Monday, July 18, 2016

नवी मुंबई - बंद ..! प्रकल्पग्रस्तांचा विजय असो ...!

नमस्कार..!
कुठेतरी एक सुंदर शेर वाचला होता...
"जिंदगी बीत जाति है, एक घर बनाने में...
तुम्हे तो वक्त हि नही लगता बस्तीया उजाडने में....! 
आज आमच्याच जागेवर बांधलेली घरे वाचविण्यासाठी आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागत आहे ...आम्ही प्रकल्पग्रस्त बांधवानी आपल्या जमिनी कवडीमोल किमतीत दिल्यानंतर हि नवी मुंबई अस्तित्वात आली आणि आज आमच्याच भूमीतआम्ही 'अनधिकृत' ? सगळे व्यवसाय, उद्योगधंदे , आमच्या उरावर आणून बसविल्यानंतर आताआमच्याच गावांना, घरांना, अनियमित घोषित करून ती तोडा....हाच एक पर्याय आहे का ? आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी नाकारणे हि कोणतं लोकशाहीच लक्षण आहे ? प्रकल्पग्रास्तांवरील अन्याय काही नवीन नाही...जन्मल्यापासून आम्ही तो झेलतआहोत.. इतक्या वर्ष सिडको, महानगरपालिका आणि तत्सम संस्थाआपल्या तोंडाला पानेच पुसत आल्याआहेत...पिढ्या नि पिढ्या या मातीत जगल्याआमच्या ...आमच्या साहिष्णूतेमुळे एवढेमोठेअत्याधुनिक शहर वसविता आले. आम्ही कधी या शहराच्या जडण घडणी मध्ये अडथळा निर्माण केला आहे का ? आमची बाजू समजून न घेता ..'फक्त तोडा' ..अशी ताठरपणाची भूमिका अधिकार्यांनी सोडावी..एवढीच विनंती...! .नाहीतर लढणे आमच्या रक्तात आहे.. यापुढे सुशिक्षित झालेला तरुण हि लढाई कायदेशीर स्तरावर हि लढेल....आजही प्रत्येक गोष्टआम्ही संघर्ष करूनच मिळविलीआहे...यापुढेही तो संघर्ष सुरूच राहील...!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

No comments:

Post a Comment