Tuesday, November 24, 2015

भविष्यकाळ ...!

नमस्कार ...!
भविष्यकाळात अनेक योजना आहेत ...! माझे काही चाहते नेहमी विचारत असतात कि ५३५ प्रयोगानंतर सुद्धा अजून कोणत्याही वाहिनीवर झळकलो नाही ...अनेक मोठे कलाकार शो मध्ये येऊन गेले परंतु अजून कोणताही चित्रपट वैगेरे नाही. 'याल तर हसाल'  चे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयोग का नाहीत ?  'चला हवा येऊ द्या ' मध्ये किंवा 'कॉमेडी एक्सप्रेस' मध्ये का जात नाहीत .....  असे अनेक प्रश्न आहेत आणि माझे चाहते सतत याची चिंता करत असतात कि माझे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झळकायला पाहिजे ..!  माझे हितचिंतक , मार्गदर्शक सतत यासाठी प्रयत्न करत असतात. त्या बद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. आणि या ऋणातून मला  आजन्म मुक्त व्हायचे नाही ..!  या ऋणातून उतराई होणे शक्य नाही ..!
     माझ्या चाहत्यांचा मला खूप आधार वाटतो ...आणि आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करण्याचा मि जरूर प्रयत्न करीन. ..आपल्या प्रेम आणि आशीर्वाद असेल तर सर्व काही शक्य आहे. संकल्प आहेत ...तर सिध्दी पण असणारच ..! सध्या " याल तर हसाल " व्यावसायिक रंगभूमीवर हळूहळू स्थिरावतोय ...अजून खूप पुढे जायचे आहे ...आणि सर्वांची साथ असेल तर ...sky is the LIMIT....!!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Wednesday, November 18, 2015


 


















नमस्कार … ! 
नवी मुंबई पोलिस परिमंडळ-२ यांनी आयोजित केलेल्या दिवाळी मेळाव्यामध्ये उपस्थित राहण्याचा योग आला . सन्माननिय पोलिस उपायुक्त श्री . विश्वास पांढरे साहेब आणि सहआयुक्त श्री . शेषराव सूर्यवंशी साहेब , श्री . बाजीराव भोसले साहेब आणि त्यांचे सहकारी पोलिस अधिकारी आणि नवी मुंबई पोलिस यांनी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मेळावा आयोजित केला होता . या समारंभात अंध कलाकारांचा वाद्यवृंद यांनी आपली कला सादर करून सर्वांनाच थक्क करून सोडले . अत्यंत निटनेटके आयोजन ,खेळीमेळीचे वातावरण यामुळे सतत कौटुंबिक जिव्हाळ्याचा स्पर्श या कार्यक्रमात जाणवत होता . पोलिस आयुक्त प्रभात रंजन साहेब यांची उपस्थिती ,सहाय्यक पोलिस आयुक्त श्री . चव्हाण  साहेब यांनी सदर केलेली "चढता सुरज "हि कव्वाली आणि पांढरे साहेबांनी सदर केलेली कविता या सर्वांमुळे कार्यक्रमाला ' चार चांद ' लागले असेच म्हणावे लागेल . सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा भाग म्हणून या कार्यक्रमात सहभागी होण्याचा सन्मान दिला सर्व अधिकारी मित्रांचे मन:पूर्वक धन्यवाद ……। आणि खूप खूप आभार ……. !

शनिवार दिनांक ७ नोव्हेंबर २०१५ रोजी नवी मुंबईतील प्रकल्प ग्रस्त गावांमधील गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याच्या  अनुषंगाने आणि प्रकल्पग्रस्त गावांना फक्त नियमित नव्हे तर स्मार्टपणे नियमित करण्याच्या अनुषंगाने " स्मार्ट विलेज " या सदराखाली 'खुले चर्चा सत्र  'कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिरातील श्री . मोरेश्वर चिंतामण पाटील सभागृहात आयोजित करण्यात आले होते . निवडक उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या चर्चा सत्रात नवी मुंबईतील विविध गावांमधील ७० एक लोकांनी यात सहभाग घेतला . आगरीकोळी हास्यप्रबोधनकार श्री . संजीवन म्हात्रे यांच्या आगरी कोळी शैलीतील मार्गदर्शनपर भाषणाने पहिल्या सत्राची सुरुवात झाली . ज्यात त्यांनी त्यांच्या शैलीत हसवत आणि चिमटे घेत सामाजिक भावनेला हात घालत चर्चासत्रासाठी पोषक अशी वातावरणनिर्मिती केली .  














"स्वराज्य तोरण " या दैनिकाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या " याल तर हसाल " च्या कार्यक्रमाला वळपाडा ,भिवंडी य़ेथे रसिकांनी तुडुंब गर्दी केली . अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रयोग खूप रंगला . भिवंडीकरांचे मन:पूर्वक धन्यवाद …. ! स्वराज्य तोरणचे संस्थापक श्री . किशोर पाटील, धर्मसेवक श्री . सोन्या पाटील, राजाराम पाटील ,जयेंद्र खुणे आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला खूप दाद दिली आणि रसिकांनी हा प्रयोग भिवंडीत वारंवार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली . सर्वांचे शतशः आभार …. !
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 
नमस्कार ….!
आज मराठी रंगभूमी दिवस …!  आयुष्यात आज जो आनंद ,मान -सन्मान जे सर्व काही आहे ते सर्व रंगभूमीने दिले आणि या सर्वांपेक्षा जास्त महत्त्वाचे माझ्या रसिकांनी माझ्यावर केलेले प्रेम …! लाखो लोकांना  दु:ख  विसरायला लावत मनसोक्त हसविण्याचे भाग्य माझ्या पदरात रंगभूमीने दिले हे माझे परमभाग्यच …! आज ५३२ कार्यक्रमानंतर सुद्धा " याल तर हसाल "प्रत्येक प्रयोगागणिक लोकप्रियता गाठतो आहे याचे सर्व श्रेय रंगभूमीचा आशीर्वाद आणि रसिक मायबाप आणि मित्रमंडळींचा सहयोग …. ! या रंगभूमीची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत घडावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना … !
आपला सर्वांचा -हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .  
Add caption











नमस्कार …….!
भिवंडीत झालेल्या " याल तर हसाल " या कार्यक्रमाची वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी ……!सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद  …… !
आपला सर्वांचा -हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .  

नमस्कार ….!
विक्रीकर भवन ,बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ,मुंबई येथे १ ऑक्टो . २०१५ रोजी विक्रीकर दिनाच्या निमित्ताने माझे   ' मार्ग सुखाचा ' हे व्याख्यान आयोजित केले होते . सदर करताना विक्रीकर कर्मचाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला . विक्रीकर उपायुक्त श्री . दीपटे  साहेब यांनी विशेष कौतुक केले आणि आभार मानले . श्री राहुल सोनावणे यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले . या सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा -हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 
नमस्कार …….!
सह्याद्री प्रतिष्ठान ,उरण ने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध गड -किल्ल्यांची माहिती देणारे चित्रप्रदर्शन साईनगर ,साई मंदिर वहाळ ,पनवेल येथे आयोजित केले होते . अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सर्व प्रकारच्या गड-किल्ल्यांची माहिती देणारे हे प्रदर्शन म्हणजे शिवप्रेमींना एक पर्वणीच होती . या कार्यक्रमाचा भाग म्हणून उपस्थित राहता आले हे माझे भाग्य समजतो . श्री ऱविशेथ पाटील यांनी आणि  सर्व साई भक्तांनी सह्याद्री प्रतीष्ठानचे खूप कौतुक केले आणि धन्यवाद दिले. त्यांनी असेच कार्य अधिक जोमाने पुढे न्यावे आणि तरुणांपुढे आदर्श निर्माण करावेत यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो .
आपला सर्वांचा -हास्यप्रबोधनकार  संजीवन म्हात्रे . 

स्पंदन फाउंडेशन चा पहिला कार्यक्रम - १५ नोव्हे. २०१५

नमस्कार ..!
स्पंदन फाउंडेशन ची स्थापना वंदना तासगावकर, वर्षा काशिद , आणि वैशाली लांडगे यांनी आपल्या वडिलांच्या कै. सीताराम कांबळे यांच्या स्मरणार्थ केली. फाउंडेशन मध्ये श्री. नंदकुमार तासगावकर, श्री महेश काशिद आणि श्री शेखर सुळगावकर या सर्व कुटुंबियांच्या बरोबरच मला या संस्थेचा संस्थापक सदस्य होण्याचा मान मिळाला याबद्दल मी या सर्व कुटुंबियांचे आभार मानतो. फाउंडेशन चा पहिलाच कार्यक्रम शेलघर च्या आदिवासी वाडीतील महिलांना साडी वाटप आणि मुलांना दिवाळी फराळ व भेटवस्तू देऊन  पार पडला. यासाठी सक्सेस फाउंडेशन चे सुरज भगत , परेश भगत , भूपेश म्हात्रे आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळीनी खूप मेहनत घेतली. 'थोडा आनंद देऊ या , थोडा आनंद घेऊ या ' या ब्रीदवाक्य असलेले हि संस्था गरीब, दिन दुबळे, दु:खी , पिडीत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सदैव संपूर्ण महाराष्ट्रात काम करेल. सर्वाना खूप शुभेच्छा आणि मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.


नमस्कार ….!
माझ्या ' याल तर हसाल ' च्या  youtube channel ज्या प्रमाणे आपण प्रतिसाद दिलात तसाच जबरदस्त प्रतिसाद माझ्या " संजीवन मार्ग  " या channel  ला सुद्धा द्याल यामध्ये मला तिळमात्र शंका नाही .…!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 
नमस्कार …!
भारतीय पुरस्कार विजेत्या संघातर्फे मला काल मान्यवरांच्या हस्ते ' राष्ट्रीय हास्य प्रबोधनकार पुरस्कार ' प्रदान करण्यात आला . माझ्या बरोबरच विविध क्षेत्रातील दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला . त्यामध्ये शिवसेनेचे उपनेते श्री. अनंत तरे ,सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे ,चित्रपट निर्माते ,दिग्दर्शक नागेश भोसले ,साई  संस्थानाचे वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील इत्यादी अनेक मान्यवरांचा यामध्ये समावेश होता . हा पुरस्कार मी माझ्या रसिक प्रेक्षकांना अर्पण करतो . आपले प्रेम सदैव असेच पाठीशी असू द्या .
आपला सर्वांचा -हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे