Monday, May 30, 2016

६०० व्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पॅडी कांबळे

नमस्कार ..!
'याल तर हसाल' च्या ६०० व्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन सर्वांचा आवडता कलाकार पॅडी कांबळे हजर होते. पुर्ण कार्यक्रम पाहुन पॅडीने सर्व टीम ची खुप स्तुती केली. पॅडी चे मन:पुर्वक धन्यवाद ..!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Sunday, May 29, 2016

याल तर हसाल ' चा ६०० वा कार्यक्रम

नमस्कार …. !
' याल तर हसाल ' चा ६०० वा कार्यक्रम …. हाउसफुल्ल वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह …माझ्या अनेक रसिक प्रेक्षकांबरोबरच , राजकारण , समाजकारण , नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील कलाकार , पोलिस अधिकारी,  अध्यात्मिक  अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला  हजर राहिले… ! कार्यक्रम एवढा यशस्वी झाला कि अर्धा तास रसिकांसाठी वेळ वाढवावा लागला. माझ्या टीम ने , मित्रमंडळी , आणि हितचिंतक या सर्वांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. सर्वांचे खूप खूप आभार …! असेच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या … !
आपला सर्वांचा -  हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 

Thursday, May 26, 2016

'याल तर हसाल ' च्या कार्यक्रमात भारत गणेशपुरे यांची भेट

नमस्कार … !
'याल तर हसाल ' च्या ६०० प्रयोगाच्या वाटचाली मध्ये अनेक मोठ्या कलाकारांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद लाभले. 'याल तर हसाल ' च्या विश्न्नुदास भावे नाट्यगृहातील कार्यक्रमात भारत गणेशपुरे यांची भेट झाली.  एवढ्या मोठ्या कलाकाराने ' याल तर हसाल ' चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमाचे १००० प्रयोग सहज होतील  असा विश्वास दिला. भारत गणेशपुरे यांचे मन:पूर्वक धन्यवाद … ! ६०० वा प्रयोग येत्या शनिवारी दुपारी ४:३० वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सादर होतोय … अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपण सर्वाना आग्रहाचे आमंत्रण …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे  

Thursday, May 19, 2016

'संकलन स्टुडीओ '

नमस्कार …!
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने अनेक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट करतोय. त्याचाच एक भाग म्हणून ओशिवरा येथील 'संकलन स्टुडीओ ' मध्ये गाणं रेकॉर्ड होतेय . लवकरच हा प्रोजेक्ट सुद्धा मार्गी लागेल. वेळोवेळी आपल्याला सांगत असतोच काही नवीन असेल तर …आपन सर्व जण सोबत आहातच … सध्या 'याल तर हसाल ' च्या ६०० व्या प्रयोगाचे वेध लागलेत . आपण नेहमीच भरभरून प्रतिसाद देत असता , यापुढेही आपण असेच कौतुक कराल हीच अपेक्षा आणि खात्री सुद्धा …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Wednesday, May 18, 2016

मे महिन्याचा उत्तरार्ध सुरु आहे

नमस्कार …!
मे महिन्याचा उत्तरार्ध सुरु आहे … उन 'मी ' म्हणतंय … सकाळी १० वाजल्यानंतर बाहेर जाणं जिकिरीच झालय … अंगाची काहिली होतेय … उष्णतेने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळालेय … अशा वेळी समुद्रात , नदीत , तलावात , डुंबायला मिळालं तर …! फक्त आठवणीनेच बरं वाटलं ना … आयुष्याचं पण असच आहे … जेव्हा सर्व बाजूनी दु:ख , समस्या तुम्हाला घेराव घालतात … दु:खाचं रणरणत उन सुरु होतं …तेव्हा सुखाचे पावसाळे आठवायचे … मस्त सुखातील क्षण आठवायचे … आठवणींचा उपयोग यासाठीच तर करायचा असतो …वाइट आठवणीना 'डिलीट ' मारून … चांगल्या क्षणांना 'स्पेस' द्यायचा असतो … ! असो … थोड्याच दिवसात मस्त पावसाला सुरुवात होईल अशी आशा करू या …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, May 16, 2016

दि. १५ मे २०१६ -तुर्भे , नवी मुंबई …'याल तर हसाल '

नमस्कार …!
दि. १५ मे २०१६ -तुर्भे , नवी मुंबई …'याल तर हसाल ' चा ५९८ वा कार्यक्रम धम्माल साजरा झाला. रसिकांची तुडुंब गर्दी आणि मान्यवरांची उपस्थिती … सलमान खान च्या ' चिल्लर पार्टी ' या चित्रपटाचे कथालेखक प्रेमकुमार शर्मा , के. सी. बोकाडिया यांचे दिग्दर्शनातील शिष्य आणि अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक सुनीत कुमावत, आणखी एक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक डॉ. सैफ , इस्माईल दरबार यांच्या बरोबर संगीत क्षेत्रात काम केलेलं साहीर सुलतानपुरी असे अनेक मान्यवर हजर होते. कार्यक्रम करताना खूप मजा आली. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Saturday, May 14, 2016

कुसुम्बळे ( अलिबाग ) येथे जिल्हास्तरीय नृत्यस्पर्धा

नमस्कार … !
दि. ६ मे २०१६ - कुसुम्बळे ( अलिबाग ) येथे जिल्हास्तरीय नृत्यस्पर्धेत सतत सहा वर्षे नेहमीच 'सेलेब्रिटी गेस्ट ' म्हणून हजेरी लावतो. या वर्षी सुद्धा अत्यंत रंगलेल्या अशा नृत्यस्पर्धेत कार्यक्रम सादर करताना खूप आनंद वाटला. श्री. व सौ . खरसांबळे या स्पर्धेसाठी खूप मेहनत करतात. प्रत्येकी वर्षी काहीतरी नवीन कराव अशी त्यांची नेहमीच धडपड सुरु असते. सर्व कलाकारांना एक चांगला 'स्टेज' या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध होतेय . सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद … !!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Friday, May 6, 2016

याल तर हसाल ' गडब ता. पेण ३ मे २०१६


नमस्कार …!
' याल तर हसाल ' चा कार्यक्रम …रसिकांची तुडुंब गर्दी ... २;३० तास हास्याचा धबधबा …. हे समीकरण नेहमीचेच …! गडब ता. पेण येथील ३ मे २०१६ चा कार्यक्रम याला अपवाद नव्हता …मस्त धम्माल आली कार्यक्रम करताना … रसिकांच्या फर्माईश ने तर कार्यक्रमाला आणखी उत्स्फूर्तता आली . सर्वांचे मन :पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Tuesday, May 3, 2016

'Certificate Distribution ceremony' - Panamax Institute of Logistics & Shipping

Namaskar ..!
Panamax Institute of Logistics & Shipping celebrates the 'Certificate Distribution ceremony' to honor the Diploma holders of the Institute. They worked very hard and 'all set' to enter into the logistics industry. Wishing ' All the best ' to them. Me and whole Staff of Panamax Institute is always with you ..! Many thanks to Suraj Bhagat & Shubhangi thakur that they did a splendid Job. Till date we have produced 400 + graduates in the logistics & supply chain management industry.
Thanks to all ...!
- Hasyprabodhankar Sanjeevan mhatre.

Monday, May 2, 2016

First Time facing Cine - Camera


नमस्कार … !
सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द सिनेमटोग्राफर श्री . सुधीर  हुलगे आणि सुप्रसिद्ध छायाचित्रकार विजय तस्वीर यांच्यामुळे पहिल्यांदाच चेहऱ्याला रंग लावून कॅमेऱ्या समोर उभा राहिलो … आणि स्वत:ला पाहून माझा विश्वासच बसेना …हे फोटो माझेच आहेत का ? असाच विचार मनात आला … माझ्या रसिक प्रेक्षक , चाहते , हितचिंतक आणि मित्रमंडळी साठी काही फोटो शेअर करत आहे.
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.