Tuesday, October 25, 2016

ग्रेट भेट - अरविंद सावंत ( शिवाजी मंदिर , दादर )

ग्रेट भेट - अरविंद सावंत ( शिवाजी मंदिर , दादर )
" याल तर हसाल " चा शिवाजी मंदिर मधील पहिलाच प्रयोग, प्रेक्षकांची संख्या कमी आणि तरीही पहिल्या रांगेत एक रुबाबदार व्यक्ती कार्यक्रम करताना सतत लक्ष वेधून घेत होती ..प्रोत्साहन देत होती , टाळ्या वाजवत होती ...कार्यक्रम संपल्यानंतर ती व्यक्ती माझे अभिनंदन करण्यासाठी पुढे आली ...मी त्यांन नमस्कार केला ..आणि पाठीमागून कुणीतरी ओळख करून दिली ..हे अरविंद जे.के.सावंत ..शिवाजी मंदिर चे सर्वेसर्वा ...! त्यांना "याल तर हसाल' खूप आवडला ..त्यांनी माझ्या कार्यकारी निर्मात्यांचे एक चांगला कार्यक्रम आणि एक चांगला कलाकार शिवाजी मंदिर ला आणलात म्हणून अभिनंदन केले . माझे खूप खूप कौतुक केले त्यांनी ...आणि लगेच आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये सर्व कलाकारांना पाहुणचार दिला ..आम्ही आमचा त्यांनी केलेला हा बहुमानच समजतो ...खूप मस्त गप्पा झाल्या ..१९४३ पासून चा शिवाजी मंदिर चा इतिहास त्यांनी आम्हाला सांगितला . पितृभक्त असलेले सावंत साहेब ..तितकेच दिखुलास ...आणि ७५ वर्षांचे तरुण वाटले . त्यांनी आग्रहाने त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याजवळ माझ्याबरोबर छायाचित्र काढले . खरं शिवाजी मंदिर चे मुख्य विश्वस्त आम्हाला इतका सन्मान देतात...आमच्याविषयी गौरवोद्गार काढतात ...आणि ते सुद्धा पहिल्या प्रयोगाच्या वेळी ..! आम्ही सर्व कलाकार त्यांच्या प्रेम आणि आदरातिथ्याने भारावून गेलो. अनेक महान कलाकारांनी आपल्या कलेने शिवाजी मंदिर ला कार्यक्रम केले ...त्यांच्या केलेने पावन झालेल्या रंगमंचाला आम्ही सर्व कलाकारांनी वंदन केले आणि कृतकृत्य भावनेने ..परत निघालो ...( याल तर हसाल - नाबाद ६४६ )
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Thursday, October 20, 2016

" याल तर हसाल " ( ६४४ ) चा 'शिवाजी मंदिर' येथील पहिला कार्यक्रम...!

नमस्कार..!
काल " याल तर हसाल " चा'शिवाजी मंदिर' कार्यक्रम झाला..! एक स्वप्न अखेर पूर्ण झाले..! अनेक वर्ष हे स्वप्न उराशी बाळगून चाललो होतो...माझ्या चाहत्यांनी, रसिकांनी, मित्रमंडळी आणि सर्वानीच मला सतत प्रोत्साहित केलं..! माझ्या कडे शब्द नाहीत..शिवाजी मंदिराच्या रंगमंचावर प्रयोग करताना मला काय वाटत असेल ...या ठिकाणी अनेक नाटके, अनेक वेळा येऊन पहिली होती..परंतु " याल तर हसाल" चा प्रयोग इथे होणे , रसिकांनी त्याला भरभरून दाद देणे...आणि चक्क शिवाजी मंदिराच्या मालकांनी श्री.अरविंद जे.के. सावंत यांनी तो कार्यक्रम पूर्ण पाहून माझ्या टीम ला बोलावून गप्पा मारणे ..! दुसऱ्या दिवशी सामना ने या कार्यक्रमाची दखल घेणे सारेच अनाकलनीय...आनंदीआणि तरीही इतक्या वेगाने...कि अस वाटलं इतक्या वर्षाच्या मेहनतीच फळ मिळतंय...अजून खूप पुढे जायचे बाकी आहे ...माझी संपूर्ण टीम, रवीशेठ पाटील, महेंद्र दळवी, शिरीष अहिरे, दीपक जाधवआणि माझे रसिक प्रेक्षक सर्वांच्या उपकरातून उतराई होणे शक्य नाही...!! हे रंगदेवते तुझा आशीर्वाद आम्हा सर्वांवरअसाच कायमअसूदे...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Tuesday, October 18, 2016

गडकरी रंगायतन मधील पहिला कार्यक्रम -" याल तर हसाल " ( ६४३ )

नमस्कार..!
"याल तर हसाल " चा ६४३ वा कार्यक्रम गडकरी रंगायतन मध्ये पार पडला. गडकरी मधला पहिलाच शो ,आणि त्या मध्ये सोमवारचा दिवस तरी सुद्धा रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. गडकरी मध्ये कार्यक्रम व्हावा हे माझेच नव्हे तर माझ्या टीम चे, तमाम रसिकांचे , माझ्या मित्रमंडळीचे आणि सर्वांचेच स्वप्न आज साकार झाले आणि 'याल तर हसाल' च्या शिरपेचात एक मनाचा तुराआणखी खोवला गेला. जबरदस्त कार्यक्रम झाल्यानंतर हळूच कुठे तरी मनाला वाटलं आज गडकरी रंगायतन चा गड जिंकला पण १९ तारखेला नाट्य पंढरी शिवाजी मंदिरला हास्यकल्लोळात डुंबवायचे आहे आणि माझ्या रसिकांच्या जोरावर ते हि होऊन जाईल....फक्तआपला सर्वांचाआशीर्वाद शुभेच्छा आणि  सहकार्य ..हव आहे..खर म्हणजे तोच याल तर हसाल चा श्वास आहे...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Friday, October 14, 2016

Releasing X- FACTOR Brochure


From the Day we announce " X- factor " ...everybody is curious and inquisitive about the Concept. Sanjeevan Marg had a mission to change the life of 1 lakh students all over the Maharashtra through this concept. releasing the informative brochure for the participants & friends. Kindly attend the Free Seminars in your nearest area and support the cause. Many thanks for your support and co-operations.
Upcoming Seminar - on 16th Oct. 2016. MP hall JNPT Township. Timing - Morning 10;00 to 13;00
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Wednesday, October 12, 2016

"याल तर हसाल ' न्हावा , उरण येथील नवरात्रीतील कार्यक्रम ..!

नमस्कार...!
न्हावा , उरण येथील "याल तर हसाल " चा कार्यक्रम विशेष स्मरणात राहील असाच झाला. प्रचंड गर्दी , हशा, उत्साह, टाळ्या यामध्ये तीन तास कधी उलटून गेले समजले नाही. पावसाची तमा न बाळगता रसिकांनी केलेली गर्दी विशेष स्मरणात राहील अशीच...! सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Friday, October 7, 2016

'मार्ग सुखाचा ' व्याख्यान - खिडकी गाव ( अलिबाग )



नमस्कार...!
नवरात्री निमित्त माझ्या ' मार्ग सुखाचा' या व्याख्यानाचेआयोजन खिडकी ( अलिबाग ) या गावामध्ये श्री. आल्हाद पाटील यांच्या व्ही. जी. पाटील एज्युकेशनल फौंडेशन च्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजीत केला होता. २;३० तास रंगलेल्या या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांनी उत्तम साथ दिली. पाऊसाचे सावट असून सुद्धा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. 'याल तर हसाल ' चे दोन कार्यक्रम या गावातअगोदरच झालेआहेत..तरी सुद्धा त्या इमेज ला बाजूला ठेवत रसिकांनी हे व्याख्यान एन्जोय केले या बद्दल सर्व रसिकांचे आणि श्रोत्यांचे मन:पूर्वक धन्यवाद...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.