Saturday, October 24, 2015

" याल तर हसाल" विष्णुदास भावे कार्यक्रम हाउसफुल्ल ..!

नमस्कार ..!
"याल तर हसाल' च्या विष्णुदास भावे मधील कार्यक्रमास रसिक पेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. मांडवाचे मंगारी टीम ने अत्यंत मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करून दाखविला. नवी मुंबईतील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या शेवटी 'चला हवा येऊ द्या " मधील भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांनी सुद्धा  उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. सर्व रसिक प्रेक्षक , आयोजक , मान्यवर आणि सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Friday, October 23, 2015

" याल तर हसाल " दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी - विष्णुदास भावे नाट्यगृह , वाशी

नमस्कार ...!
'मांडवाचे मंगारी ' परिवारातर्फे दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या 'नाम " संस्थच्या मदतीसाठी " याल तर हसाल' चा कार्यक्रम आयोजित केला आहे. उद्या ४:३० वाजता सादर होणाऱ्या कार्यक्रमास आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करतो . याल तर हसाल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यात माझा खारीचा वाट आहे याचा मला  आणि माझ्या टीम ला खूप आनंद होतोय. उद्याचा शो आपण होऊसेफुल्ल कराल या विषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. सदैव असेच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या.
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

" आलाप" अंध कलाकारांचा वाद्यवृंद - सहभाग

नमस्कार ...!
कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमी मध्ये आयोजित केलेल्या "ट्रेन द ट्रेनर" या सत्रात "आलाप " या अंध कलाकारांच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. या सर्व कलाकारांच्या कला आविष्काराने मी खूप भारावून गेलो. त्या सर्वांचा ताळमेळ एवढा छान जमत होता कि आपण डोळे असून अंध असल्यासारखा वाटत होतं. एका वेगळ्या दुनियेत वावरताना ...या कलाकारांनी डोळसांना प्रकाश दिल्यासारखा वाटला. निवेदन तर उत्कृष्टच..!  हा कार्यक्रम ज्यांनी तयार केला त्या जाधव सरांना सलाम ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Tuesday, October 20, 2015

'याल तर हसाल " कळंबोली कार्यक्रम - २० ऑक्टो. २०१५ नवरात्रोत्सव

नमस्कार ...!
 " याल तर हसाल " चा ५३० व कार्यक्रम काल कळंबोली मध्ये झकास झाला. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि आशीर्वाद यामुळे याल तर हसाल यशाची अनेक शिखरे गाठत पुढे चालला आहे. रसिकांच्या टाळ्या आणि हशा मध्ये  त्तीन तास कधी निघून जातात काळत नाही . आयोजक आणि रसिकांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 

Wednesday, October 14, 2015

'ट्रेन द ट्रेनर' कॅंम्प - कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमी

               कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमी ने आयोजित केलेल्या 'मार्शल आर्ट्स सेल्फ डिफेन्स  फेडरेशन ' च्या संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेल्या प्रशिक्षकांसाठी "ट्रेन द ट्रेनर " या कार्यक्रमामध्ये संजीवन मार्ग या माझ्या संस्थेच्या माध्यमातून माझ्या  " तणाव नियंत्रण " या ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  या कार्यक्रमामध्ये सर्व ट्रेनर्सना  मार्गदर्शन करताना खूप धमाल आली. सर्वानी सेशन खूप एन्जॉय केले. आणि मला पाच दिवसांच्या या सत्रात पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले.  या कार्यक्रमाचे आयोजक आणि कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!!
आपला सर्वांचा - हास्य्प्रबोधंकर संजीवन म्हात्रे.  

Tuesday, October 6, 2015

लहानपण देगा देवा ...!

माझ्या गावातील ' गौरा उत्सवामध्ये ' मी नेहमीच सहभागी असतो. गेली दोन वर्षे सतत 'याल तर हसाल ' ने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या वर्षी सुद्धा एका कार्यक्रमात सहभागी झालो. कार्यक्रम संपल्यावर सगळ्या लहान मुलांबरोबर गप्पा मारल्या ....आरती म्हटली ...खूप मज्जा आली..खूप लहान झाल्यासारख वाटलं. त्यांच्यात निरागसतेचा, निष्पाप पणाचा जो 'अहसास' होता ...मनाला फार मोहवून गेला..वाटल, परमेश्वराने प्रत्येक ५ वर्षानंतर २ महिन्यासाठी माणसाला तात्पुरत छोट करावा ....म्हणजे माणसाला कळेल कि दुनियादारी सांभाळताना आपण खोटेपणाचे किती थर अंगावर चढवून घेतलेत ..याची जाणीव होण्यासाठी माणसाने लहान व्हाव...आणि तस होता येत नसेल तर लहान मुलात रमाव ....मस्त वाटतं ...अजून आयुष्य कितीतरी बाकी आहे ...आयुष्यात आनंद आहे, मस्ती आहे , हास्य आहे आणि हो .. यामध्ये स्पर्धा नाही , कर्ज नाही , प्रतिष्ठा नाही , पद नाही , काम क्रोध काहीही नाही ...असल्या दुनियेत रमायला कुणाला नाही आवडणार ...!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Monday, October 5, 2015

"याल तर हसाल" उरण बोरी कार्यक्रम - १ ऑक्टोबर २०१५


                 या महिन्यातील हा पहिलाच कार्यक्रम. बरोबर एक तारखेला. अस झालं कि त्या महिन्यात माझे खूप कार्यक्रम होतात असा माझा अनुभव ..! शिवाय या होनेश्वर मंडळाने तीन वर्ष सतत पाठपुरावा केल्यानंतर हा कार्यक्रम होत होता. विलक्षण उत्सुकता होती या कार्यक्रमाची सर्वाना..आणि त्यात कार्यक्रमाच्या वेळी पाउस  सुरु झाला. कार्यक्रम होणार कि नाही हि शंका घर करू लागली. परतू रिमझिम बरसणाऱ्या त्या पावसातही माझा एक हि रसिक प्रेक्षक उठून गेला नाही, किंवा हलला सुद्धा नाही.  सर्व रसिक श्रोते  शांतपणे कार्यक्रम एन्जॉय करत राहिले.  जणू पावसामुळे त्यांना काहिच फरक पडत नव्हता. सर्व रसिक श्रोते आणि मी सुद्धा भिजून गेलो होतो. हा एक विलक्षण अनभव होता. फार कमी कलाकारांच्या वाट्याला असे भाग्य लाभतं.  'याल तर हसाल' च्या इतिहासातील हा एक आगळा वेगळा " ओला ' कार्यक्रम होता. याचे सर्व श्रेय माझ्या रसिक प्रेक्षकांना. आणि आयोजकांना सुद्धा .! त्याच्या रसिकतेला आणि " याल तर हसाल " वरील प्रेमाला मनापासून दंडवत ...!! 
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.