Saturday, April 30, 2016

"याल तर हसाल ' चा ५९५ वा कार्यक्रम चिकनी गाव तालुका - मुरुड जंजिरा


काल दि. २९ एप्रिल २०१६ रोजी "याल तर हसाल ' चा ५९५ वा कार्यक्रम चिकनी गाव तालुका - मुरुड जंजिरा येथे संपन्न झाला. राधाकृष्ण मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला . नेहमीप्रमाणेच २:३० तास धम्माल आली …. ! लवकरच ६०० व्या कार्यक्रमाकडे ' याल तर हसाल ' झेपावतोय … आपल्या आशीर्वादाने हे शक्य होतेय …. आपला आशीर्वाद असाच कायम असावा …!
सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, April 25, 2016

याल तर हसाल ' चा ५९३ वा कार्यक्रम हनुमान कोळीवाडा -


नमस्कार …!
दि. २१ एप्रिल २०१६ : ' याल तर हसाल ' चा ५९३ वा कार्यक्रम हनुमान कोळीवाडा या गावात सादर झाला. हनुमान जयंती उत्सवांची १०० वर्षांची उज्वल परंपरा लाभलेल्या या छोट्याशा गावात '  याल तर हसाल ' ला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रचंड मस्ती, हास्यकल्लोळ आणि रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद यामुळे अडीच तास  केव्हा निघून गेले कळलेच नाही … सुंदर आयोजन आणि उत्सवाला गावाची साथ आणि सोबत हसण्याचा उत्सव …!  सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Sunday, April 24, 2016

Back in India - Back in 'Real' Busy-ness

नमस्कार … !
११ एप्रिल ते १८ एप्रिल २०१६ या दरम्यान सिंगापूर आणि मलेशिया ची सफर करून आलो आणि लगेच लागोपाठ चार दिवस 'याल तर हसाल ' चे कार्यक्रम … आणि आजचा दिवस ऑफिस ठीक -ठाक करण्यात घालविला. १५ दिवस फेसबुक आणि व्हाटस -अप  वर नसल्यामुळे चुकल्यासारखे वाटत होते . पण एवढ्या वेगाने घटना घडत होत्या कि सर्वांचे वेळच्या वेळी अपडेट देणे शक्य झाले नाही. आपला सर्वांचा विरह प्रकर्षाने जाणवला . अनेक माझ्या चाहते , मित्रमंडळी , हितचिंतक  या सर्वांनी फोनवरून संपर्क साधून खुशाली विचारली. आणि रोजच एक नवीन पोस्ट टाकून आम्हाला नेहमीप्रमाणे 'पीडत' जा अशी आज्ञावजा विनंतीही केली. मित्रानो, आपले प्रेम असेच कायम असू द्या … !
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 

Monday, April 4, 2016

'वार्तादीप' सन्मान

नमस्कार …!
आणखी एक सन्मान …! 'वार्तादीप' या राजेंद्र घरत संपादित मासिकाचा काल  दशकपूर्ती समारंभ मोठ्या दिमाखात वाशी येथील ' गौरव ज्ञाती'  सभागृहात संपन्न झाला. अत्यंत वैविध्यपूर्ण असलेल्या या कार्यक्रमात सन्मानित होताना अत्यंत आनंद झाला. राजेंद्र घरत यांनी तीन वर्षापूर्वी ' महाराष्ट्र टाइम्स ' मध्ये 'याल तर हसाल ' वर गुढीपाडव्याच्या दिवशी लेख लिहून कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली होती. राजेंद्र घरत यांना ' याल तर हसाल ' टीम तर्फे मन:पूर्वक धन्यवाद …! या सन्मानाचे मानकरी माझी टीम , माझे सर्व हितचिंतक, मित्रमंडळी आणि रसिक प्रेक्षक …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Friday, April 1, 2016

बाईक सफर - थायलंड

नमस्कार … !
खूप वर्षानंतर बाईक चालवायला मिळाली …ते पण पटटाया (थायलंड ) शहरात …! सुट्टीचा आनंद घेताना आणि शिस्तबद्ध वाहनचालकांच्या मध्ये बाईक चालविणे एक वेगळा अनुभव होता. चार दिवसांच्या थायलंड सहलीमध्ये मी हॉर्न ऐकला नाही, रस्त्यावर कुठेही जीवघेणी पुढे जायची स्पर्धा पहिली नाही. express हायवे वर वेडीवाकडी वळणे घेत 'लेन बदलून ' कुणी चालक स्वताला "द बेस्ट" सिद्ध करताना पाहिला नाही. अत्यंत वेगाने जाणाऱ्या गाड्या, परंतु अपघाताची भीती वाटली नाही, गाड्यांच्या मागे "नाद करायचा नाय ….माझी गाडी पळते तर तुझी का जळते … अशी गर्व दाखवणारी वाक्य नव्हती …फ़क्त गाडीचे नम्बर …ते हि मोठ्या अक्षरात …टोल वर भांडणे नाही …ते बुडविण्यासाठी धडपड नाही…. सर्व काही शिस्तबद्ध … एवढ्या लोकांना एकदाच सार्वजनिक शिस्त कशी लावली किंवा लागली याचेच आश्चर्य करत राहिलो … आपलेही लोक तिकडे जाऊन खूप शिस्तीत वागतात …कुठेही कचरा फेकत नाहीत थुंकत नाहीत…. कारण कुणीच तसं वागत नाही म्हणून आपण कसं वागायचं ? याचं बंधन येत ..या उलट आपल्याकडे सर्वच बेशिस्त वागतात, मग मी शिस्त पळून काय करू ? हि विचारसरणी आहे ….चला दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा आपण सुरुवात करू या नीट , सुरक्षित गाडी चालवू या …रस्त्यावर शांत राहू या….नियम पाळू या आणि अपघातग्रस्तांना मदत करू या ….!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .