Monday, August 22, 2016

'संजीवन मार्ग' आणि ' आगरी कोळी युथ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'नेतृत्वगुण विकास शिबीर "

नमस्कार ..!
दिनांक २१ ऑगस्ट २०१६ रोजी आगरी-कोळी युथ फाउंडेशन च्या सेन्ट्रल टीम मेंबर्स साठीचे एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबीर “नेतृत्वगुण विकास, सरावाकडून प्रभावाकडे...” हे कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर येथे यशस्वी रित्या पार पडले.
हास्यप्रबोधनकार आणि आगरी-कोळी समाजाचे सुपुत्र श्री संजीवन म्हात्रे यांच्या “संजीवन मार्ग” ह्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले गेले. सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या ह्या शिबीराची सांगता सायंकाळी ७ वाजता झाली.एकूण चार भागात झालेल्या ह्या शिबिरा मध्ये, पहिल्या भागात नेतृत्वगुणांच्या विविध पैलूंबद्दल माहिती दिली गेली, तर दुसर्या भागात टाईम मॅनेजमेंट बद्दल मार्गदर्शन केले गेले.दुपारी मध्यान्ह भोजना उपरांत सभेत कसे बोलायचे ह्यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन दिले गेले,
एकूण ९ तास सुरु असलेल्या या शिबिरात उपस्थितांचा उत्साह सुरुवातीपासून शेवट पर्यंत तितक्याच जोमाने टिकवून ठेवण्याचे खरे श्रेय जाते ते श्री संजीवन म्हात्रे यांना, तसेच शिबीर आटोपल्यावर खूप काही सोबत घेऊन जात आहोत अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली, फाउंडेशन सोबत जोडल्या गेल्या हिऱ्यांना वेळोवेळी पैलू पाडण्याची जबाबदारी आगरी-कोळी युथ फाउंडेशन आणि संजीवन मार्ग यांनी यावेळी संयुक्तपणे स्वीकारली.
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.
(शब्दांकन - टीम आगरी-कोळी युथ फाउंडेशन )

No comments:

Post a Comment