Friday, July 31, 2015

गुरुपौर्णिमा ...!!

नमस्कार ...!
गुरुपौर्णिमा ...आपल्या गुरुंना वंदन करून त्यांच्याविषयी आदर , प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ..!  माझ्या सर्व गुरुंना मी आजच्या दिवशी वंदन करतो, त्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशातच आजपर्यंत मार्गक्रमण करत आहे. .!
गुरु हि संकल्पना आपल्या पौराणिक काळापासून चालत आलेली ..आपल्या हजारो पिढ्यांनी हि संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचविली . काळानुसार गुरु आणि शिष्य दोन्हीही बदलले. आदर आणि समर्पण हि भावना काळानुसार कमी कमी होत गेली. पूर्वी गुरु आणि शिष्यांमध्ये वयाचे खूप अंतर असायचे. त्यामुळे साहजिकच आदर असायचा, ज्ञान मिळविण्याचे एकमेव साधन म्हणजे गुरु असायचा. परंतु आता ...शिक्षक आणि विद्यार्थी यामधील अंतर खूप कमी आहे. त्यामुळे शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मित्रच बनू लागले. आणि त्यामुळे शिक्षक आणि शिष्य यामधील आदर कमी होऊ लागला.
                        पूर्वी गुरूबद्दल आदरयुक्त भीती असायची, आता मात्र भीतीयुक्त आदर शुल्लक राहिला आहे. सर्व शिक्षकांचे म्हणणे आहे कि आता मुलांना आमच्या बद्दल प्रेम ,आदर , जिव्हाळा वाटत नाही ...तसेच आजची पिढी सुद्धा पूर्वी सारखे गुरु शिक्षक आता राहिले नाहीत असेच म्हणते. दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत . टाळी एका हाताने थोडीच वाजते ...?
                      पण आज पुन्हा एकदा चांगल्या गुरूंची खूप गरज आहे. चांगली पिढी चांगले गुरूच घडवू शकतात. त्यासाठी आताच्या पिढीने पहिल्यांदा चांगले शिष्य होण्याची गरज आहे. चांगला शिष्यच पुढे चांगला गुरु होऊ शकतो. जो चांगला शिष्य नाही तो चांगला गुरु कसा होऊ शकेल..?
                   गुरु या शब्दाबद्दल सर्वाना आदर आहे. पण मग गुरु ची संकल्पना आपल्या मनात पूर्वी पासून अशी आहे ...दाढी वाढलेले, वयस्कर, सर्वस्वाचा त्याग केलेले , अशी व्यक्ती समोर येते ...असे दिसणारे गुरु आता नाहीत , पण खूप ज्ञान असणारे , अनेक नवनवीन क्षेत्रात पारंगत , EXPERTS अशी अनेक माणसे सामाजात आहेत. आताच्या काळातील सर्व विद्या त्यांना अवगत आहेत . तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे आहे त्या क्षेत्रातील निष्णात व्यक्ती तुमचा गुरु होऊ शकते. आधुनिक भाषेत त्यांना " MENTOR" म्हणू शकतो आपण . असो.
               आयुष्याला दिशा , योग्य मार्ग आणि अनुकूल गती प्रदान करणाऱ्या माणसाला मी गुरु मानतो. आणि एक गुरु असण्यापेक्षा अनेक गुरु असावेत. प्रत्येक कडून जे चांगला असेल ते घ्याव. " ग्रंथ हे आपले गुरु असे आपण मानतो' हे सत्यच आहे. आई वडील हे सुद्धा आपले प्रथम गुरूच असतात . आणि ज्या लोकांकडून आयुष्यात जे जे आपण शिकतो, ते सर्वच आपले गुरु असतात .
                 गुरु असल्याने आपला अहंकार नाहीसा होतो, माझ्या पेक्षा यांना जास्त माहिती आहे, मी यांच्याकडून शिकलो हे मान्य केलं कि अहंकार कसा राहील ? गुरूंची महिमा अगाध आहे. आपल्या सर्वाना आयुष्यात असेक अनेक योग्य, ज्ञानी,
गुरु मिळावेत आणि आपले आयुष्य समृद्ध व्हावे अशी मी आज परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
                                                                   हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

24 comments:

  1. खूप छान लिहिले आहे सर

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Agadi barobar ahe sir.. Happy Guru Purnima.. Tumchya sarakhe guru nashibanech bhetatat.

    ReplyDelete
  4. छान लिहिलंय दादा

    ReplyDelete
  5. गुरू साक्षात उभा केलात. खरी परिस्थिती दाखवलीत साहेब.....

    ReplyDelete
  6. अप्रतिम... 👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  7. खरं आहे ..आजकाल गुरू आणि शिष्य यांतील अंतर कमी होत चालले असून गुरू-शिष्य मित्र बनत आहेत !!! छान लेख सर ..👌👌👍

    ReplyDelete
  8. सुंदर लेख 👌

    ReplyDelete
  9. सुंदर,झणझणीत अंजन घातले आहे,गुरू आणि शिष्य याचा खरा अर्थ नव्या पिढीला कळेल हीच अपेक्षा. असेच सुंदर लिखाण अपेक्षित आहे.

    ReplyDelete
  10. खूप सुंदर सर 👌
    नमन असले नेहमीच 🙏

    ReplyDelete
  11. फार छान मार्गदर्शन सर 🙏🏻👌🏼

    ReplyDelete
  12. खूप छान मार्गदर्शन सर

    ReplyDelete
  13. फारच छान विचार

    ReplyDelete
  14. 'चांगली पिढी एक गुरूच घडवू शकतात. काळानुरूप गुरू शिष्याची संकल्पना बदलतेय'. खुप छान लिहिलंय सर.

    ReplyDelete