Tuesday, August 9, 2016

' याल तर हसाल' स्पेशल - ०१

नमस्कार ..!
'याल तर हसाल' ने आतापर्यंत ६१४ प्रयोग पूर्ण केलेत. सुरुवात केल्यापासून या कार्यक्रमाने कधीच मागे वळून पहिले नाही. या कार्यक्रमाने मला काय दिले हे मला शब्दात वर्णन करणे अशक्यआहे ...फक्त एकच सांगेन, या कार्यक्रमामुळे माझ्या जन्माचे ' सार्थक' झाले...!!! अनेक बरे वाईट अनुभव , असंख्य खाचखळगे , अपमानआणि निंदा आणि त्याच्या हजार पटीने मानसन्मान , गौरव, प्रसिद्धी, लोकप्रियता, ( अर्थात थोडा फार पैसा सुद्धा ..! ) मिळवून दिला ...! खरे म्हणजे हा कार्यक्रम नसता तर' संजीवन म्हात्रे " हे नाव सुद्धा नसतं...! आज रसिकांची, आबालवृद्धांची, समाजकारणी आणि राजकारण्यांची सुद्धा पहली पसंती या कार्यक्रमाला मिळते हेआम्हा कलाकारांचे थोरभाग्यच..! रसिक , माझे कलाकार आणि ' याल तर हसाल चेआता पर्यंतचे सर्व प्रयोग , या सर्वांबरोबरचा हा प्रवास खूप मोठा होता.....आणि आहे !
आता 'याल तर हसाल चा वेग वाढतोय...तो हजार प्रयोगाच्या दिशेने झेपावतोय परंतु जरा मागे वळून पाहावेसे वाटले म्हणून काही अनुभव शेअर करणार आहे "याल तर हसाल स्पेशल मध्ये...! गर्दीआणि ' याल तर हसाल हे नेहमीच एक समीकरण राहिलं. सदरचा फोटो गेल्या वर्षीच्या चिरनेरच्या महागणपती समोरच्या कार्यक्रमाचा...चिरनेर गावचे उदंड आशीर्वाद आम्हाला सदैव मिळत असतात ...या रसिकांच्या प्रेमातून उतराई होणे जन्मोजन्मी शक्य नाही...!
आपला सर्वांचा- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

No comments:

Post a Comment