Thursday, February 25, 2016

युवा प्रतिष्ठान आयोजित पोपटी कवी संमेलन, पनवेल


नमस्कार...!
जे.एम.म्हात्रे चैरीटेबल संस्था संचालित युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोपटी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गझलकार ए.केशेख , एकनाथ मुंबईकर , प्रा. चंद्रकांत मढवी , ज्योत्सना राजपूत, आणि अनेक निमंत्रित कवी यामध्ये विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित होतो. मस्त रंगलेल्या या कविसंमेलनात कविता सादर करताना धमाल आली. अनेक मान्यवर या कविसंमेलनाला हजर होते. श्री. प्रीतम जे. म्हात्रे ( अध्यक्ष - युवा प्रतिष्ठान )  आणि त्यांची सर्व टीम यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात खूप मेहनत घेतली.  सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Tuesday, February 23, 2016

शासकीय तंत्रांनिकेतन - पेण ( रायगड ) व्याख्यान


नमस्कार..!
शासकीय तंत्रनिकेतन, पेण ( रायगड ) या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यामध्ये ' उद्योजकता " वाढीस लागावी म्हणून 'उद्योजक जागरुकता कॅम्प' च्या व्याख्यानमालेत माझ्या' Goal  setting & Achieving " आणि ' Time Management ' या व्याख्यानांचेआयोजन करण्यात आले होते. मिटकॉन संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाला विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कॉलेज व्यवस्थापन , मिटकॉन आणि विद्यार्थी मित्रांचे मन:पूर्वक धन्यवाद..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Monday, February 22, 2016

रंगभूमी कलामंच तर्फे - 'हास्यसम्राट ' पुरस्कार - २०१६

नमस्कार...!
आणखी एक पुरस्कार..! रंगभूमी या महाराष्ट्रातील कलाकारांच्या संस्थेने " हास्यसम्राट" हा पुरस्कार देऊन मला गौरविले ..! संगीत कला महोत्सव - २०१६ या तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमामध्ये मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्ष श्री. एकनाथ माळी यांनी सर्व क्षेत्रातील विविध कलाकारांना एकत्र करून या संस्थेची निर्मिती केली. सर्व कलाकारांच्या विकासासाठी हि संस्था काम करते. या पुरस्काराचे मानकरी सुद्धा माझे रसिक प्रेक्षक, माझी टीम , माझे हितचिंतक , मित्रमंडळी ...सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Sunday, February 21, 2016

मिटकॉन ई स्कूल - प्रेझेन्टेशन स्पर्धा - २०१६


नमस्कार ..!
उरण मधील मिटकॉन ई स्कूल ने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध विषयावरील 'प्रेझेन्टेशन" स्पर्धेला  एकमेव 'जज" म्हणून हजर होतो. पाण्याचे व्यवस्थापन, कचरा नियमन, स्वच्ह भारत अभियान, सोशल मिडिया चे दुष्परिणाम , सायबर गुन्हे, ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन इत्यादी अनेक विषयांवर तरुण विद्यार्थ्यांचे अभ्यासपूर्ण प्रेझेन्टेशन ने खूप शिकायला मिळालं. विद्यार्थ्यांचा सभाधिटपणा, आत्मविश्वास आणि विषयाची मांडणी पाहून खूप आनद झाला. 'तरुणाई ' एका चांगल्या मार्गावर आहे हे पाहून मस्त वाटले. पारितोषिके आणि सर्टिफिकेट  वाटप सुद्धा माझ्याच हस्ते झाले. श्री. प्रसाद मांडेलकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी हा उपक्रम राबविला त्याबद्दल त्यांचे  आणि मिटकॉन ई स्कूल चे मन;पूर्वक अभिनंदन ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Saturday, February 20, 2016

उलवे - मर्यादित क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन..!

नमस्कार..!
उलवे येथील मर्यादित क्रिकेट सामन्यांचे उद्घाटनाला उपस्थित राहण्याचा योगआला. हि क्रिकेट स्पर्धा इतर स्पर्धेपेक्षा वेगळी होती. या स्पर्धेमधून आलेले पैसे 'नाम' या संघटनेला देण्यात आले. सीमारेषेवर अनेक समाजोपयोगी घोषवाक्य लिहिली होती. अत्यंत उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजक श्री. किरण मढवी आणि त्यांच्या सहकाऱ्याचे मन:पूर्वक अभिनंदन...! पारितोषिक वितरणाला माझ्यासोबतच नवीन युवा पिढीचे नेते श्री. वैभव नाईक, श्री. प्रीतम म्हात्रे , श्री. मिथुन भोईर आदी मान्यवर हजर होते. या दोन्ही समारंभाला मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, February 18, 2016

" याल तर हसाल " - नांदगाव , कर्जत ( माघी गणेशोत्सव )


 नमस्कार ..!
' माघी गणेशोत्सवातील हा 'याल तर हसाल ' चा सलग चौथा कार्यक्रम ..! कर्जत तालुक्यांतील नांदगाव या छोट्याशा पण मोठी रसिकता असलेल्या गावात झाला. या गावात 'याल तर हसाल' ने ५७५ चा टप्पा गाठला ही आमची भाग्याची गोष्ट ..! सर्व रसिक मायबाप यांचे मन:पुर्वक धन्यवाद...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Wednesday, February 17, 2016

"याल तर हसाल" खारपाडा - माघी गणेशोत्सव - १३ फेब्रुवारी. २०१६

नमस्कार ..!
खारपाडा गावातील " याल तर  हसाल ' चा सलग दुसरा कार्यक्रम..! गेल्या वर्षी पेक्षा या वेळी रसिक प्रेक्षकांची खूप गर्दी..! श्री. रामशेठ घरत यांचे कार्यक्रमाचे भव्य आयोजन ..आणि विशेष म्हणजे बॉलीवुड चे उत्कृष्ट छायाचित्रकार श्री. विजय तस्वीर हे कार्यक्रमाचे विशेष शुटींग करण्यासाठी आले होते. कार्यक्रम तुफान रंगला..रसिकांनी केलेल्या कौतुकामुळे खूप समाधान वाटले...सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Tuesday, February 16, 2016

माघी गणेशोत्सव -' याल तर हसाल " कार्यक्रम - चिरनेर

नमस्कार..!
चिरनेर या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावातील " याल तर हसाल " चा हा एकूण ५ वा कार्यक्रम ..! महागणपती हे जागृत देवस्थान आणि चिरनेर जंगल सत्याग्रहाचा वारसा लाभलेलं हे गाव आम्हा कलाकारांना नेहमीच प्रेरणा देत असते..! " याल तर हसाल " च्या टीम मधील "अजय पाटील  ( हार्मोनियम ) याचं आणि माझ्या अनेक मित्रांचं हे गाव असल्यामुळे या गावाची विशेष जवळीक..! माघी गणेशोत्सवातील हा सलग दुसरा कार्यक्रम नेहमीप्रमाणे मस्त झाला. रसिक प्रेक्षकांची गर्दी...आणि प्रचंड उत्साह...मस्त टाळ्या...यामुळे हा कार्यक्रम विशेष स्मरणात राहील..! सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

'याल तर हसाल' आदई गावातील कार्यक्रम - माघी गणेशोत्सव.

नमस्कार ..!
या वर्षी च्या माघी गणेशोत्सवाची सुरुवात " याल तर हसाल" च्या आदई गावातील कार्यक्रमाने झाली. या गावातील हा पहिलाच कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून बॉलीवुड मधील सुप्रसिद्ध व्यक्ती सुधीर हुलगे, सुनीत कुमावत आणि पूजा होलीडेज च्या पूजा हुलगे यांनी उपस्थिती लाभली. रसिकांच्या गर्दीत, टाळ्यांच्या आणि हास्यकल्लोळात हा कार्यक्रम छान झाला. रसिक मायबाप आणि आयोजकांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Wednesday, February 10, 2016

बहुत जनासी आधारू - रवीशेठ पाटील

बहुत जनासी आधारू - रवीशेठ पाटील
                वहाळ चे साई मंदिर .. दर गुरुवारी पाच हजार पेक्षा जास्त जमणारे साईभक्त...गेली चार वर्ष सातत्याने त्या प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान करण्यासाठी धडपडणारी एक व्यक्ती ..प्रत्येकाला आवर्जून भेटून... नमस्कार करून .." साईभंडारा  घेतल्याशिवाय जाऊ नका " असे विनवणी करणारी ...प्रत्येक कलाकार पुढे गेला पाहिजे ..त्याला रंगमंच मिळाला पाहिजे....प्रत्येक तरुणाला नोकरी मिळाली पाहिजे ...प्रत्येक व्यावसायिकाला संधी मिळाली पाहिजे ...प्रत्येक खेळाडू ला उच्च स्तरावर पोहोचला पाहिजे  ...प्रत्येक गरिबाला रोजगार ...पिडीताना न्याय ....आणि समाजातील सर्वांनाच आनद मिळाला पाहिजे ...त्याचं भलं झालं पाहिजे म्हणून एक व्यक्ती अहोरात्र...समाजामध्ये विविध स्तरावर काम करतेय ...सर्वाना त्यांच्याबद्दल प्रेम , आदर आपुलकी वाटते ...असे संपूर्ण रायगड ,नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सर्वांच्या मुखी असलेले नाव म्हणजेच कोकणरत्न रवीशेठ पाटील ...! आज त्यांचा वाढदिवस ..! त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांच्या सर्व चाहत्यांचा वतीने केलेला हा लेखप्रपंच ...!
                 माझी आणि त्यांची भेट त्यांच्याच कार्यालयात पहिल्यांदा झाली. मी नुकताच एस.व्ही.एस. टेलीकॉम नावाचा व्यवसाय सुरु केला होता. माझ्या कडे कुणीही काम करत नसल्यामुळे मीच त्या कंपनीचे मार्केटिंग करत फिरत होतो. वणवण भटकून काहीही यश मिळत नव्हते..अशा वेळी माझे मित्र राजू मुंबईकर यांनी 'तुम्ही रवीशेठ ना भेटा ' असे सुचविले ...मी घाबरतच त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना भेटलो.( कारण त्या अगोदर अनेकांनी मला सेल्समन समजून अपमानास्पद वागणूक दिली होती ), परंतु मला इथे वेगळाच अनुभव आला ...रवीशेठ पाटील  आणि त्यांचे सहकारी बाळाराम पाटील यांनी माझ्या कंपनी विषयी सर्व ऐकून घेतले आणि माझ्याविषयी माहिती विचारली आणि या प्रोडकट ची सर्वात जास्त किमत विचारली. त्यांनी  माझ्या व्यवसायाला आधार तर दिलाच परंतु अनेकांना 'आपला आगरी मुलगा काहीतरी धडपड करतोय त्याला पुढे जायला मदत करा असे आवाहनही  केले .पहिल्या भेटीतच मला त्यांच्या विषयी खूप आदर वाटू लागला.
                   आणि दुसरी भेट खरच नमूद करण्यासारखी ...वहाळ येथील आगरी साहित्य संमेलन ..अजूनही अनेकांच्या स्मरणात असेल ...साहित्यिकांना तर विसरताच येणे शक्य नाही ..उत्तम आयोजन ..सर्व कवी, लेखक, साहित्यिक , कलाकार,नेतेमंडळी , पाहुणे यांची उत्तम बडदास्त ...आणि सर्वांसाठी झटणारी एकमेव व्यक्ती - रवीशेठ पाटील ..माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा तो दिवस ..समारोपाला एक तासाचा मनोरंजनाचा कार्यक्रम करण्याची जबाबदारी ..जॉनी रावत ( पोट धरून हसा ), दिलीप खन्ना ( हास्यदरबार ) आणि वेळ शिल्लक राहिला तर मला संधी ..! पण रवीशेठ पाटील यांनी वेळ झालेला असताना सुद्धा मला १० मिनिटे कार्यक्रम करण्याची संधी दिली ...आणि त्यामुळे सर्व रसिक प्रेक्षकांसमोर  'संजीवन म्हात्रे' हे नाव आलं...लगेच रवीशेठ पाटील यांनी मला 'कर्नाळा महोत्सव' मध्ये कार्यक्रम करण्याची संधी दिली ..'आपला कलाकार पुढे गेला पाहिजे ...म्हणून सर्वच कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे रवीशेठ ..सर्वांचे आदराचे स्थान आहेत. प्रत्येक समारंभ , सांस्कृतिक कार्यक्रम , अनेक आंदोलने यामधून प्रत्यके वेळी माझ्या नावाचा हट्ट रवीशेठ पाटील यांनी धरला आणि आज ' संजीवन म्हात्रे " हे नाव सर्वश्रुत होण्यात ' रवीशेठ पाटील " यांचा खूप मोठा वरदहस्त माझ्यावर आहे हे आपण सर्वजण जाणताच...!
                   नम्रपणा हा त्यांचा खूप मोठा गुण आहे. सर्वांबरोबर आदराने, प्रेमाने बोलणं ...त्यांची विचारपूस करणं ...नमस्कार करणं ...हि त्यांना भेटल्यावर प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट ..! आपल्या ओळखीच्या माणसांबरोबर ते चांगलं वागतात ..परंतु अनोळखी माणसांबरोबर सुद्धा ते तेवढ्याच आदराने वागतात. गरिबीतून संघर्ष करत आलेले रवीशेठ आपल्या गरिबीला विसरलेले नाहीत. त्यांच्या बालपणीच्या सवंगड्याना आताही हे तसेच भेटतात. माणसाना जोडण आणि जोडून ठेवण हि त्यांच्या स्वभावाचे खास वैशिठ्य आहे . नेहमी हसतमुख असणारे रवीशेठ ...आपल्या हास्यविनोदाने गंभीर प्रसंग सुद्धा हलका करतात..हे मी जवळून पाहिलेले आहे. सामाजिक , सांस्कृतिक , खेळ , अध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय या सर्वच क्षेत्रामध्ये रवीशेठ पाटील यांच्याविषयी सर्वांच्याच मनात आदर आहे.
             कोणत्याही संकटाला  धावून येणारी व्यक्ती आणि कोणताही प्रसंग सामंजस्याने हाताळणारी व्यक्ती म्हणू रवीशेठ पाटील यांची ख्याती आहे. 'पोलीस मित्र " असणारे रवीशेठ पाटील सर्व पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करत असतात. सामाजिक सुरक्षितता, कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी या भूमिकेतून पोलिसांना सर्वतोपरी मदत काणारे रवीशेठ, समाजातील कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन सर्वसमान्य माणसाना सतत मदतीचा हात पुढे करत असतात. उरण विभागात सतत निर्माण होणारी वाहतूक समस्या आणि त्यामधून होणारे सर्वसामान्य माणसांचे  हाल त्यांना स्वस्थ  बसू देत नाही. हि वाहतूक कोंडी सुटावी म्हणून आपल्या परीने ते सारखे प्रयत्न शील असतात.
              अध्यात्मिक क्षेत्रात रवीशेठ पाटील हे नाव  संपूर्ण परिसरात गाजत आहे. आपल्या साईभक्तीने सर्व साई भक्तांच्या गळ्यातील  ते ताईत बनले आहेत. साई मंदिरांच्या माध्यमातून त्यांनी उरण , पनवेल , नवी मुंबई परिसरात एक अध्यात्मिक चळवळ सुरु केली आहे. दर गुरुवारी होणाऱ्या मंदिरातील कार्यक्रमाला हजारों साई भक्तांची गर्दी उसळलेली असते. इतके लोक एकत्र येऊन सुद्धा गेली तीन वर्ष एकही अनुचित प्रकार कधी घडला नाही याचे सर्व श्रेय रवीशेठ पाटील यांनाच द्यावं लागतं. प्रत्येक गोष्टीत जातीने लक्ष घालून आपल्या सर्व सहकार्यांना ते एक आदर्श घालून देतात. साई मंदिरामध्ये " साई सन्मान " पुरस्कार सुरु करून विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करू त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम रवीशेठ पाटील यांनी केले आहे आणि ते अविरत सुरु आहे. " वाचावी ज्ञानेश्वरी घरोघरी " सलग ७२ तासांचा भजन गायनाचा विक्रम ' असे अनेक उपक्रम त्यांनी आयोजित  करून आध्यात्मिक चळवळीला एक वेगळे बळ निर्माण करून दिले.
              सांस्कृतिक क्षेत्रात रवीशेठ पाटील यांच्या मुळे अनेक कलाकार पुढे आले आहेत. हरीश मोकल , गुरु कदम , संजीवन म्हात्रे अशी कितीतरी नावे सांगता येतील. अनेक भजन गायक , वादक , कवी , नाट्य कलाकार , शाहीर , नकलाकार , लेखक या सर्वाना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं मोठ काम रवीशेठ पाटील यांनी केल आहे. अनेक गावा गावांमध्ये भजन मंडळे स्थापन झाली आणि काहींनी लोप पावलेली हि कला पुनर्जीवित केली ..'कर्नाळा'  वाहिनी आणि आता सुरु झालेली 'साई श्रद्धा'  वाहिनी यांच्या माध्यमातून रवीशेठ पाटील यांनी सर्व कलाकारांना समाजासमोर आणण्याचा जणू विडाच उचलला आहे. आजच्या तरुणांपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कायम राहावा म्हणून प्रशांत देशमुख , गणेश शिंदे , शिवशाहीर वैभव घरत या सर्वांच्या माध्यमातून ते शिवचरित्र समाजासमोर ठेवत असतात. ' मला शिवाजी व्हायचय " या माझ्या नवीन कार्यक्रमाला प्रोत्साहन ' रवीशेठ पाटील' यांचेच ..!
              स्पोर्ट्स या क्षेत्रात रवीशेठ पाटील यांचे भरीव योगदान आहे. गेली अनेक वर्ष " कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमी " चे उपाध्यक्ष असलेले रवीशेठ पाटील सन्माननिय माजी आमदार विवेक पाटील यांच्या 'विजन २०२०  हे स्वप्न साकारण्यात त्यांनी वाहून घेतले आहे. भारताला एकतरी सुवर्णपदक मिळवून देण्याचे आमदार विवेक पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. रायगड जिल्ह्याचे खो खो च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक तालुका पातळीवरील सार्ध आयोजित करून अनेक प्रतिभावंत  खो खो खेळाडू शोधून काढून त्यांना जिल्हा स्तरावर  आणि राज्य स्तरावर नेण्याचे काम रवीशेठ करत आहेत.  याबरोबर कब्बड्डी आणि सर्वच मैदानी खेळ यांना रवीशेठ सतत प्रोत्साहन देत असतात.
             शैक्षणिक क्षेत्रात रवीशेठ पाटील यांनी  'नवी मुबई एविएशन अकॅडेमी ' ची स्थापना आपल्या तरुण सुशिक्षित सहकारयाना हाताशी धरून केली.  सर्व प्रकल्पग्रस्तांना येणाऱ्या 'आंतराष्ट्रीय विमानतळ " या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरी मिळाव्या  आणि त्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे शिक्षण मोफत मिळावे म्हणून सिडको बरोबर सतत वाटाघाटी करून यशस्वी प्रयत्न केले . गेली वर्षभर सतत ते या गोष्टीच पाठपुरावा करत आहेत. आपल्या प्रकल्पग्रस्त बांधवाना ,तरुण पिढीला ,  तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण , सर्व प्रकारचे प्रशिक्षण मिळावे म्हणून अनेक योजना ते सतत आखत असतात.
             हे कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल एक रवीशेठ पाटील हे एक उत्तम गायक आहेत. कर्नाळा वाहिनीवर त्याची झलक अनेकदा दिसली आहे. मनमिळावू आणि भावनिक असलेले रवीशेठ " बने चाहे दुश्मन जमाना  हमारा ' हे गाताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू मी पहिले आहेत. उत्तम केलेची जाण असलेले रवीशेठ कलाकारांचे उत्तम पारखी आहेत. साहित्य, कला , संगीत , अध्यात्म , सामाजिक , शैक्षणिक या सर्वच क्षेत्रात रमणारे रवीशेठ पाटील हे सर्व तरुणानी आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व आहे. परिपूर्ण जीवन कसे जगावे याचा आदर्श त्यांच्याकडून मिळतो. अशी व्यक्ती मित्र , सखा आणि मार्गदर्शक  म्हणून माझ्या आयुष्यात आहे हे माझे भाग्य समजतो. आजच्या वाढदिवस् प्रसंगी  मी परमेश्वराकडे त्यांना उत्तम आरोग्य , संपदा , आणि दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो  ..!
- हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Monday, February 8, 2016

वावंजे हायस्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन - २०१६

नमस्कार ..!
वावंजे हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज च्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ' सेलेब्रिटी गेस्ट" म्हणून उपस्थित होतो.  हे कॉलेज रयत शिक्षण संस्थेचे आणि मी सुद्धा रयत चाच विद्यार्थी असल्यामुळे माझ्याच शाळेत आल्यासारख वाटत होत. शाळेचे सर्व शिक्षक,स्कूल कमिटी  ,ग्रामस्थ आणि स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. जी. आर. पाटील यांनी  हि शाळा सर्वोत्तम आणि डिजिटल करण्यासाठी जी  मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ..! मुलांनी माझे 'स्पीच ' खूप एन्जोय केले ...बक्षीस वितरणात सुद्धा मुलांचे गुण पाहून अभिमान आणि कौतुक वाटलं. मला आमंत्रित केल्याबद्दल सर्व स्कूल कमिटीचे मन;पूर्वक  धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

भाऊसाहेब नेने कॉलेज पेण येथे " Goal setting" व्याख्यान

नमस्कार...!
संजीवन मार्ग आणि मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊसाहेब नेने कॉलेज पेण येथे " Goal setting" याविषयावर माझे व्याख्यान चे आयोजन करण्यात आले. सलग दुसऱ्या वर्षी मी या कॉलेज मध्ये व्याख्यान करत होतो. खूप चांगल्या प्रतिसादाबद्दल कॉलेज आणि मिटकॉन संस्थेचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, February 4, 2016

जल्लोष महोत्सव -२०१६ उरण

नमस्कार ..!
शेतकरी कामगार पक्ष उरण यांच्या माध्यमातून 'जल्लोष महोत्सव - २०१६' या कार्यक्रमास 'सन्माननिय पाहुणे '  म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली. माझ्यासोबत रंगमंचावर  १००९ धावांचा जागतिक उच्चांक केलेला 'प्रणव धनावडे' आणि सन्माननीय 'कोकणरत्न' रवीशेठ पाटील , महादेव घरत, अमित भोईर, रमाकांत म्हात्रे इत्यादी मान्यवर हजर होते. ४ दिवस चाललेल्या या भव्य महोत्सवामध्ये अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. भव्य आयोजन आणि उरणकरांचा उस्फुर्त प्रतिसाद यामुळे हा महोत्सव दीर्घकाळ स्मरणात राहील. सन्माननिय माजी आमदार श्री. विवेक पाटील , श्री. एल.बी. पाटील सर आणि शे. का. पक्ष चे सर्वच कार्यकर्ते एक घरातील 'मुलगा' म्हणून नेहमीच प्रेम आणि आपुलकी चा वर्षाव करतात. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Wednesday, February 3, 2016

बी.पी. सी. एल. स्थापना दिवस कार्यक्रम - " याल तर हसाल "

नमस्कार ..!
"याल तर हसाल' चा बी.पी. सी. एल. कंपनीतील हा सलग दुसरा कार्यक्रम ..! अगदी अचानक ठरलेला कार्यक्रम .....म्हणजे माझा मित्र किरीट पाटील यांच्या २ तास अगोदर आलेल्या फोनवर हा शो ठरला आणि आमच्या कलाकारांनी तो यशस्वी केला सुद्धा ..! त्याबद्दल 'याल तर हसाल ' टीम चे विशेष अभिनंदन ..आणि बी.पी सी.एल कंपनी मध्ये जमलेल्या माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे सुद्धा ..! रणरणत्या उन्हात हि सर्व मंडळी एक तास थांबून राहिली. कार्यक्रम नेहमीप्रमाणे मस्त रंगला ...मात्र अत्यंत घाईगर्दीत आणि कठीण परिस्थितीत आणि केवळ रसिक आणि मित्रमंडळी यासाठी केलेला शो स्मरणात राहावा ...असाच झाला ...! सर्वांचे मन;पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Tuesday, February 2, 2016

भजन स्पर्धा - विचुंबे

नमस्कार ..!
विचुंबे येथील भजन स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली. तसा माझे भजन या क्षेत्रातील अज्ञान सर्वश्रुत आहेच. परंतु श्री अनिल भोईर आणि गणेश म्हात्रे यांनी माझ्या उपस्थिती विषयी खूप आग्रह धरला.  तसा मी चांगला 'कानसेन' आहे.  कुठेही , कोणतीही पारंपारिक कला सादर होत असेल तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी मी नेहमीच आतुर असतो .या स्पर्धेला अनेक दिग्गज गायक, पखवाज, हार्मोनीअम, तबला वादक आणि भजन क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. अत्यंत श्रवणीय  झालेल्या या भजन स्पर्धेला मला सन्मानित करण्यात आले त्याबद्दल आयोजकांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन  म्हात्रे .

Monday, February 1, 2016

माझ्या " यु ट्यूब " चनेल ने ५०००० 'व्ह्यूज' चा टप्पा पूर्ण..!

नमस्कार..!
माझ्या " यु ट्यूब " चनेल ने ५०००० 'व्ह्यूज' चा टप्पा पूर्ण केला आहे. सध्या दररोज किमान ३०० लोक या चनेल वर भेट देऊन " याल तर हसाल " च्या व्हिडीओ चाआनद घेत असतात . माझ्या रसिक श्रोते ,प्रेक्षक , हितचिंतक आणि मित्रमंडळी यांच्यामुळे हे सर्व शक्य आहे. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद...! यु ट्यूब वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
 https://www.youtube.com/channel/UC1QD8_vXouk66eoPmNWQrFA
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे