचे मन:पूर्वक धन्यवाद ...! माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मन;पूर्वक आभार ...! 

ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट सेल ...!

नमस्कार ...!
ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट सेल च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला . शेतकरी कामगार पक्षाने हा समारंभ वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केला होता. तरुणांनी संपूर्ण सभागृह भरून गेले होते. ट्रेनिंग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर व्यासपीठावर हजार होते. त्या सर्वांमध्ये व्यासपीठ भूषविताना खूप अभिमान वाटला. माझर भाषण विशेष गाजले , सर्वाना आवडले ...अशी सर्वानी पोचपावती दिली. माझ्या भाषणाचे काही मुद्दे वरील बातमीत प्रसिद्ध झाले होते. ते माझ्या चाहत्यांसाठी देत आहे.
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .