Monday, December 26, 2016

'याल तर हसाल ' चा ६७० वा कार्यक्रम - रसायनी फेस्टिवल

नमस्कार ..!
कालचा 'याल तर हसाल ' चा ६७० वा कार्यक्रम संपन्न झाला रसायनी फेस्टिवल मध्ये ..या फेस्टिवल मध्ये कार्यक्रम व्हावा हि खूप वर्षापासून इच्छा होतीच ..मोहोपाडा या गावामध्ये नेहमीच रसिकांची गर्दी क्रिकेटचे सामने आणि इतर कार्यक्रमासाठी या मैदानावर सतत बघत आलो होतो. आजही अत्यंत उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. आयोजक आणि रसिकांचे मन;पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

एक्स - FACTOR - फुंडे हायस्कूल

नमस्कार ..!
तु.ह वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे या विद्यालयातील ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांबरोबर एक्स - FACTOR च्या माध्यमातून संवाद साधताना खूप छान वाटले. ज्या शाळेत आपलं शिक्षण झालंय त्या शाळेने पाहुणे म्हणून आपल्याला बोलाविणे हि खूप मोठे भाग्य ...! सर्व प्राध्यापक आणि मुख्याध्यापकांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Saturday, December 24, 2016

'याल तर हसाल " दिनानाथ नाट्यगृह - पहिला प्रयोग


नमस्कार ..! 
कालचा दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले मधील प्रयोग गाजला ..तो रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ..! चोखंदळ प्रेक्षकांसमोर कार्यक्रम करताना 'याल तर हसाल " टिकेल काय ?? हि शंका आता जवळ जवळ मुंबईतल्या सर्व नाट्यगृहांमध्ये जबरदस्त प्रतिसाद , प्रशंसा आणि समीक्षकाची पसंती मिळून दूर झाली आहे. रसिकांच्या हशा आणि टाळ्यांची पोचपावती घेऊन " याल तर हसाल " चे नाणे खणखणीत मुंबईत वाजते आहे ...५० दिवसात व्यावसायिक रंगभूमीवर २५ प्रयोग ...! ६७० प्रयोगांची पूर्तता ...! ......आता मुंबईबाहेर ..चा महाराष्ट्र खुणावू लागलाय ...! आपला आशीर्वाद हवा आहे ...! 
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Friday, December 9, 2016

"आदर्श पालकत्व " व्याख्यान - एक्स फॅक्टर - तासगावकर महाविद्यालय कर्जत - 9.12.2016

नमस्कार ..!
एक्स - फॅक्टर च्या माध्यमातून काल ' यादवराव तासगावकर' महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी संयुक्त मार्गदर्शनपर 'आदर्श पालकत्व ' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या कार्यक्रमाचे वौशिष्ट्य ..! विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना खूप आनंद झाला. तासगावकर महाविद्यालय, शिक्षक , पालक वर्ग यांचं मन:पूर्वक धन्यवाद ..! सौ.वंदना तासगावकर, श्री. महेश आणि वर्षा काशीद यांचे खूप खूप आभार ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Friday, November 25, 2016

" याल तर हसाल " चे पुन्हा एकदा तीन सलग कार्यक्रम ...!

नमस्कार ...!
" याल तर हसाल " चे पुन्हा एकदा तीन सलग कार्यक्रम ...!
आज २६नोव्हे. २०१६ - आचार्य अत्रे , कल्याण , वेळ - रात्री ८:३० वाजता
उद्या २७ नोव्हे. २०१६ - शिवाजी मंदिर, दादर ,वेळ - रात्री ७:३० वाजता
परवा २८ नोव्हे. २०१६ - रोहिंजन गाव , पनवेल , वेळ - रात्री ९:०० वाजता
- सर्वाना आग्रहाचे आमंत्रण ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, November 24, 2016

"याल तर हसाल " - MOMENTS - 001

नमस्कार ..!
'याल तर हसाल " ने अनेक अविस्मरणीय क्षण दिले..रसिकांच्या टाळ्या आणि हशे तर वाढतच आहेत ...शिवाजी मंदिर मध्ये कार्यक्रम करणे हे एक स्वप्न होते ..पण आपल्या आशीर्वांदाने आता जवळ जवळ प्रत्येक आठवड्यामध्ये शिवाजी मंदिर मध्ये कार्यक्रम होतोय .. ६५० चा कार्यक्रमाचा टप्पा पार झालाय ...रसिकांची संख्या वाढतेय तितकीच आमची जबाबदारी सुद्धा ...! निखळ , निकोप , संगीतमय , आगरी भाषेचा ठसका आणि मराठी भाषेची झळाळी घेऊन हा कार्यक्रम सर्वांचा लाडका होतोय ...शिवाजी मंदिर मध्ये कार्यक्रम संपताना रसिक मायबापांनी जे 'उभे राहून' मानवंदना दिली ...आम्हा कलाकारांना हा क्षण आयुष्यात विसरता येणार नाही. सर्वच कलाकारांना असे भाग्य लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना करतो ..."याल तर हसाल ' वर रसिकांचे प्रेम असेच उदंड राहू दे ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Friday, November 18, 2016

X- FACTOR Session - In T.H. Wajekar Jr. College, Funde, Uran

नमस्कार ..!
'X - Factor' चे आजचे सेमिनार तुकाराम हरी वाजेकर ज्युनिअर कॉलेज , फुंडे , उरण मध्ये झाले . ज्या कॉलेज मधून मी माझं ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षण पूर्ण केलं ...तेथील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधताना खूप आनंद वाटला. विद्यार्थ्यांनी एखाद्या मोठ्या Celebrity सारखी दिलेली वागणूक पाहून भारावून गेलो. आणखी एक महाविद्यालय आता X - Factor बरोबर जोडलं गेलंय याचा मनस्वी आनंद होताच परंतु मला माझ्या कॉलेज साठी काहीतरी करण्याचं भाग्य मिळतंय याच प्रचंड समाधान वाटलं . सन्माननिय प्राचार्य साहेब, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी प्रतिनिधी सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ..! श्री. प्रसाद मांडेलकर , सिद्धी ठाकूर आणि कविता आणि सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

लोककला गौरव पुरस्कार - २०१६

नमस्कार ..!
महाराष्ट्र लोक कल्याणकारी संस्था, नवीन पनवेल यांच्यातर्फे 'कला ' क्षेत्रातील पुरस्कार " लोकगौरव पुरस्कार २०१६ " साठी माझी निवड झाली आहे. येत्या २० तारखेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आपल्या सर्वांच्या आशीर्वादा मुळेच हे सर्व शक्य होत आहे. माझे सर्व चाहते, विद्यार्थी , हितचिंतक आणि मित्रमंडळी यांचा हा पुरस्कार आहे .सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
पुरस्कार ...
देतात प्रेरणा ..
नव काहीतरी करण्याची हिम्मत ...
जबाबदारी ..जबाबदारीने वागण्याची ...
आणि हो ..देतात खूप आनंद ..आणि त्याही पेक्षा जास्त ..
देतात ...समाजमान्यतेचे समाधान ...!!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Wednesday, November 16, 2016

"याल तर हसाल " चे पुन्हा एकदा तीन सलग कार्यक्रम ...

नमस्कार ..!
"याल तर हसाल " चे पुन्हा एकदा तीन सलग कार्यक्रम ...
१९ नोव्हे. १६ - आचार्य अत्रे नाट्यगृह , कल्याण , वेळ - रात्री ८:३० वाजता
२० नोव्हे .१६ - वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल , वेळ - रात्री ८:३० वाजता
२१ नोव्हे. १६ - प्रबोधनकार ठाकरे , बोरीवली वेळ - दुपारी ४:१५ वाजता
रसिक मायबापांचे मन :पूर्वक धन्यवाद ...! सर्वाना आग्रहाचे आमंत्रण ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, November 14, 2016

" याल तर हसाल " बद्दल ...आपला अभिप्राय द्या ..! ( फोटो असेल तर उत्तम )

नमस्कार .. !
तिकीट काढायला नोटांचा अभाव ... दिग्गज कलाकारांचे शो रद्द झालेले ....सगळ्या लोकांना नोटा बदलण्याची फिकीर, चिंता , काळजी आणि या सगळ्या तणावपूर्ण वातावरणात कोण येणार शो पाहायला ..? असे असताना सुद्धा " याल तर हसाल " ला प्रेक्षकांची गर्दी मुंबई , ठाणे, कल्याण , डोंबिवली, बोरीवली आणि नवी मुंबई मध्ये वाढतच चाललीय ....शिवाजी मंदिर मधला कालचा सलग ५ वा कार्यक्रम..! मायबाप रसिक प्रेक्षकांचे मन:पूर्वक धन्यवाद ..! आपल्याला एक नम्र विनंती आहे ..आपण आम्हां बरोबर जे छायाचित्र किंवा सेल्फी घेता ....तेआमच्याही संग्रही असावे असे वाटते ..( फक्त मोठ्या हुद्द्यावरील माणसांचे नव्हे तर एक सामान्य चाहता माझ्यासाठी खूप मोठा आहे ) आपण फोटोसहीत कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया दिलीत ..तर आम्ही त्याला 'याल तर हसाल " च्या FB पेज वर प्रसिद्धी देवू आणि आपला स्नेह आणखी वृद्धिंगत होईल ..! आपण whatsup वर पण प्रतिक्रिया आणि छायाचित्र देऊ शकता ..आपण ' याल तर हसाल " साठी एवढ कराल अशी मला खात्री आहे ...! रसिक मायबाप आणि त्यांचे प्रोत्साहन हीच "याल तर हसाल " आणि माझ्यासाठी प्रेरणा आहे.
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

चपराक -००५

आम्हाला कशाला नोटा बदलायच्या चिंता ?
व्यवहारात नाही आमच्या कसलाही गुंन्ता .!
        भले भले अर्थशास्त्री आता खाजविती डोके
         इतके दिवस यांना कसे दिसले नाही बोके ?
काहीही करू दे आम्हाला कसली भीती
ते करतात चिंता, ज्यांच्या लाचलुचपती
         आम्ही गरीब तरी हि आम्ही जबरदस्त
         कुठल्याही पक्षाचा नाही आम्हा वरदहस्त ..!
पुन्हा मध्यामानी आता पेटवायच्या मशाली
गरिबांनी गरिबांच्या पुसायच्या खुशाली
           कालचक्र सारखे हे फिरते आहे बरे
           कोण अन्यायाने जगतो , कोण न्यायानेच मरे ..!
शेवटी लोकशाही लोकशाही म्हणून आम्ही नाचू ..
तूर्तास थांबू , पुढच्या वेळी पुढचा अध्याय वाचू ...!!!
                                                       - संजीवन म्हात्रे . ( चपराक ००५ )

Tuesday, November 8, 2016

"याल तर हसाल " चे मुंबईत सलग १२ कार्यक्रम ...!

नमस्कार ..!
खूप दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला ..आपल्याशी संवाद साधायला ..१७ तारखेपासून ..आजपर्यंत सलग १२ प्रयोग केले ...१७, २७ ऑक्टो. गडकरी रंगायतन ठाणे, १९ ,२५ ऑक्टो.आणि २ नोव्हे. शिवाजी मंदिर दादर , २२, ३० ऑक्टो.आचार्य अत्रे कल्याण, ३ नोव्हेंबरला प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली आणि पुन्हा गडकरी ठाणे असे एकाच दिवशी दोन प्रयोग , २८ ऑक्टो. ला विष्णुदास भावे आणि ६ ऑक्टो . वासुदेव बळवंत पनवेल मधील कार्यक्रम ...! एवढ्या वेगाने हे सर्व झाले कि उसंत नव्हती अजिबात ...! नेहमीप्रमाणे फोटो देणे, कार्यक्रमाबद्दल लिहिणे ,शक्य होत नव्हते ..अनेक दिग्गजांनी मुंबईत हा कार्यक्रम पहिला ...अनेक समीक्षकांनी पाहून समीक्षण लिहिली ..( एकामागून एक जशी येताहेत छापून तशी देतोच आहे ) सर्व रसिक प्रेक्षकांनी आम्हाला हे व्यावसायिक यश मिळवून दिले त्या रसिकांचे ऋण या जन्मात तरी फिटणे शक्य नाही ..! या वाटचालीमध्ये अनेक मित्रमंडळी ,चाहते, मार्गदर्शक,आणि माझी टीम यांचा खूप मोठा वाटाआहे ...रसिकांना हसून हसून दमछाक करणारा एक निखळ हास्य देणारा आणि हसता हसता जीवनदृष्टी देणारा कार्यक्रम करू शकलो, रुजवू शकलो , टिकवु शकलो आणि आपल्या सहकार्याने वाढवू शकलो ..यामध्येच माझे आणि माझ्या टीम च्या जन्माचे सार्थक झाले आहे...असेच मला वाटते ...परंतु अजून खूप मोठा पल्ला आहे ...प्रथम १००० प्रयोगांचा टप्पा गाठायचा आहे. माझ्या रसिकांच्या आशीर्वादाने हे सर्व सहज शक्य होईल असे वाटतेय .!असेच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Tuesday, October 25, 2016

ग्रेट भेट - अरविंद सावंत ( शिवाजी मंदिर , दादर )

ग्रेट भेट - अरविंद सावंत ( शिवाजी मंदिर , दादर )
" याल तर हसाल " चा शिवाजी मंदिर मधील पहिलाच प्रयोग, प्रेक्षकांची संख्या कमी आणि तरीही पहिल्या रांगेत एक रुबाबदार व्यक्ती कार्यक्रम करताना सतत लक्ष वेधून घेत होती ..प्रोत्साहन देत होती , टाळ्या वाजवत होती ...कार्यक्रम संपल्यानंतर ती व्यक्ती माझे अभिनंदन करण्यासाठी पुढे आली ...मी त्यांन नमस्कार केला ..आणि पाठीमागून कुणीतरी ओळख करून दिली ..हे अरविंद जे.के.सावंत ..शिवाजी मंदिर चे सर्वेसर्वा ...! त्यांना "याल तर हसाल' खूप आवडला ..त्यांनी माझ्या कार्यकारी निर्मात्यांचे एक चांगला कार्यक्रम आणि एक चांगला कलाकार शिवाजी मंदिर ला आणलात म्हणून अभिनंदन केले . माझे खूप खूप कौतुक केले त्यांनी ...आणि लगेच आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये सर्व कलाकारांना पाहुणचार दिला ..आम्ही आमचा त्यांनी केलेला हा बहुमानच समजतो ...खूप मस्त गप्पा झाल्या ..१९४३ पासून चा शिवाजी मंदिर चा इतिहास त्यांनी आम्हाला सांगितला . पितृभक्त असलेले सावंत साहेब ..तितकेच दिखुलास ...आणि ७५ वर्षांचे तरुण वाटले . त्यांनी आग्रहाने त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याजवळ माझ्याबरोबर छायाचित्र काढले . खरं शिवाजी मंदिर चे मुख्य विश्वस्त आम्हाला इतका सन्मान देतात...आमच्याविषयी गौरवोद्गार काढतात ...आणि ते सुद्धा पहिल्या प्रयोगाच्या वेळी ..! आम्ही सर्व कलाकार त्यांच्या प्रेम आणि आदरातिथ्याने भारावून गेलो. अनेक महान कलाकारांनी आपल्या कलेने शिवाजी मंदिर ला कार्यक्रम केले ...त्यांच्या केलेने पावन झालेल्या रंगमंचाला आम्ही सर्व कलाकारांनी वंदन केले आणि कृतकृत्य भावनेने ..परत निघालो ...( याल तर हसाल - नाबाद ६४६ )
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Thursday, October 20, 2016

" याल तर हसाल " ( ६४४ ) चा 'शिवाजी मंदिर' येथील पहिला कार्यक्रम...!

नमस्कार..!
काल " याल तर हसाल " चा'शिवाजी मंदिर' कार्यक्रम झाला..! एक स्वप्न अखेर पूर्ण झाले..! अनेक वर्ष हे स्वप्न उराशी बाळगून चाललो होतो...माझ्या चाहत्यांनी, रसिकांनी, मित्रमंडळी आणि सर्वानीच मला सतत प्रोत्साहित केलं..! माझ्या कडे शब्द नाहीत..शिवाजी मंदिराच्या रंगमंचावर प्रयोग करताना मला काय वाटत असेल ...या ठिकाणी अनेक नाटके, अनेक वेळा येऊन पहिली होती..परंतु " याल तर हसाल" चा प्रयोग इथे होणे , रसिकांनी त्याला भरभरून दाद देणे...आणि चक्क शिवाजी मंदिराच्या मालकांनी श्री.अरविंद जे.के. सावंत यांनी तो कार्यक्रम पूर्ण पाहून माझ्या टीम ला बोलावून गप्पा मारणे ..! दुसऱ्या दिवशी सामना ने या कार्यक्रमाची दखल घेणे सारेच अनाकलनीय...आनंदीआणि तरीही इतक्या वेगाने...कि अस वाटलं इतक्या वर्षाच्या मेहनतीच फळ मिळतंय...अजून खूप पुढे जायचे बाकी आहे ...माझी संपूर्ण टीम, रवीशेठ पाटील, महेंद्र दळवी, शिरीष अहिरे, दीपक जाधवआणि माझे रसिक प्रेक्षक सर्वांच्या उपकरातून उतराई होणे शक्य नाही...!! हे रंगदेवते तुझा आशीर्वाद आम्हा सर्वांवरअसाच कायमअसूदे...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Tuesday, October 18, 2016

गडकरी रंगायतन मधील पहिला कार्यक्रम -" याल तर हसाल " ( ६४३ )

नमस्कार..!
"याल तर हसाल " चा ६४३ वा कार्यक्रम गडकरी रंगायतन मध्ये पार पडला. गडकरी मधला पहिलाच शो ,आणि त्या मध्ये सोमवारचा दिवस तरी सुद्धा रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. गडकरी मध्ये कार्यक्रम व्हावा हे माझेच नव्हे तर माझ्या टीम चे, तमाम रसिकांचे , माझ्या मित्रमंडळीचे आणि सर्वांचेच स्वप्न आज साकार झाले आणि 'याल तर हसाल' च्या शिरपेचात एक मनाचा तुराआणखी खोवला गेला. जबरदस्त कार्यक्रम झाल्यानंतर हळूच कुठे तरी मनाला वाटलं आज गडकरी रंगायतन चा गड जिंकला पण १९ तारखेला नाट्य पंढरी शिवाजी मंदिरला हास्यकल्लोळात डुंबवायचे आहे आणि माझ्या रसिकांच्या जोरावर ते हि होऊन जाईल....फक्तआपला सर्वांचाआशीर्वाद शुभेच्छा आणि  सहकार्य ..हव आहे..खर म्हणजे तोच याल तर हसाल चा श्वास आहे...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Friday, October 14, 2016

Releasing X- FACTOR Brochure


From the Day we announce " X- factor " ...everybody is curious and inquisitive about the Concept. Sanjeevan Marg had a mission to change the life of 1 lakh students all over the Maharashtra through this concept. releasing the informative brochure for the participants & friends. Kindly attend the Free Seminars in your nearest area and support the cause. Many thanks for your support and co-operations.
Upcoming Seminar - on 16th Oct. 2016. MP hall JNPT Township. Timing - Morning 10;00 to 13;00
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Wednesday, October 12, 2016

"याल तर हसाल ' न्हावा , उरण येथील नवरात्रीतील कार्यक्रम ..!

नमस्कार...!
न्हावा , उरण येथील "याल तर हसाल " चा कार्यक्रम विशेष स्मरणात राहील असाच झाला. प्रचंड गर्दी , हशा, उत्साह, टाळ्या यामध्ये तीन तास कधी उलटून गेले समजले नाही. पावसाची तमा न बाळगता रसिकांनी केलेली गर्दी विशेष स्मरणात राहील अशीच...! सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Friday, October 7, 2016

'मार्ग सुखाचा ' व्याख्यान - खिडकी गाव ( अलिबाग )



नमस्कार...!
नवरात्री निमित्त माझ्या ' मार्ग सुखाचा' या व्याख्यानाचेआयोजन खिडकी ( अलिबाग ) या गावामध्ये श्री. आल्हाद पाटील यांच्या व्ही. जी. पाटील एज्युकेशनल फौंडेशन च्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजीत केला होता. २;३० तास रंगलेल्या या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांनी उत्तम साथ दिली. पाऊसाचे सावट असून सुद्धा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. 'याल तर हसाल ' चे दोन कार्यक्रम या गावातअगोदरच झालेआहेत..तरी सुद्धा त्या इमेज ला बाजूला ठेवत रसिकांनी हे व्याख्यान एन्जोय केले या बद्दल सर्व रसिकांचे आणि श्रोत्यांचे मन:पूर्वक धन्यवाद...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Friday, September 30, 2016

भारतीय सैनिकांना मनाचा मुजरा ..! साष्टांग दंडवत ...!

नमस्कार ..!
भारतीय जवानांनी केलेल्या "सर्जिकल ऑपरेशन " नंतर संपूर्ण जगाने भारतीय सैन्याची मुक्त कंठाने  स्तुती केली. अभिमानाने उर भरून आला. संपूर्ण विश्वाला त्राहीमाम करणाऱ्या अतिरेक्यांना असा धडा  शिकविणारी भारतीय सेना ...त्यांच्याविषयी काय लिहावं...जे काही सुचलं...ते भारतीय सैनिकांना अर्पण ..!
      आम्ही भ्याड हल्ले करत नाही ..
           घरात घुसून मारतो ....
               भारतमातेचे सुपुत्र  आम्ही
                    निधड्या छातीने लढतो ..!

      एका हल्ल्याने पाकड्यांची एवढी हालत  खराब ..
           झोपू शकणार नाही आता नवाझ शरीफ जनाब
               आता पुन्हा पाठवून पहा कसाब...
                   एका एका थेंबाचा घेऊ आम्ही हिसाब ..

      अतिरेकी अतिरेकी म्हणून किती अतिरेक
           घुसखोर  दहशतवादी , सगळा पाकिस्तानी 'मेक '
                उरीचा बदला, उरावर बसून घेतला आहे
                     देशभक्तीने प्रत्येक भारतीय पेटला आह
   
       पाक आता नाक पुन्हा वर करणार नाही
            आणि केलेच तर त्याची 'गर्दन ' उरणार नाही
                    - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे


Sunday, September 18, 2016

पूर्व विभाग स्पोर्ट्स अकॅडेमी - एक आठवण - २०१०

नमस्कार ..!
गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमधून रोजआपल्याबरोबर संवाद साधने कठीणच होत होते....त्यामुळे कार्यक्रमाचे अपडेट्स देता आले नाहीत. जुनी हार्ड डिस्क तपासून पाहताना हा फोटो सापडला. फार जुना नाही..२०१० चाआहे. ६वर्षापूर्वीचा मी बघताना जरा भूतकाळात रमलो. आणि पूर्व विभाग स्पोर्ट्स चे दिवस आठवले...त्यावेळी केलेली वाचनालयाची सुरुवात , क्रिकेट अकॅडेमीची स्थापना, स्पोकेन इंग्लिश चे क्लासेस..सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव स्पर्धा , त्यांचे भव्य बक्शिश समारंभ... हुतात्मा स्मारकांची सफाई,...एक न अनेक गोष्टी आठवल्या ...आणि माझ्या त्या वेळच्या सर्व बहादूर शिलेदारांची , मित्रांची आठवण झाली. आज हिअनेक समाजोपयोगी कामांमध्ये रमतो ...पण ते दिवस काही वेगळेच होते ..! माझ्या त्या सर्व तरुण मित्रांन साठी हि एकआठवण ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Friday, September 2, 2016

तासगावकर महाविद्यालय कर्जत मध्ये ' एक्स factor " चे सेमिनार

नमस्कार ..!
'X - फॅक्टर' ची यादवराव तासगावकर महाविद्यालय मध्ये खूप सुंदर सुरुवात झाली. सेमिनार ला उपस्थित असलेल्या 300 विद्यार्थ्यांपैकी 290 युवक - युवतींनी 'X - फॅक्टर ' साठी नावे नोंदविली. गेली 4 -5 वर्षे तासगावकर महाविद्यालयामध्ये 'संजीवन मार्ग ' च्या माध्यमातुन ' मोटिवेशनल सेशन्स' आयोजित केले जातात. ' विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकास' हा वसा घेतलेल्या या महाविद्यालयामध्ये असे अनेक उपक्रम राबविले जातात. 'X - फॅक्टर' ला आपण दाखवीलेल्या उत्सफूर्त प्रतिसादाबद्दल सर्व विद्यार्थी, मॅनॅजमेण्ट, शिक्षकवृंद आणि सर्वांचेच मन:पूर्वक धन्यवाद ..! सौ. वंदना तासगावकर, श्री. महेश काशीद आणि Miss. शेरीन यांचे विशेष आभार ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Thursday, September 1, 2016

'X- FACTOR" - ची लोकप्रियता तरुणांमध्ये वाढतेय ..!

नमस्कार..!
x - FACTOR हि तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरु केलेली धडपड आता गावा - गावां मध्ये पोहोचत आहे. शिक्षणामध्ये कसून मेहनत करणाराआपला तरुण व्यक्तिमत्व विकास, सभाधीटपणा, वेळेचे योग्य नियोजन, तणाव नियंत्रण इत्यादी अनेक गोष्टींमुळे स्पर्धेत मागे पडतोय. आयुष्याचे ध्येय लवकर न सापडल्यामुळे अनावश्यक ठिकाणी आपली शक्ती खर्च करताना दिसतोय..! x - factor ने या सर्व तरुणांना आशेचा किरण दिलाय...आणि म्हणूनच रोज अनेक तरुण विद्यार्थी - विद्यार्थिनी , शिक्षकआणि नागरिक सुद्धा जोडले जातआहेत...अनेक महाविद्यालये सुद्धा या उपक्रमा मध्ये सहभागी होतआहेत. असेच काही ध्येय वेडे तरुण माझ्या निवास्थानी येऊन भेटले आणि x- factorसाठी आम्ही मेहनत करायला तयारआहोत असे सांगितले. त्यांचा उत्साह पाहून खूपआनंद झालाआणि हुरूप सुद्धा वाढला. x- factor ची संपूर्ण टीमअत्यंत निस्वार्थी पणे या नवीन तरुणाई घडविण्याच्या मोहिमेत झोकून देऊन काम करत आहे. अधिक माहिती साठी कृपया संपर्क साधावा ...९८३३६१७९१५.
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Wednesday, August 31, 2016

कौटुंबिक श्रावण मेळावा - खांदा कॉलोनी - अलर्ट सिटीझन ग्रुप

नमस्कार !
दि  . 28 ऑगस्ट 2016 - खांदा कॉलोनी मधील 'मॉर्निंग योगा ग्रुप' , ' संजय भोपी सोशल वेल्फेअर क्लब' आणि ' अलर्ट सिटीझन फोरम' यांच्या संयुक्त विद्यमाने कौटुंबिक श्रावण मेळावा ' आयोजित केला होता . या निमित्त माझ्या ' मार्ग सुखाचा ' या व्याख्यानाचे आयोजन केले होते. अत्यंत उत्साहपूर्वक अनेक कुटुंबे यामध्ये सामील झाली होती . श्री . संजय पाटील , श्री संजय भोपी आणि श्री. सावंत आणि त्यांचे सहकारी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली . अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात या तीनही संस्था खांदा कॉलोनी मध्ये अग्रेसर असतात. तरुण मुले , महिला आणि वृद्ध सुद्धा या कार्यक्रमामध्ये विशेष सहभागी झाले होते . सर्वांचे मन:पुर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Tuesday, August 30, 2016

'याल तर हसाल ' ची 'Afternoon' या इंग्रजी दैनिकानी घेतली दखल...!

नमस्कार ..!
' याल तर हसाल' ची दखल आता इंग्रजी दैनिके सुद्धा घेऊ लागली आहेत. सर्व महत्वाच्या मराठी दैनिकांनी 'याला तर हसाल ' ला मनापासून प्रसिद्धी दिल्यानंतर आता 'आफ्टरनून ' या वर्तमानपत्राने 'याल तर हसाल ' बद्दल लिहिले त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, August 29, 2016

साम वाहिनीवर एक तास LIVE मुलाखत - २५ ऑगस्ट २०१६

दि. २५ ऑगस्ट २०१६ - 'साम मराठी ' या वाहिनीवर एक तास LIVE होतो . मुलाखती मधला पहिला ब्रेक झाल्यावर मी सहज विचारलं ..हे कधी टेलीकास्ट करणार ?  ते म्हणाले ...तुम्ही LIVE आहात आता...मग लगेच कसातरी एक msg पाठविला ...आणि आपण सर्वांनी अल्पावधीतच हि गोष्ट सर्वांपर्यंत नेलीत ... खूप खूप धन्यवाद ..! एक स्वप्न साकार झाले ...."याल तर हसाल "  आणि आगरी भाषा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचविण्याचे ...! मुलाखत छान झाली असे अनेकांनी whatsup आणि फोन करून कळविले ...सर्वांचे आणि साम वाहिनीचे मन:पूर्वक धन्यवाद ...! 
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे  

Monday, August 22, 2016

'संजीवन मार्ग' आणि ' आगरी कोळी युथ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'नेतृत्वगुण विकास शिबीर "

नमस्कार ..!
दिनांक २१ ऑगस्ट २०१६ रोजी आगरी-कोळी युथ फाउंडेशन च्या सेन्ट्रल टीम मेंबर्स साठीचे एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबीर “नेतृत्वगुण विकास, सरावाकडून प्रभावाकडे...” हे कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर येथे यशस्वी रित्या पार पडले.
हास्यप्रबोधनकार आणि आगरी-कोळी समाजाचे सुपुत्र श्री संजीवन म्हात्रे यांच्या “संजीवन मार्ग” ह्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले गेले. सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या ह्या शिबीराची सांगता सायंकाळी ७ वाजता झाली.एकूण चार भागात झालेल्या ह्या शिबिरा मध्ये, पहिल्या भागात नेतृत्वगुणांच्या विविध पैलूंबद्दल माहिती दिली गेली, तर दुसर्या भागात टाईम मॅनेजमेंट बद्दल मार्गदर्शन केले गेले.दुपारी मध्यान्ह भोजना उपरांत सभेत कसे बोलायचे ह्यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन दिले गेले,
एकूण ९ तास सुरु असलेल्या या शिबिरात उपस्थितांचा उत्साह सुरुवातीपासून शेवट पर्यंत तितक्याच जोमाने टिकवून ठेवण्याचे खरे श्रेय जाते ते श्री संजीवन म्हात्रे यांना, तसेच शिबीर आटोपल्यावर खूप काही सोबत घेऊन जात आहोत अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली, फाउंडेशन सोबत जोडल्या गेल्या हिऱ्यांना वेळोवेळी पैलू पाडण्याची जबाबदारी आगरी-कोळी युथ फाउंडेशन आणि संजीवन मार्ग यांनी यावेळी संयुक्तपणे स्वीकारली.
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.
(शब्दांकन - टीम आगरी-कोळी युथ फाउंडेशन )

Tuesday, August 16, 2016

एक्स Factor चा शुभारंभ - सर्वोदय विद्यालय निळजे , डोंबिवली

नमस्कार..!
'एक्स factor' ची सुरुवात सर्वोदय विद्यालय निळजे डोंबिवली पासून १३ऑगस्ट २०१६ ला दिमाखात झाली. एकूण ४५० विद्यार्थी या कार्यक्रमासाठी वर्षभरासाठी सहभागी झालेआहेत. संस्थेचे संचालकश्री. महेंद्र पाटील यांना 'एक्स factor " चे संपूर्ण CONCEPT एवढेआवडले कि त्यांनी संपूर्ण शाळेसाठी याconcept ची निवड केली. 'एक्स factor ' चे ट्रेनर्स सौ. वर्षा काशिद आणि श्री. अनिल भोईर यांनी सुद्धा प्रशिक्षण दिले . सर्वोदय शाळेची शिस्त आणि विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी असलेली धडपड प्रत्येक क्षणाला जाणवत होती. संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमात सर्व शिक्षकवर्ग सुद्धा अत्यंत उत्साहाने समाविष्ट झाला त्याबद्दल सर्वांचे :पूर्वक धन्यवाद..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, August 11, 2016

याल तर हसाल' स्पेशल - ०२


नमस्कार ..!
कार्यक्रम कुठे हि असू दे..कोणताही तालुका , जिल्हा... माझी लहानग्यांशी लगेच गट्टी जमते ..! banner वरअसलेल्या चेहऱ्याचा माणूस त्यांच्याशी बोलतोय याचे त्यांना खूप कुतूहल असते. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद , विस्मय, आणि एक मस्त निरागसता असते. ती मला मोहित करते. मी त्यांच्यात माझं बालपण शोधतो ..स्वत:ला त्यांच्यात बघतो..कदाचित एक मोठा कलाकार त्यांच्यात दडलेलाअसेल..! पहिल्यांदा ते घाबरतात, बुजतात, आयोजक त्यांना ' ए पळा रे..इथून..असे म्हणत दूर करण्याचा प्रयत्न करतात..पण मी स्वतःच त्यांच्यात रमतो...हळूहळू ती मुलं मस्त बिनधास्त होतात..शाळेतल्या कविता..सॉरी पोएम बोलतात...आणि याल तर हसाल च्या अगोदर मस्त एक छोटासा कवितांचा कार्यक्रम होतो...हळूच ते चेष्टा मस्करी करत गावातल्या बऱ्याच गोष्टी मला सांगतात.... सुचवितात..आणि मी कार्यक्रमाच्याअगोदर मस्त 'pure' होतो. त्यांची निरागसता आणि तरीही कुणालाही न दुखावणारा मिस्किलपणा खोडकर वृत्ती कार्यक्रमातआणण्याचा प्रयत्न करतो..!
.गुलजारसहजलिहूनजातात...
ए जिंदगी ..तू मेरा बचपन छीन सकती है...
..............मेरा बचपना नही....!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Tuesday, August 9, 2016

' याल तर हसाल' स्पेशल - ०१

नमस्कार ..!
'याल तर हसाल' ने आतापर्यंत ६१४ प्रयोग पूर्ण केलेत. सुरुवात केल्यापासून या कार्यक्रमाने कधीच मागे वळून पहिले नाही. या कार्यक्रमाने मला काय दिले हे मला शब्दात वर्णन करणे अशक्यआहे ...फक्त एकच सांगेन, या कार्यक्रमामुळे माझ्या जन्माचे ' सार्थक' झाले...!!! अनेक बरे वाईट अनुभव , असंख्य खाचखळगे , अपमानआणि निंदा आणि त्याच्या हजार पटीने मानसन्मान , गौरव, प्रसिद्धी, लोकप्रियता, ( अर्थात थोडा फार पैसा सुद्धा ..! ) मिळवून दिला ...! खरे म्हणजे हा कार्यक्रम नसता तर' संजीवन म्हात्रे " हे नाव सुद्धा नसतं...! आज रसिकांची, आबालवृद्धांची, समाजकारणी आणि राजकारण्यांची सुद्धा पहली पसंती या कार्यक्रमाला मिळते हेआम्हा कलाकारांचे थोरभाग्यच..! रसिक , माझे कलाकार आणि ' याल तर हसाल चेआता पर्यंतचे सर्व प्रयोग , या सर्वांबरोबरचा हा प्रवास खूप मोठा होता.....आणि आहे !
आता 'याल तर हसाल चा वेग वाढतोय...तो हजार प्रयोगाच्या दिशेने झेपावतोय परंतु जरा मागे वळून पाहावेसे वाटले म्हणून काही अनुभव शेअर करणार आहे "याल तर हसाल स्पेशल मध्ये...! गर्दीआणि ' याल तर हसाल हे नेहमीच एक समीकरण राहिलं. सदरचा फोटो गेल्या वर्षीच्या चिरनेरच्या महागणपती समोरच्या कार्यक्रमाचा...चिरनेर गावचे उदंड आशीर्वाद आम्हाला सदैव मिळत असतात ...या रसिकांच्या प्रेमातून उतराई होणे जन्मोजन्मी शक्य नाही...!
आपला सर्वांचा- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

'बार्न्स महाविद्यालय' पनवेल मधील 'एक्स फॅक्टर सेमिनार

नमस्कार ..!
7 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या 'बार्न्स महाविद्यालय' पनवेल मधील 'एक्स फॅक्टर' च्या सेमिनार ला तरुण युवक विद्यार्थ्यांनी सुरेख प्रतिसाद दिला. त्यांचा हा सळसळता उत्साह पाहून 'एक्स फॅक्टर' ची वेगाने घोडदौड सुरु झाली आहे . ' युवकांचा सर्वांगीण विकास' हा ध्यास संपूर्ण टीम ने घेतला आहे. सन्माननीय श्री. शिवदास कांबळे सर आणि सन्माननिय श्री. जाधव सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनीं आणि विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Sunday, August 7, 2016

Stress management session at 'Aviation Academy'

नमस्कार ..!
नवी मुंबई एव्हिएशन अकॅडेमी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ' संजीवन मार्ग ' च्या माध्यमातून ' 'तणाव नियंत्रण ( स्ट्रेस मॅनेजमेंट ) या माझ्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मुलांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 'संजीवन मार्ग ' च्या माध्यमातून आयोजित केलेलं या संस्थेसाठी हे तिसरे व्याख्यान होते . सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Friday, August 5, 2016

' कलास्वमिनी कथ्थक नृत्य' या संस्थेच्या ' कलागुण दर्शन '

नमस्कार...!
माझे मित्र श्री.अनिल शेंडे आणि त्यांच्या पत्नी सौ. नेहा शेंडे यांच्या अथक प्रयत्नांतून साकारलेल्या ' कलास्वमिनी कथ्थक नृत्य' या संस्थेच्या ' कलागुण दर्शन ' यावासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगलेल्या या सोहळ्यात मला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योगआला.कथ्थक विषयी ज्ञानात भर पडली. कथ्थक चा क माहिती नसलेल्या मला दीपप्रज्वालनाचा मान मिळाल्यामुळे जरा चुकल्यासारखेच वाटत होते. परंतु आयोजकांचा आग्रह आणि प्रेम यापुढे काही चालले नाही. अनेक विद्यार्थ्यांनी खूप सुंदर नृत्याविष्कार सादर केले. याचे सारे श्रेय त्या विद्यार्थ्यांची मेहनत , सौ. नेहा शेंडे यांचे मार्गदर्शन आणि सर्व पालकांचा सहभाग यांनाच दिले पाहिजे. सर्वांचे मन;पूर्वक अभिनंदनआणि धन्यवाद..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

मंदार दोंदे यांनी " बलात्कार " ची लिहिलेली बातमी ...!

नमस्कार ..!
काल मंदार दोंदे यांनी ' कर्नाळा' मध्ये बलात्कार या विषयावर सुंदर लेख लिहिताना ' याल तर हसाल ' या कार्यक्रमामधील 'तुमची बहीण सुरक्शित हवी असेल तर दुसऱ्याच्या बहिणीला मन द्या रे ' या माझ्या कवितेचा आणि माझा आवर्जून उल्लेख केला. श्री. मंदार दोंदे यांचे मन:पूर्वक धन्यवाद ..! आपण या सुंदर लेखाद्वारे या समस्येचा छान वेध घेतला आहे. कर्नाळा आणि आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Friday, July 29, 2016

केल्याने देशाटन : ०१ - कोरल बेट, THAILAND

नमस्कार ...!
बेट ...( मग ते कोणतंहीअसो , कोणत्याही देशातील असो ) मला पहिल्या पासून आकर्षित करतं. चारही बाजूला समुद्राचं निळशार पाणी आणि संपूर्ण जगापासून तुटलेले आपण ...मनात एकवेगळीच भावना निर्माण करतं..! म्हणून Thailand च्या भेटीत असे एखादा बेटावर जायचं ठरविलेच होते. Pattaya च्या दोन दिवसाच्या भेटीत अर्धा दिवस बेटावर घालवावा असे नियोजन होते. Pattaya शहरापासून स्पीडबोट ने १तासाच्या अंतरावर हे कोरल बेटआहे. पारदर्शी निळ्या समुद्रातून प्रवास करताना अंगावर रोमांच उभे राहिले. या पूर्वी फक्त अशा समुद्रावर नायक - नायिकेची हिंदी चित्रपटातील गाणी च पहिली होती. आज प्रत्यक्षात ते सृष्टीसौंदर्य अनुभवत होतो...4 किमी लांब आणि 2 किमी रुंद असलेल्या या बेटावर फारशी मनुष्यवस्ती नाही..परंतु पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असे हे स्थळ आहे...वरती निळाशार आकाश आणि आणि खाली त्याचेच प्रतिबिंब असलेला समुद्र...! निसर्ग मानवाला एवढं सुख घेऊन येतो...आपण मात्र त्याच्या सान्निध्यात जात नाही...एकदातरी सिमेंटच्या जंगलातून निघून निसर्गाच्या सौंदर्याची चव मनमुराद चाखायला हवी नाही का..?
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, July 25, 2016

'ग्लोबल इंग्लिश स्कूल' दिवा, ठाणे - 'आदर्श पालकत्व ' या विषयावर सेमिनार

नमस्कार..!
'ग्लोबल इंग्लिश स्कूल' दिवा, ठाणे यांच्या माध्यमातून 'आदर्श पालकत्व ' या विषयावर ' संजीवन मार्ग ' तर्फे माझ्या सेमिनारचेआयोजन केले होते. पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्यामुळे सकाळ आणि दुपार या दोन सत्रात सेमिनारआयोजित करावा लागला. ' ग्लोबल स्कूल' चे नेटकेआयोजन,संस्थेचेअध्यक्ष श्री. महेंद्र दळवी आणि त्यांचे सहकारी , शिक्षकवर्ग यांच्या अपार मेहनतीमुळे हा सेमिनार प्रचंड यशस्वी झाला. पालकांच्या समस्या सोडविताना अनेक नवीन गोष्टी सुद्धा शिकायला मिळाल्या. ग्लोबल च्या सर्व कार्यकारिणीला धन्यवाद,,सर्व पालकांचे मन:पूर्वक आभार...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, July 21, 2016

गुरुपौर्णिमा - एन आय माध्यमिक विद्यालय उरण

नमस्कार..!
नेटिव्ह इन्स्टिट्यूट माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज यांनी आयोजित केलेल्या 'गुरुपोर्णिमा ' निमित्त कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योगआला. सर्व शिक्षकांचा सत्कार आणि १० वी , १२ वी मध्ये प्राविण्य मिळालेल्या मुला-मुलींच्या मुलाखतींचा कार्यक्रम असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना खूप खूपआनंद झाला. पारंपारिक परंतु अत्यंत नाविन्यपूर्ण स्वरुपात विद्यार्थ्यांनीच या कार्यक्रमाचेआयोजन केले होते. नवीन पिढीच्या मनात आपल्या गुरुंविषयी श्रद्धा, आदर पाहिल्यानंतर त्यांचे कौतुक केल्यावाचून राहवले नाही. प्रसाद मांडेलकर, सन्माननीय प्राचार्य , आणि सर्व शिक्षकवृंद आणि विध्यार्थ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, July 18, 2016

नवी मुंबई - बंद ..! प्रकल्पग्रस्तांचा विजय असो ...!

नमस्कार..!
कुठेतरी एक सुंदर शेर वाचला होता...
"जिंदगी बीत जाति है, एक घर बनाने में...
तुम्हे तो वक्त हि नही लगता बस्तीया उजाडने में....! 
आज आमच्याच जागेवर बांधलेली घरे वाचविण्यासाठी आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागत आहे ...आम्ही प्रकल्पग्रस्त बांधवानी आपल्या जमिनी कवडीमोल किमतीत दिल्यानंतर हि नवी मुंबई अस्तित्वात आली आणि आज आमच्याच भूमीतआम्ही 'अनधिकृत' ? सगळे व्यवसाय, उद्योगधंदे , आमच्या उरावर आणून बसविल्यानंतर आताआमच्याच गावांना, घरांना, अनियमित घोषित करून ती तोडा....हाच एक पर्याय आहे का ? आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी नाकारणे हि कोणतं लोकशाहीच लक्षण आहे ? प्रकल्पग्रास्तांवरील अन्याय काही नवीन नाही...जन्मल्यापासून आम्ही तो झेलतआहोत.. इतक्या वर्ष सिडको, महानगरपालिका आणि तत्सम संस्थाआपल्या तोंडाला पानेच पुसत आल्याआहेत...पिढ्या नि पिढ्या या मातीत जगल्याआमच्या ...आमच्या साहिष्णूतेमुळे एवढेमोठेअत्याधुनिक शहर वसविता आले. आम्ही कधी या शहराच्या जडण घडणी मध्ये अडथळा निर्माण केला आहे का ? आमची बाजू समजून न घेता ..'फक्त तोडा' ..अशी ताठरपणाची भूमिका अधिकार्यांनी सोडावी..एवढीच विनंती...! .नाहीतर लढणे आमच्या रक्तात आहे.. यापुढे सुशिक्षित झालेला तरुण हि लढाई कायदेशीर स्तरावर हि लढेल....आजही प्रत्येक गोष्टआम्ही संघर्ष करूनच मिळविलीआहे...यापुढेही तो संघर्ष सुरूच राहील...!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, July 14, 2016

'केल्याने देशाटन ' आणि ग्रेट भेट ' नवीन दोन सदरे ब्लॉग वर सुरु करत आहे.

नमस्कार ...!
'गेल्या काही महिन्यात खूप प्रवास घडला..तसा आयुष्यात खूप कमी 'फिरलेला' माणूस असल्यामुळे या प्रवासाचं खूप औत्सुक्य होतं. पहिल्यांदाच परदेश ची सफर म्हणून थायलंड ची भेट घडली. आपल्यापैकी अनेक जण कदाचित या देशाला भेट देऊन आलेही असतील...! गेल्या काही दिवसात अल्पावधीतच थायलंड , मलेशिया आणि सिंगापूर या देशांना भेट देण्याचा योग आला. यातले काही बरे-वाईट अनुभव आपल्या बरोबर बोलावे असे मनात आले म्हणून 'केल्याने देशाटन ' हे सदर माझ्या ब्लॉग वर सुरु करत आहे. तसेच व्यवसाय, समाजकारण, राजकारण, कला, शिक्षण, संस्कृती या सर्व क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तिमत्व यांना भेटण्याचा योग येतो. यासाठी ब्लॉगवर 'ग्रेट भेट ' नावाची लेखमालिका सुरु करतआहे. या ना त्या निमित्ताने आपली रोज भेट घडावी हे खरे कारण ...! आपण या सर्वांचे स्वागत कराल याची खात्री आहे...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Sunday, July 10, 2016

Panamax Institute commences 10th batch of Diploma in Logistics & shipping

Namaskar ...!
Panamax Institute of Logistics and shipping commence 10th batch of Diploma in logistics & shipping. The orientation session was held at the Sai mandir vahal, panvel where students meet the faculty team and the operation team ..! 30 students have taken the admission for this course. Mr. Vinod Mhatre ( MD VHM Logistics ), Mr. Shekhar Mhatre ( Operation manager Cosco Shipping ) & Mr. Atul Dayal ( Sr. faculty in port operations ) & Mr. Jitendra Mhatre ( Nhava ) also present on this occasion. My special Thanks to Suraj Bhagat, Reena Gharat and Nilesh Thakur, they put tremendous effort to organise this batch. Thanks to all ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Friday, July 8, 2016

'Yal Tar Hasal' organized by Apcotex Industries Limited

Namaskar ...!
Performing my show ' Yal Tar Hasal' organized by Apcotex Industries Limited on their ' Executive and Management meet' . They celebrated my birthday on this occasion. It was a wonderful evening with them . I am extremely thankful to the management team and the entire Apcotex family for the respect & love. Special thanks to Mr. Sawant ( HR Head )
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, July 4, 2016

साई संस्थान, साईनगर वहाळ - २०० झाडे लावण्याच्या स्तुत्य उपक्रम

नमस्कार ...!
दि. १ जुलै - साई संस्थान ,साईनगर वहाळ आणि सन्माननीय रवीशेठ पाटील यांच्या माध्यमातून माझा वाढदिवस मंदिरात साजरा झाला आणि २०० झाडे लावण्याच्या स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि लगेचच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यासाठी' याल तर हसाल" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साई संस्थान, साईनगर वहाळ आणि सर्व मित्रमंडळी यांचे मन:पूर्वक धन्यवाद..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.