Friday, December 25, 2015

चार्ली ...तू हवा होतास ..!!.चार्ली चाप्लिन च्या पुण्यतिथी च्या निमित्ताने ..

" Any fool can play a tragedy, but comedy is damn serious business" कुणीतरी म्हटलेलं वाक्य सहज वाचनात आलं आणि पटलं सुद्धा ...! लोकांना सास्वीने हे काय सोप्पं काम नाही .. आणि एक शतकापूर्वी हे काम एक अवलिया अगदी सहज करून गेला. आजही त्याच फक्त चेहरा आठवला कि मूर्तिमंत हास्य आणि त्यामागे अलगद लपलेलं कारुण्य याची मूर्तिमंत छबी डोळ्यासमोर उभी राहते ..!
         चार्ली चाप्लिन... ! या एका सध्या दिसणाऱ्या माणसाने संपूर्ण जगाला पोट दिखेपर्यंत हसवलं ...आणि हसस्त हसता रडायलाही शिकवलं ..! साधाभोळा . निरागस , बावळट तरीही हवा हवासा वाटणारा , कमालीचा बोलका चेहरा , प्रचंड चपळ देहबोली वापरणारा आणि आपल्या  उत्कृष्ट अभिनयाने अंत:करणात सहज प्रवेश करणारा एक अवलिया कलाकार ..! संपूर्ण जगतावर हास्याचे अधिराज्य प्रस्थापित करणारा एक महान चित्रपट, निर्माता , दिग्दर्शक , लेखक आणि कलाकार ..म्हणजेच शंभर वर्षानंतर सुद्धा अबालवृद्धांचा लाडका अभिनेता ...चार्ली चाप्लिन ..! अत्यंत कमी साधन सामग्री , आताच्या तुलनेत खूप कमी विकसित असलेले चित्रपट तंत्रज्ञान आणि असे असताना सुद्धा  त्याने ज्या अजरामर चित्रपट कलाकृती संपूर्ण जगाला दिल्या ...तो चित्रपट सृष्टीचा अनमोल ठेवा आहे ...!
               कोणत्याही अभिव्यक्ती साठी हास्य रासास्ची निवड करणे काही सोपी गोष्ट नाही. तारेवरची कसरत असते ती ...विनोद थोदासास जरी चाकोरीबाहेर गेला ..तर तो वात्रटपणा , चावटपणा, आगाउपणा , गावंढळपणा , मूर्खपणा अशी अनेक बिरूद त्याला सहज चिकटतात आणि त्यामधून काही सामाजिक संदेश देणे तर ते त्याहूनही कठीण..! परंतु हे आव्हान त्याने सहज पेलले. सर्व जगतातातील लहानथोरांना मग ते कोणत्याही देशातील असो , जाती धर्मातील असो , कोणत्याही वयोगटातील असो सर्वाना आपल्या अभिनयाने निखळ आनंद वाटणारा आणि सर्वाना पटणारा एक 'univarsal' विनोद निर्माण करणारा अनभिषिक्त सम्राट चार्ली ..! एका शतकानंतर सुद्धा संपूर्ण जागतिक चित्रपट सृष्टीला ज्याचा विसर पडत नाही ..यातच सर्व काही आले...!
              चार्ली म्झान्जे जगातील सर्व हास्य्कालाकारांसाठीच नव्हे तर चित्रपट इर्मता ,दिग्दर्शक , आणि कलाकारांसाठी सुद्धा एक जागतिक महाविद्यालय ..! १९१४ ते १९६७ या कालावधीत तो संपूर्ण जगातील चित्रपटसृष्टीचा एक 'Cinematic IDOL' होता. १९१० ते १९२० या दशकामध्ये तर त्याला " The most famous personality on this PLANET " म्हणून त्याच्याकडे त्यावेळी  पहिले जात होते. ज्यावेळी 'ऑस्कर ' सुरु झाले नव्हते त्यावेळी लेखन , दिग्दर्शन, निर्माता आणि कलाकार म्हणू सर्व ' Academy Awards' एकाच वेळी जिंकणारा जगातील तो एकमेव कलाकार आहे . आपल्या सास्म्पूर्ण कारकिर्दीत ८० च्या वर चित्रपट देणारा हा महान अवलिया संपूर्ण जगासाठी एक विनोदाचा अनमोल खजाना ठेवून गेला आहे .
               आज संपूर्ण जग दहशतवादाने ग्रासले आहे. धर्मांधता, देशांचे सीमावाद , त्यामधून होणारी युद्धे , स्थलांतर करणारे लोक आणि त्यावरील अत्याचार, मध्येच अनेक देशात उद्भवणारी यादवी युद्धे , प्रचंड भ्रष्टाचार, बलात्कार , खून , मारामाऱ्या , हत्याकांडे . या बरोबरच यांत्रीकतेमुळे हरवलेली मानवता , तुटणारी कुटुंबव्यवस्था ,ऱ्हास होणारा जगभरातील निसर्ग ,कोसळणारी समाजव्यवस्था , या मुळे संपूर्ण जग प्रचंड तणावाखाली जगत आहे. 'जिवन' सर्व बाजूनी चिणले जात आहे. हजारो माणसे प्रचंड यंत्रांमुळे चीर्दाली जात आहेत, अपघात, अतिरेक्यांचे हल्ले, बॉम्बस्फोट , घातपात, दंगली , भावनिक संघर्ष यामुळे जीवन प्रचंड अस्थिर झाले आहे. ' शाश्वत ' असे काही उरले नाही. 
             या संपूर्ण जगाला दुख:च्या मरणप्राय वेढ्यातून सोडवायचे असेल , त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचे असेल , हे दु:ख त्यांना विसारायचे असेल तर अशा अवलिअयचि गरज प्रकर्षाने जाणवते. ' मनाचिया घावावर ..मनाची फुंकर ' घालणारे कलाकार हवे आहेत. ' संवेदनशीलता ' जपणारे आणि संपूर्ण विश्वाला पुन्हा एकदा निरागस हसविणारे कलाकारांची हि दुनिया वाट पाहत आहे....आणि अशावेळी सहजच वाटून जातं...आज चार्ली असायला हवा होता ...!
              आज त्याच्या भिव्याक्तीला लाखो पंख फुटले असते ...आपल्या मूक अभिनयाने, शंभर वर्षापूर्वी त्याने ज्या अजरामर कलाकृती दिल्या ...आज अत्यंत प्रगत तंत्रज्ञान, धुळीचा कान सुद्धा टिपणारे प्रगत कॅमेरा तंत्रज्ञान , सर्वच क्षेत्रात होणारी तांत्रिक प्रगती यामुळे त्याच्या कल्पनाशक्तीला एक वेगळीच धार आली असती, त्याची लेखणी जगातील सर्व अन्याय , अत्याचारावर तर्ल्वारीसारखी चालली असती,, त्याचा चेहरा जगातील सर्वसामन्यांच्या संवेदना सहज अभिव्यक्त करू शकला असता, आपल्या चित्रपटांनी आजही तो सर्व प्रश्नांना, दु:खान , संकटाना वाचा फोडणारा एक क्रांतिकारक ठरला असता...!
              भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची , ढोंगी  बुवा बाबांची , धर्माच्या ठेकेदारांची , बहिरे झालेल्या राजकारण्यांची आपल्या अभिव्यक्तीने त्याने भंबेरी उडवून दिली असती . धर्म, राजकारण, दहशतवाद , गुंडगिरी, भ्रष्टाचार , यांचे संपूर्णपणे निर्दालन करून देशभक्ती , प्रेम, संस्कृती, सद्भाव निर्माण करणारा एक सर्व्सास्न्मान्य नायक त्याने जन्माला घातला असता, आणि हे करताना लोकांना मनमुराद हसवायला तो अजिबात विसरला नसता ...त्याला हे अचूक ठाऊक होतं...कि हास्याने जनतेच्या मनाची कवाडे उघडतात आणि त्या उघडलेल्या मनामध्ये हे सद्गुणाची पेरणी सहज होऊ शकते.चार्ली ...तू आम्हा सर्व विनोद्विरांचा आद्यपुरुष आहेस ...तुझ्याकडून प्रेरणा घेऊन, तुझी 'स्टाईल'  जगभर कोणी करून अनेकांनी आपली कारकीर्द घडविली. परंतु ते तारे होते ...या ताऱ्याना प्रकाश देणारा तू सूर्य आहेस ....या सर्वांचा तू अनभिषिक्त स्साम्रात आहेस ...आणि या दुनियेला हास्याची प्रेरणा देणारा ' परमेश्वरच दूत' आहेस ...पुन्हा या दुनियेत आलास चार्ली.......तर हि दुनीयाने आनंदाने वेडी होऊन जाईल....हे शक्य नाही ...म्हणू तुझी पुन्हा पुन्हा आठवण...!

- हास्यप्रबोधनकार  संजीवन म्हात्रे .

No comments:

Post a Comment