Friday, April 1, 2016

बाईक सफर - थायलंड

नमस्कार … !
खूप वर्षानंतर बाईक चालवायला मिळाली …ते पण पटटाया (थायलंड ) शहरात …! सुट्टीचा आनंद घेताना आणि शिस्तबद्ध वाहनचालकांच्या मध्ये बाईक चालविणे एक वेगळा अनुभव होता. चार दिवसांच्या थायलंड सहलीमध्ये मी हॉर्न ऐकला नाही, रस्त्यावर कुठेही जीवघेणी पुढे जायची स्पर्धा पहिली नाही. express हायवे वर वेडीवाकडी वळणे घेत 'लेन बदलून ' कुणी चालक स्वताला "द बेस्ट" सिद्ध करताना पाहिला नाही. अत्यंत वेगाने जाणाऱ्या गाड्या, परंतु अपघाताची भीती वाटली नाही, गाड्यांच्या मागे "नाद करायचा नाय ….माझी गाडी पळते तर तुझी का जळते … अशी गर्व दाखवणारी वाक्य नव्हती …फ़क्त गाडीचे नम्बर …ते हि मोठ्या अक्षरात …टोल वर भांडणे नाही …ते बुडविण्यासाठी धडपड नाही…. सर्व काही शिस्तबद्ध … एवढ्या लोकांना एकदाच सार्वजनिक शिस्त कशी लावली किंवा लागली याचेच आश्चर्य करत राहिलो … आपलेही लोक तिकडे जाऊन खूप शिस्तीत वागतात …कुठेही कचरा फेकत नाहीत थुंकत नाहीत…. कारण कुणीच तसं वागत नाही म्हणून आपण कसं वागायचं ? याचं बंधन येत ..या उलट आपल्याकडे सर्वच बेशिस्त वागतात, मग मी शिस्त पळून काय करू ? हि विचारसरणी आहे ….चला दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा आपण सुरुवात करू या नीट , सुरक्षित गाडी चालवू या …रस्त्यावर शांत राहू या….नियम पाळू या आणि अपघातग्रस्तांना मदत करू या ….!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

No comments:

Post a Comment