Sunday, January 31, 2016

आगरी कोळी युथ फाउन्डेशन



नमस्कार ..!
आगरी कोळी युथ फाउन्डेशन चा एक भाग असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. निलेश पाटील, मनोज म्हात्रे , रवी मढवी आणि या चळवळी मध्ये सहभागी असणारे माझे सर्व आगरी कोळी बांधव या सर्वाना खूप खूप धन्यवाद ..! सेझ चे आंदोलन,साडे बारा टक्के चे आंदोलन , आणि वेगवेगळ्या प्रश्नांची भूमिपुत्रांची आंदोलने यामध्ये नेहमीच माझ्या समाजबांधवानी मला खारीचा वाटा उचलण्याची संधी दिली आहे ..! यापुढील आगरी , कोळी आणि सर्व भूमिपुत्र यांच्या कोणत्याही आंदोलनात खारीचा वाटा उचलता आला तर मी स्वत:ला खूप भाग्यवान समजेन आणि कृतकृत्य सुद्धा ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

ऐरोली आगरी महोत्सव - २०१६

नमस्कार ..!
ऐरोली च्या " आगरी महोत्सव -२०१६" मध्ये 'सेलेब्रिटी गेस्ट' म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला. जगदीश पाटील,( सुप्रसिद्ध गायक ),प्रियांका शेट्टी ( लावणी क़्विन ), एहसान कुरेशी ( लाफ्टर चालेंज फेम,हिंदी कवी ), बिरबल (बॉलीवूड कलाकार ), अभिलाषा म्हात्रे ( अर्जुन पुरस्कार विजेती कबड्डी खेळाडू ) या सर्वांबरोबर रंगमंचावर कार्यक्रम सादर करताना एक वेगळाच आनंद  मिळाला. सर्व रसिक प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्या देत " याल तर हसाल" ला मनसोक्त दाद दिली. अत्यंत भव्य आयोजन आणि कल्पक नियोजन या बद्दल आयोजकांचे आणि रवी पाटील ( कोकण रत्न ) यांचे मन:पूर्वक आभार आणि रसिकांना खूप खूप धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Friday, January 29, 2016

ग्रेट भेट - ००५ - श्रेयस तळपदे

नमस्कार ..!
नवी मुंबई पोलीस यांनी आयोजित केलेल्या रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या समारोप प्रसंगी श्रेयस तळपदे यांची भेट  झाली. नवी मुंबई ( वाहतूक ) विभागाचे पोलीस उपायुक्त श्री अरविंद साळवे यांनी माझी ओळख करून दिली. मराठी कलाकार जेव्हा हिंदी सिनेमाचा रुपेरी पडदा गाजवितात अशा सर्व कलाकारांचा खूप अभिमान वाटतो. श्रेयस ने आपल्या अभिनयाने  आपली एक वेगळी ओळख बॉलीवूड मध्ये निर्माण केली आहे. एवढा मोठा स्टार असून सुद्धा त्याने मस्त गप्पा मारल्या  " याल तर हसाल " या विषयी  मी त्याला सांगितले. सर्व उपस्थिताना त्याने आपल्या भाषणातून रस्ते सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. एक चांगल्या कलाकाराला भेटल्याचे समाधान मिळाले ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Thursday, January 28, 2016

"आगरी गौरव " पुरस्कार -खारघर २०१६

नमस्कार ..!
कविवर्य अरुण म्हात्रे , जयेंद्र खुणे यांच्या बरोबर  रंगमंचावर " आगरी गौरव " पुरस्कार प्राप्त करणे हा खूप मोठा सन्मान आहे असे मला वाटते. खारघर च्या आगरी महोत्सव - २०१६ मध्ये आगरी गौरव पुरस्कारासाठी आम्हा तिघांना लोककला, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रात पुरस्कार देण्यात  आला.  माजी महापौर व शिवसेना उपनेते श्री अनंत तरे , कोकण रत्न रवीशेठ पाटील यांच्या हस्ते आणि उपस्थितीत पुरस्कार स्वीकारणे हे हि भाग्यचं..! श्री . विजय उलवेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मन:पूर्वक धन्यवाद ...! अर्थात याही पुरस्काराचे मानकरी माझे रसिक श्रोते आणि  हितचिंतक मित्रमंडळी ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

रस्ते सुरक्षा साप्ताह - अभियान -नवी मुंबई पोलीस -उरण

नमस्कार ..!
नवी मुंबई पोलीस यांच्या वतीने रस्ते सुरक्षा सप्ताह - २०१६ या उपक्रमामध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली  होती. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून  जे.एन.पी.टी. च्या सभागृहात आयोजित केलेल्या समारंभात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. ट्रेलर चालक , ट्रान्सपोर्टर,  वाहतूक पोलीस अधिकारी, आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती यांच्या उपस्थितीत जनजागृती आणि प्रबोधन करण्याची संधी मिळाली. सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Tuesday, January 26, 2016

भिवंडी आगरी महोत्सव - २५ जाने . २०१६



"याल तर हसाल " च्या भिवंडी आगरी महोत्सवातील या कार्यक्रमाने गर्दीचा उच्चांक गाठला.साई सेवक प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला. या रसिकांच्या जनसागराला हास्याची तुफान मेजवानी " याल तर हसाल" ने दिली. पहिल्यांदाच भिवंडी मधील रसिक एवढ्या मोठ्या संख्याने कार्यक्रमाचा आनंद घेत होते. हजारोंची कौतुकाची थाप पाठीवर अनुभवताना खूप कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. या कार्यक्रमाचे आयोजक श्री, सोन्या पाटील यांचे मन:पूर्वक धन्यवाद..! रसिकांचे खूप खूप आभार..! !
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

26 जाने. २०१६ - कपडे वाटप संकल्पनेचा शुभारंभ ..!

नमस्कार...!
आज प्रजासत्ताक दिन..! आजच्या दिवशी काहीतरी चांगलं करावं असे मनोमन वाटत होतं ..माझे मित्र सुरज भगत यांनी गरीब , गरजू आणि आदिवासी वाडीवर कपडे वाटपाची कल्पना मांडली. संजीवन मार्ग , सक्सेस फाउंडेशन, स्पंदन फाउंडेशन या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला आपण सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिलात...आज टाकीगावच्या आदिवासी वाडीत याचा शुभारंभ होतोय..! फक्त आजच नाही तर वर्षभरहि मोहीम अशीच सुरु राहील...त्यासाठी आपला आशीर्वाद आणि सहकार्य हवेच...!!आम्हाला ज्या कपडे दात्यांनी मदत केली त्या सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Friday, January 22, 2016

सिद्धार्थ ( माझा मुलगा ) ची हर्रीस मधली चमकदार खेळी ..!

नमस्कार..!
माझा मुलगा सिद्धार्थ म्हात्रे याने मुंबईत 'हर्रीस शिल्ड' या १६ वर्षाखालील मुलांच्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये माटुंगा प्रीमिअर शाळेकडून खेळताना पहिल्या डावात शतक ( १०१ धावा १७चौकार ) आणि दुसऱ्या डावात ७६ धावांची खेळी केली. सातत्याने तो शालेय क्रिकेट मध्ये चांगली कामगिरी करतोय...एक पिता म्हणून त्याची मेहनत आणि जिद्द याचे मला कौतुक आणि सार्थ अभिमान वाटतो. आपण नेहमीच त्याला माझ्या प्रमाणेच प्रोत्साहन देता याबद्दल सर्वांचे धन्यवाद...!!
आपला सर्वांचा- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Tuesday, January 19, 2016

नवी मुंबई पोलिसांचा महिला मेळावा - नवीन पनवेल

नमस्कार ..!
नवी मुंबई पोलिस यांच्या विद्यमाने पिल्लई कॉलेज नवीन पनवेल च्या भव्य सभागृहात महिलांसाठी हळदीकुंकू आणि प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. "याल तर हसाल"च्या माध्यमातून पोलिसांसाठी  तयार करत असलेल्या विशेष कार्यक्रमाची यामध्ये झलक सादर केली. सन्माननीय पोलिस आयुक्त श्री .प्रभात रंजन साहेब, पोलिस उपायुक्त श्री विश्वास पांढरे साहेब , श्री शेषराव सूर्यवंशी, आमदार श्री प्रशांत ठाकूर आणि सर्व पोलिस अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.सर्व महिलांनी स्व- सुरक्षा आणि गुन्हे प्रतिबंध या विषयावर सादर केलेल्या या कार्यक्रमाला जबरदस्त दाद दिली. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Monday, January 18, 2016

मार्ग सुखाचा - माझे संगीतमय व्याख्यान ..!

नमस्कार ..!
प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करत सुखाची आनंदाची अनुभूती अनुभवता येते असे मला वाटते ..जीवनाला फुलविताना या दोन्ही अंगांची अत्यंत आवश्यकता आहे ...! " मार्ग सुखाचा " या माझ्या नव्यानेच सुरु झालेल्या संगीतमय व्याख्यानाचा हाच विषय होता.  आधुनिक जगात वावरताना विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम असलेला तरुण वर्ग निर्माण करून त्याला " कर्मा " कडे झुकविले पाहिजे असे मला वाटते ...त्याचाच हा प्रयत्न ..! दुर्मिळ झालेल्या सुखाची ...आनंदाची ..सहज , सोपी ओळख करून देणारा हा कार्यक्रम ..!  स्वर्गीय  ह.ना .भगत गुरुजी यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त माझ्या खोपटे गावातच हा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. समोर बसलेले अत्यंत जाणकार, बुजुर्ग , अनुभवी मंडळी , कुतूहलाने जमलेला तरुणवर्ग या सर्वानीच या कार्यक्रमाचे  स्वागत आणि कौतुक केले , बुजुर्गांनी आशीर्वाद दिले ...! सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Sunday, January 17, 2016

आगरी महोत्सव - खारघर २०१६ - 'याल तर हसाल' कार्यक्रम


नमस्कार ..!
महोत्सव ...याल तर हसाल ..प्रचंड गर्दी ...तुफान हास्याचे मंतरलेले दोन तास ...टाळ्यांचे कडकडाट ...मंत्रमुग्ध रसिक ...हे समीकरण अनेकवेळा प्रमाणे काल पुन्हा पाहायला मिळाले ...आगरी महोत्सव खारघर - २०१६  मध्ये ...'याल तर हसाल'  चा ५५७ व कार्यक्रम मस्त गाजला ...कार्यक्रमाची वेळ संपूनही रसिकांच्या आग्रहाखातर  आणखी वेळ वाढवावा लागला ...यातच सर्व काही आले ...!! अत्यंत सुंदर आणि भव्य आयोजन  आयोजन  हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ..! सर्व रसिक प्रेक्षक, महोत्सवाचे आयोजक , खारघर चे नागरिक आणि सर्वांचे मन;पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Wednesday, January 13, 2016

नवी मुंबई पोलिस - प्रबोधन मेळावा

नमस्कार ..!
नवी मुंबई पोलिस यांच्या माध्यमातून सागर तटरक्षक दल , ग्राम रक्षक दल , पोलिस मित्र आणि मच्छिमार बांधव यांच्याकरिता प्रबोधन मेळावा जे एन पी टी टाऊनशिप येथे आयोजित केला होता आणि त्यामध्ये "याल तर हसाल " चा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. गच्च भरलेल्या सभागृहात पोलीस आयुक्त प्रभात रजन साहेब,पोलिस उपायुक्त श्री विश्वास पांढरे , पोलिस उपायुक्त श्री सुरेश मेंगडे , माजी महापौर व शिवसेनेचे उपनेते श्री अनंत तरे , श्री रवीशेठ पाटील आणि अनेक पोलिस अधिकारी यासारख्या मान्यवरांमध्ये प्रबोधन करताना खूप आनंद झाला. सर्व पोलिस यंत्रणेने मला आणि माझ्या 'याल तर हसाल' टीम ला त्यांच्या कुटुंबियांचा एक भाग मानून , सर्व उपक्रमांमध्ये  सन्मान आणि सहभाग देतात यासाठी सर्व पोलिस अधिकारी यांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Monday, January 11, 2016

माध्यमिक शाळा आणि ज्यू. कॉलेज मोठी जुई ( ता. उरण ) चे वार्षिक स्नेहसंमेलन ..!

नमस्कार ..!
माध्यमिक शाळा आणि ज्यू. कॉलेज मोठी जुई यांच्या वार्षिक स्नेहसंमेलना मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला. जे.एन.पी.टी चे विश्वस्त भूषण पाटील , कोकणरत्न रवीशेठ पाटील, सुप्रसिद्ध निवेदक  हरीश मोकल या मान्यवरांची समारंभाला उपस्थिती होती.माझा तसा  मोठी जुई या गावाशी  तसा खूप जुना ऋणानुबंध आहे. 'याल तर हसाल ' या माझ्या कार्यक्रमाचे ५ पेक्षा जास्त कार्यक्रम या गावात सादर झालेत. पूर्व विभाग स्पोर्ट्स अकॅडेमी ची स्थापना, हुतात्मा स्मारक स्वच्छता अभियान अशा अनेक सामाजिक कामांची सुरुवात आम्ही मोठी जुई गावातूनच  केली होती.स्कूल कमिटीचे अध्यक्ष रमाकांत पाटील आणि त्यांचे सहकारी , शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांचे  मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

नवी मुंबई पोलिस यांच्या कुटुंबियांसाठी कार्यक्रम - ८ जाने. २०१६

नमस्कार ..!
विष्णुदास भावे नाट्यगृहात " याल तर हसाल " चा विशेष कार्यक्रम नवी मुंबई पोलिसांच्या साठी आयोजित केला होता. नवी मुंबई पोलिस उपायुक्त श्री शहाजी उमाप आणि श्री सुरेश मेंगडे आणि त्यांचे सर्व सहकारी पोलिस अधिकारी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमात मध्ये हास्याची फुफान कारंजी उठली ..टाळ्यांच्या लाटा उसळल्या पण त्याच बरोबर कर्तव्यदक्ष आणि विशेष कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांच्या सन्मानाने खूप बहार आली. सर्व पोलिस अधिकारी , त्यांचे कुटुंबिय  आणि सर्व रसिक श्रोत्यांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Thursday, January 7, 2016




नमस्कार …… !
आज विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी , नवी मुंबई. येथे रात्री ८ वाजता " याल तर हसाल " चा विशेष कार्यक्रम नवी मुंबई पोलिस यांच्यासाठी सदर होतोय . नवी मुंबई झोन -१ आणि २ यांच्या विशेष कार्यक्रमात " याल तर हसाल " सलग तिसऱ्यांदा सादर होतोय , यासाठी सर्व पोलिस दलाचे विशेष आभार …. !
      आपला सर्वांचा - हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 

Wednesday, January 6, 2016

ज्ञानदीप विद्यालय करावे गाव - रौप्यमहोत्सव " याल तर हसाल " कार्यक्रम

नमस्कार,
ज्ञानदीप विद्यालयाच्या रौप्यमहोत्सव निमित्त आयोजित केलेला "याल तर हसाल " चा कार्यक्रम तुफान रंगला. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी , नीटनेटके आणि भव्य आयोजन आणि नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक आणि महापौर श्री सोनावणे आणि अनेक मान्यवर यांची उपस्थिती यामुळे कार्यक्रम खूप रंगला. विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम करताना नेहमीच आनंद होतो पण तरीही आजचा कार्यक्रम विशेष वाटला. सर्व महाविद्यालयाचे शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , आयोजक , करावे ग्रामस्थ , विद्यार्थी आणि रसिक माय्बापांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Tuesday, January 5, 2016

राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प - वेश्वी -व्याख्यान

नमस्कार ...!
काल राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत वीर वाजेकर कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय फुंडे यांच्या वेश्वी येथील कॅम्प मध्ये माझे " तणाव नियंत्रण " ( stress Management ) या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते. या महाविद्यालयाचा मी माजी विद्यार्थी असल्यामुळे आपल्याच कॉलेज मध्ये व्याख्यानाला आमंत्रित  केल्यावर एक वेगळाच आनंद  होतो ...काल पुन्हा एकदा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला ..कारण सतत दुसऱ्या वर्षी हि संधी मला मिळाली.  आजच्या तरुणाई बरोबर  संवाद साधताना त्यांना असणाऱ्या अनेक तणावांशी परिचित होता आले आणि त्यांच्या समस्यांचे समाधान करता आले. माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष शेखर म्हात्रे ,
आमोद ठक्कर सर आणि त्यांचे सहकारी वर्ग यांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Monday, January 4, 2016

"याल तर हसाल " दीन्गोरे , ओतूर , पुणे कार्यक्रम

नमस्कार .. !
पुष्पावती कनिष्ठ महाविद्यालय , दिन्गोरे च्या वार्षिक स्नेहसंमेलन च्या निमित्ताने " याल तर हसाल " चा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. मुलांचा उत्साह , आणि रसिकांच्या टाळ्या, श्री नागेश भोसले  ( सिने अभिनेते ) यांची उपस्थिती  यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली. प्रथमच " याल तर हसाल " पुणे जिल्ह्यात होत असल्यामुळे या कार्यक्रमाचे एक विशेष आठवण राहिली. आयोजक श्री विलास डुंबरे , सर्व शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी  आणि दिन्गोरे ग्रामस्थांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Sunday, January 3, 2016

संजीवन म्हात्रे - सेलेब्रिटी गेस्ट ...२०१६

नमस्कार ..!
या वर्षाची सुरुवात च अत्यंत छान झाली ..! 'संजय भोपी सोशल क्लब ' आणि संजय पाटील मोरावे यांच्या मोर्निंग योगा क्लब च्या माध्यमातून आयोजित केलेल्या 'KPL २०१६' च्या ४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेत मी आणि शशांक केतकर ( होणार सून मी या घरची फेम ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो. संपूर्ण खांदा कॉलोनी आणि परिसरात मोठ मोठे होर्डींग्स लागले होते.  चित्रपट कलाकार आणि TV सीरिअल मधील कलाकारांना celebrity म्हणून खूप  सर्वच लोक खूप मान देतात ...परंतु आपल्या जवळ वावरणाऱ्या कलाकाराला असा celebrity म्हणून मान  देणे खूप मोठी गोष्ट आहे ...संजीव पाटील , संजय भोपी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मन:पूर्वक धन्यवाद ..! KPL चे आयोजन खूप सुंदर आणि स्पर्धा सुद्धा अत्यंत उत्साहात पार पडली ...त्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Friday, January 1, 2016

सुरुवात - २०१६ - एक नवीन संकल्प

नमस्कार...!
या वर्षातील  पहिलीच पोस्ट ..! नवीन वर्ष सुरु झालेय ...नवीन संकल्प ...नवीन योजना ..अनेकांच्या मनात असतात ...काही दिवस त्या योजनांवर Action पण होते ..पण नंतर पुन्हा ' येरे माझ्या मागल्या " ...! वर्ष बदलत राहतात ...बदलत राहतील.... पण आपण बदलत नाही तो पर्यंत काहीच शक्य नाही कारण  result बदलायचे असतील तर आपल्याला बदलावेच  लागेल ...आणि जेव्हा आपण स्वत:मध्ये बदल करू ...नवीन वर्षाची...नव्या जन्माची सुरुवात तीच आहे ...! त्यासाठी नवीन वर्ष सुरु होण्याची गरज काय ? प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस ...नवीनच आहे....!
 आश्विनी धोंगडे यांच्या शब्दात ...
" काल नसावा आज ..उद्या नसावा परवा...
दरक्षणी जीवनाला रंग असावा नवा ..!
धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .