Thursday, June 23, 2016

कला संस्कृती सामाजिक संस्था', नागाव उरण

नमस्कार ..!
' कला संस्कृती सामाजिक संस्था', नागाव उरण यांनी आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या 'मार्गदर्शन आणि गुणगौरव' समारंभात 'प्रमुख वक्ता' म्हणून विद्यार्थ्यांशी हितगुज करण्याची संधी मिळाली. माझ्या बरोबर श्री संतोष पवार आणि श्री . महाजन यांनी सुद्धा विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. सौ. शुभांगी पाटील आणि अरुण पाटील यांनी या संस्थेची पूर्ण उभारणी केली आहे. फक्त 'मार्क्स' वर भर न देता विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करण्यावर या संस्थेचा मानस असतो . सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Tuesday, June 21, 2016

"जो पियेगा वो गाडी नही चलायेगा " ..!

नमस्कार ..!
पावसाळा सुरू झालाय...हवेत हळू हळू गारवा पसरणार ...मग तळीरामांना दोन - चार पेग लावायची हुक्की येणार ..आणि गाडी चालवायची हौस सुद्धा ..! सर्वांसाठी एक आग्रहाची विनंती ..' जो पियेगा वो गाडी नहीचलायेगा ' ..! अपघात होण्याचे आणखी एक कारण ...कुठल्याशा पार्टी मध्ये काढलेला हा फोटो share करतोय ...आपण सुद्धा हा संदेश पाळा...आणि इतरांना सुद्धा आठवण करून द्या ..आग्रह धरा .! सुरक्षित राहा ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, June 16, 2016

भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ' याल तर हसाल ' चा कार्यक्रम ..विष्णुदास भावे नाट्यगृह


नमस्कार ..!
भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काल 'याल तर हसाल ' कार्यक्रमाने धमाल उडवून दिली. तुडुंब भरलेल्या ' विष्णुदास भावे' नाट्यगृहात रसिकांनी भरभरून कार्यक्रमाचे कौतुक केले. उद्योगआणि परिवहन राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे पाटील, सन्माननीय खासदारश्री. कपिल पाटील साहेब आणि सन्माननिय आमदार मंदाताई म्हात्रे आणि नवी मुंबईचे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्र घरत आणि सर्व मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम खूपच छान झाला, या सर्व मान्यवरांचे आणि माझ्या रसिकांचे मन पूर्वक धन्यवाद...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Saturday, June 11, 2016

My 'You Tube' Channel completed 75000 Views ...Thanks..!

नमस्कार … !
माझ्या 'You Tube ' channel ने ७५००० Views चा टप्पा ओलांडला आहे. माझ्या रसिक प्रेक्षकांच्या, मित्रमंडळी , हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. 'याल तर हसाल ' च्या विषयी सर्व video चा आनद घेण्यासाठी आपण जरूर या channel ला भेट द्या. त्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/channel/UC1QD8_vXouk66eoPmNWQrFA
आपल सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Tuesday, June 7, 2016

याल तर हसाल : ६०१ वI कार्यक्रम

 
नमस्कार…।
'याल तर हसाल ; च्या ६०१ व्या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित राहिले. माझ्या संपूर्ण टीम चा सत्कार करताना शिवसेनेचे उपनेते श्री. विजय नाहटा. खासदार श्री. राजन विचारे , आणि नवी मुंबई सभागृह मधील विरोधी पक्ष नेते श्री. विजय चौगुले टिपलेला हा क्षण …! सर्वच मान्यवरांनी याल तर हसाल च्या संपूर्ण टीम चे खूप कौतुक केले आणि शुभेच्छा हि दिल्या. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे