Wednesday, March 30, 2016

' याल तर हसाल ' चा होळी चा कार्यक्रम कोपर , भिवंडी


नमस्कार …!
या वर्षी ' याल तर हसाल ' चा होळी चा  कार्यक्रम कोपर , भिवंडी येथे संपन्न झाला. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात होळी असूनही रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ग्रामपंचायत कोपर आणि विशेषता साधनाताई घरत आणि त्यांचे सर्व सहकारी  यांनी या कार्यकम आयोजनासाठी खूप परिश्रम घेतले . सर्व रसिक श्रोत्यांचे मन:पूर्वक धन्यवाद … !
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

अखेर एक स्वप्न पूर्ण झालं …!

नमस्कार …!
अखेर एक स्वप्न पूर्ण झालं …! ' मला शिवाजी व्हायचंय …!' चा पहिला प्रयोग यशस्वीरीत्या , रसिकांच्या गर्दीत पार पडला. खूप वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे अतुल्य व्यक्तिमत्व सर्व तरुणांसमोर साकार करावं…. असे मनापासून वाटत होते. नाटक , पोवाडे , व्याख्याने , कादंबरी , चित्रपट इत्यादी अनेक माध्यमातून हा विषय अनेकांनी प्रभावीरीत्या जनतेसमोर ठेवला होता. परंतु एकपात्री संगीतमय कार्यक्रमातून हा विषय मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला. संकल्पना ते सादरीकरण या संपूर्ण जबाबदारी मध्ये माझी संपूर्ण टीम , रवीशेठ पाटील , एविएशन टीम , इंनोव्हेटीव ग्रुप , मित्रमंडळी , हितचिंतक , आयोजक - ग्रामस्थ मंडळ वहाळ , या सर्वानीच प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम सादर करायला मला बळ दिले . रसिक प्रेक्षकांच्या प्रोत्साहनामुळेच मी हे करू शकलो याची जाणीव मला आहे …सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ….!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Monday, March 28, 2016

वहाळ ग्रामपंचायतीचे मन:पूर्वक अभिनंदन …!

नमस्कार … !
'मला शिवाजी व्हायचय …!' चा पहिला प्रयोग 'वहाळ  ग्रामपंचायत' यांनी आयोजित केलेल्या भव्य शिवजयंती उत्सवात संपन्न झाला . संपूर्ण तालुक्यात  एक वेगळी आणि भव्य स्वरुपात शिवजयंती आयोजित करून वहाळ ग्रामपंचायतीने  एक नवीन आदर्श घालून दिला. भव्य मिरवणूक , छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण, गुणवंतांचा सत्कार तसेच पंचक्रोशीतील विधवा महिलांना आर्थिक मदत हा नवीन स्तुत्य सामाजिक उपक्रम…. ! तसेच शिवाजी महाराजांचे चरित्र घरोघरी पोहोचावे म्हणून प्रशांत  देशमुख यांचे व्याख्यान , शिवशाहीर वैभव घरत यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आणि समारोपाला 'संजीवन मार्ग निर्मित 'मला शिवाजी व्हायचंय …ह संगीतमय कार्यक्रम …! दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये चाललेल्या या दैदिप्यमान सोहळ्याने सर्व नागरिक , तरुण , आबालवृद्ध  प्रभावित झाले .श्री . राजेंद्र पाटील , श्री रवीशेठ पाटील , श्री बाळाराम पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी , वहाळ  ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या अपार मेहनतीने हा सोहळा पार पडला . आम्हा सर्व कलाकारांचा सत्कार झाला …माझे  सर्व सहकारी खूप भारावून गेले ….!  वहाळ  ग्रामपंचायतीचे मन:पूर्वक अभिनंदन …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 

Saturday, March 26, 2016

'मला शिवाजी व्हायचय … !' चा पहिला प्रयोग शिवजयंती च्या निमित्ताने वहाळ , पनवेल

नमस्कार …!
गेली तीन चार वर्ष मनात खूप इच्छा होती कि छत्रपति शिवाजी महाराजांवर कार्यक्रम करावा आणि महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आजच्या तरुणांना माहित करून द्यावा. आज ती इच्छा पूर्ण होतेय … 'मला शिवाजी व्हायचय … !' चा पहिला प्रयोग शिवजयंती च्या निमित्ताने वहाळ , पनवेल येथे आज संध्याकाळी सादर होतोय … एक नवीन सुरुवात करतोय … माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा दिवस आहे. आपला आशीर्वाद आणि शुभेच्छा ची खूप आवश्यकता आहे …सोबत 'याल तर हसाल ' चा धुमधडाका सुरूच आहे …! हा प्रयोग सुद्धा माझ्या रसिक प्रेक्षकांना अर्पण …! आयोजक वहाळ ग्रामपंचायत , श्री रवीशेठ पाटील आणि राजेंद्र पाटील आणि सहकार्यांचे मन:पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा - हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Tuesday, March 22, 2016

पहिली परदेश वारी …. !


नमस्कार …!
पहिल्या परदेश वारीचं प्रत्येकालाच अप्रूप असतं … तसं मलाही होतं …! पण 'कलाकार' म्हणून तुमचं विमानतळावर कुणीतरी स्वागत करतं … ते ही परदेशात …. हा खूप मोठा सुखद धक्काच …! माझे "पूजा हॉलिडेज " मधील पार्टनर श्री. सुधीर हुलगे यांनी माझ्यासाठी खूप आरामदायी अशी सफर आयोजित केली. त्यांचा या व्यवसायातील अनुभव अत्यंत दांडगा आणि थायलंड , मलेशिया आणि सिंगापूर आणि इतर आशियाई देशांमध्ये नेटवर्क सुद्धा जबरदस्त आहे. टुरिझम च्या क्षेत्रात आपली लोक तसे फार कमीच …परन्तु सर्वात जास्त पर्यटनाची आवड मात्र आपल्याच लोकांमध्ये आढळते . या सर्वाना आपुलकीने आणि त्यांच्या खर्चाचा योग्य मोबदला देत उत्तम सहलीचा आनद देत यावा म्हणून 'इनोव्हेटीव ग्रुप' आणि 'संजीवन मार्ग' यांनी एकत्र येउन आपल्यासाठी विशेष सहलीचे आयोजन केल आहे. निसर्गाची नवलाई , वेगळ्या भाषा , संस्कृती , समुद्र, पर्यटकांसाठी केलेले विशेष आयोजन … आणि अशा कितीतरी गोष्टी … हे सर्व जरूर पाहण्यासारखे आहे …अनुभवण्यासारखे आहे … !
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Monday, March 21, 2016

नवी दिशा…. नवी आशा …!

नमस्कार …!
'थायलंड आणि मलेशिया ' या देशांची यशस्वी 'बिझिनेस टूर ' करून परतल्यानंतर मी 'इनोव्हेटीव ग्रुप ' आणि 'संजीवन मार्ग ' यांच्या समन्वयातून 'टुरिझम , सिनेमा आणि हेल्थ अवेरनेस ' या क्ष्रेत्रात  व्यावसायिक रित्या उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ' संजीवन मार्ग ' च्या माध्यमातून विविध रंगमंचावरील कार्यक्रम , व्याख्याने, कॉर्पोरेट ट्रेनिंग, Logistics  आणि एविएशन या सर्वांमध्ये राहून या नवीन क्षेत्रात पदार्पण करत आहे. आपण  नेहमीच एक मित्र हितचिंतक , मार्गदर्शक , चाहते म्हणून मला सर्वतोपरी मदत करता आणि प्रोत्साहन हि देता. आपल्या शुभेच्छांची, आशीर्वाद आणि मार्गदर्शनाची गरज वेळोवेळी लागणार आहेच. संजीवन मार्ग च्या माध्यमातून 'सभेत कसे बोलावे' प्रशिक्षण सुरु झाले आहे, 'मला शिवाजी व्हायचंय। ! हा रंगमंचावरील कार्यक्रम येत्या २६ तारखेला सुरु होतोय. तसेच ' पूजा holidays' च्या माध्यमातून दक्षिण आशियातील थायलंड , मलेशिया , सिंगापूर इत्यादी सर्व देशांमध्ये सहली सुरु करतोय ….नवी मुंबई सिनेमाच्या माध्यमातून लवकरच एक मराठी चित्रपट करतोय … अनेक उपक्रम आहेत … वेळोवेळी विविध माध्यमातून आपल्याशी संवाद आहेच… असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Sunday, March 20, 2016

'याल तर हसाल ' पेण , दादर कार्यक्रम - १७ मार्च २०१६


नमस्कार..!
 ' याल तर हसाल ' च्या पेण दादर मधील कार्यक्रमाला नेहमीसारखीच तुफान गर्दी...प्रचंड उत्साह , हशा आणि टाळ्या...!  पेण तालुक्यातील कोणत्याही कार्यक्रमाला रसिकांचा असाच उत्साह असतो हालौकिक इथेही कायम राहिला...! आयोजकांचे , रसिकांचे मन:पूर्वक धन्यवाद...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार  संजीवन म्हात्रे 

Friday, March 18, 2016

सभेत कसे बोलावे - batch -२ आजपासून सुरु

नमस्कार ..!
आज संध्याकाळी ' सभेत कसे बोलावे ' ची दुसरी batch सुरु होतेय. शनिवार आणि रविवार अशा दोन्ही batches आज आणि उदया एकाच वेळी सुरु होतायेत. या संकल्पनेला संपूर्ण नवी मुंबई , ठाणे , रायगड मधून भरभरून प्रतिसाद मिळाला. वयाची कोणतीही अट नसणारा हा अभ्यासक्रम आपल्याला एक चांगला वक्ता बनविण्यास सक्षम आहे याचा आपण जरूर अनुभव घ्याच..! या क्षेत्रात आज अनेक संधी उपलब्ध आहेत..आपण जरूर या आणि एक प्रभावी वक्ता आणि व्यक्ती बना ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.
अधिक माहितीसाठी - संपर्क - 022 3220 5222; 84519 55866;
visit : www.sanjeevanmarg.com ; www.innovativegroup.org

Thursday, March 10, 2016

Motivational Training Session - LIC , Panchrant hotel.





नमस्कार...!
Many friends asked me to post all my updates in English to cover my all well wishers and friend and my audience. This event is organised by Mr. Subodh Darne for his LIC Team in Panchratn Hotel , Panvel. My Topics are " Time Management and Goal setting " Nice to be the part of 'Team Subodh' and be the Motivational speaker for the TEAM. Thanks everybody ..who attended the Training ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, March 7, 2016

'लिटल मिलेनिअम स्कूल " उरण - स्नेहसंमेलन


नमस्कार ..!
'लिटल मिलेनिअम स्कूल " या उरण मधील चिमुकल्यांच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलना मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला...चिमुकल्यांना बक्षीस देताना आणि त्यांच्या कौतुक सोहळ्यात सहभागी होताना  खूप आनद झाला. लहान मुलांनी आपल्या कलाविष्काराने सर्वाना थक्क करून सोडले..शाळेच्या प्रमुख मिनू शाह आणि  त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Sunday, March 6, 2016

१४ वे आगरी साहित्य संमेलन - मुलाखत

नमस्कार..!
१४ व्या आगरी साहित्य संमेलनामध्ये माझी आणि मयुरेश कोटकर यांची मुलाखत झाली.  आगरी समाजामध्ये साहित्याची चळवळ निर्माण करणारे श्री मोहन भोईर यांनी आमची मुलाखत घेतली हे आम्हा दोन्ही कलाकारांचे भाग्यच...!  उतरोत्तर हि मुलाखत मस्त रंगली. अनेक मान्यवर , सन्माननीय पाहुणे , लेखक, साहित्यिक, कवी आणि रसिक श्रोते या सर्वांनी मला आणि मयुरेश ला उत्तम टाळ्यांनी दाद दिली. त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Saturday, March 5, 2016

" याल तर हसाल " तासगावकर महाविद्यालय कर्जत कार्यक्रम

"याल तर हसाल " चा ५७९ वा कार्यक्रम रंगला तो तरुणाईच्या सान्निध्यात तासगावकर महाविद्यालय कर्जतमध्ये...'घे भरारी' यावार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार तासगावकर, अनेक मान्यवर आणि दोन हजार विद्यार्थी यांच्याउपस्थितीत ' याल तर हसाल' ने धमाल उडवून दिली. तब्बल २:३० तास चाललेल्या या कार्यक्रमात टाळ्या , हशा चा गजरच होत होता....तासगावकर महाविद्यालय, आयोजन समिती आणि सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Wednesday, March 2, 2016

'सभेत कसे बोलावे ?'- वर्क शॉप - batch -१

नमस्कार...!
बोलणाऱ्यांची माती हि विकली जाते असे म्हणतात..आणि न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही..याचा प्रत्यय आजच्या जगात सर्वानाच वारंवार येतो. आपण सभेत चांगले बोलावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छाअसते...परंतु सर्वांनाच ते शक्य नाही होत ...आणिआयुष्यभर आपण मागे राहतो ...आणि म्हणूनच 'सभेतकसे बोलावे' या कार्यक्रमाची संकल्पना आली आणि पहिली batch फुल्ल झाली सुद्धा..! एक महिनाभर म्हणजेच ( चार शनिवार प्रत्येक दिवशी ३ तास ) चाललेल्या या ' ट्रेनिंग सेशन" मध्ये मार्गदर्शन करताना खूप आनंद झाला."संजीवनमार्ग " या माझ्या संस्थेच्या माध्यमातून लगेच या "वर्कशॉप" ची दुसरी batch लगेच सुरु होत आहे. आजच संपर्क करा..९८३३६१७९१५
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.