Saturday, June 20, 2015

घाई आणि हातघाई ..!

                     
  आजकाल कुणाला वेळच नाही. प्रत्येकजण पळतोय ....प्रत्येकाला घाई आहे... कुठेतरी पोहोचण्याची...कुठे पोहोचायचं हे माहित नाही. पण फक्त पळत राहायचं ...सारखा पळत राहायचं...जो जास्त पळेल तो पुढे जातो...मग आपण आपला वेग वाढवायचा ...त्याच्या पुढे जायचं ...मग तो वाढवतो...आपल्यापुढे निघून जातो ...मग आपण काहीतरी नवीन कारवाया करून ..शर्यत जिंकायचीच ...जोरात पळायचं...  जीवघेणं पळायचं...आणि मग कुठेतरी अपघात हा ठरलेलाच आहे...तो झाला कि बाकीचे थबकतात  ...थांबतात ...भांबावून जातात ...पण मग इतर पुढे गेलेले बघून...पळणं अपरिहार्य समजून पुन्हा शर्यतीत सामील होतात ....जीवनाचा प्रवास पूर्ण होतो ...पण जगणे राहूनच जातं...!!
                                रोजची वर्तमानपत्र उघडून पहा...हजारो अपघात ..मोटारसाइकलचे अपघात...कार चे अपघात, मोठ्या गाड्यांचे अपघात, कोण रेल्वेखाली सापडलं , ...हजारो घटना रोज आपण पाहतो ...कधीतरी आपण सुद्धा याचे शिकार होऊ याची साधी कल्पना सुद्धा आपल्याला शिवत नाही ...आपण रोज त्याच रस्त्यावरून येतो....जिथे अपघात घडतात ..आपण रोज तेच करतो...जे अपघात झालं त्यांनी केलं..पण आज त्यांच्या जीवावर बेतल ..उद्या आपलाही जीव यात जाऊ शकतो....स्वत;च्या चुकीने नाही तर इतरांच्या बेजबाबदार वृत्तीने आपण मारू शकतो याचा साधा विचार हि आपल्याला कधी शिवत नाही ...आपल्याला फक्त एकाच गोष्ट असते ...सकाळ, दुपार, संध्याकाळ , रात्र आणि ती म्हणजे घाई , घाई....आणि  घाई....काम , काम आणि काम.....!!
                               त्यामुळे जीवनात आनंदाचे क्षण येताच नाही ...आले तरी ते समजत नाहीत, जाणवत नाहीत , आणि समजले तरी ते उपभोगता येत नाहीत ..कारण आपल्याला वेळच  नसतो ...मग एवढी क्षणाक्षणाला घाईत असलेली माणसे करतात तरी काय..? यांचा वेळ कुठे जातो ? का सतत मानसं एकमेकांवर उखडलेली , चिडलेली , वैतागलेली , जळलेली ...काय कारण असेल याचं ? उत्तर सोप्पं आहे अगदी ...आपण आनंदी नसल्यामुळे आपण कुणाला आनंदी बघू शकत नाही ...आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण कुणाला आरामात बसलेला बघू शकत नाही...आपल्याला सन्मान मिळत नसल्यामुळे आपण कुणाला सन्मान देत नाही....आपण सुखी नाही तर कुणाला सुखी बघायचं नाही...आणि त्याला जर काही सुखाचे क्षण मिळू द्यायचे नाही ...या वृत्तीमुळे ..स्पर्धा सुरु आहे.....स्पर्धेला वेग आहे ...वेगळा अपघात ...आणि अपघातात पडताहेत हजारो लोकांचे बळी ...!!

हे सर्व थांबले पाहिजे...!! हे थांबविण्याचे अनेक चांगले मार्ग उपलब्ध आहेत ,...आपण याचा शोध घ्यायला हवा ...थांबलो तर किर्र अंधारात सुद्धा हळू हळू दिसायला लागत नाही का ...?
संजीवन म्हात्रे ..!