Tuesday, June 13, 2017

नवीन काही तरी ...नवीन गझल - हल्ली ...!

आजकाल कुणीही कवींचा 'ग्रेस' होतो हल्ली
पुरे 'एक' च कविता, तोच 'बेस' होतो हल्ली ...!

ज्यांना कधी कुठे ना, दिसतो समाज हल्ली ..
त्यांचा कुठे कुठे हि समावेश आज हल्ली ...!

वाळू कधी न त्यांच्या पायांमध्ये ना सळली ..
उंटावरून त्यांचे हाकणे बरेच हल्ली ...!

वरवरून आता त्यांचे होतील हि इशारे
त्यांचीच सारी 'पत्रे', त्यांचीच सर्व गल्ली ...!

आमुच्या मुशाफिरीने त्यांची बरीच जळते ..
आम्ही जाणतो " अपना हाथ जगन्नाथ ' हल्ली ...!

- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Tuesday, June 6, 2017

दि. ५ जून २०१७ - पर्यावरण दिन ..!

नमस्कार ..!
दि. ५ जून २०१७ -
आज पर्यावरण दिन ..! छायाचित्रणाचा छद सुरु करताना पहिला फोटो मला निसर्गाचाच काढावासा वाटला ...! मोबईल हातात होता ...सहज लक्ष वर गेलं ..झाडावर फुललेली फुलं जणू काही 'आमचं छायाचित्र काढा " म्हणून आमंत्रण देत होती ..!
आज पर्यावरणावर बरीच चर्चा होईल, काही चांगले कार्यक्रम होतील, उपक्रम राबविले जातील...परंतु हे फक्त एक दिवस न करता 'पर्यावरण संवर्धन " हा आपल्या जीवन शैलीचा एक भाग बनेल तेव्हा खरच असे वाटेल कि ' पर्यावरण' हा विषय आपल्याला समजायला लागलाय ...!
फार कठीण नाही हे समजण.! आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. निसर्गाला हिंदीत 'प्रकृती ' म्हणतात. आपण कुणाला बरं नसेल तर त्याची 'प्रकृती'ठीक नाही असे म्हणतो ,,...निसर्गाला इंग्लिश मध्ये 'Nature' म्हणतात ...एखादा माणूस ठीक वागत नसेल तर आपण त्याच' NATURE' ठीक नाही असे म्हणतो.
तात्पर्य ; निसर्ग म्हणजेच आपण आणि आपण म्हणजच निसर्ग ..! कुठेतरी वाचल होतं " GOD always comes through Nature to meet us'. ! फुले, फळे , झाडे, वेली, वृक्ष , डोंगर, दऱ्या, नदी, नाले, झरे... करोडो सूक्ष्म ते महाविशाल चमत्कार हा निसर्ग रोज करत असतो. " गोवर्धन पर्वत उचलणारे श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी आपल्याला काय संदेश देतात ? हा संदेश पुन:निर्मित करण्याची गरज आहे ...! कुठेतरी छानशी कविता वाचली होती ...
मिट्टी भी हसती ही कभी ,
ये सोचकर हसता था मै पहले ...
फुलो का परिवार देखकर ..
अब विश्वास हुआ है मुझको ...!
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे
sanjeevanmhatre.blogspot.in
#chaprak
# yal tar hasal
#thoda manatal, thoda janatala

Friday, May 12, 2017

माणसे आणि झाडे


                  परमेश्वराने माणसे आणि झाडे वेली निर्माण केली ..! दोन्हीही सजीव ..! प्रत्यक्षात परमेश्वराने प्राणी , पक्षी आणि वृक्ष, वेली निर्माण केली असावेत किंवा निर्माण झाले असावेत ( परमेश्वर आहे किंवा नाही या विषयात मी जात नाही ). माणूस हा पूर्वी प्राणी या प्रकारातच मोडत होता. वेगवेगळ्या आकाराची झाडं निर्माण केली परमेश्वराने, वेगवेगळ्या आकारांची, वेगवेगळ्या उंचीची, पानांच्या वेगवेगळ्या प्रकाराची, खोडाच्या वेगवेगळ्या प्रकाराची, वेगवेगळ्या मातीत , पाण्यात , हवामानात रुजणारी , करोडो प्रकारची फुलं देणारी, फळ देणारी , जमिनीवर वाढणारी , जमिनीखाली वाढणारी , वेली म्हणजे आधार घेऊन वाढणारी , दुसऱ्या झाडाला शोषून वाढणारी परजीवी ...लाखो प्रकारची झाडे आपल्याला माहित आहेत ....!
           याचं प्रकारची माणसे सुद्धा आहेत ...तशिच ...करोडो प्रकारची माणसे ...वेगवेगळ्या रंगांची , उंचीची , वेगवेगळ्या गुणांची , अवगुणांची , काळी , गोरी, सावळी, लाल, निमगोरी , हजारो वर्णांची ...! एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही ...जेवढे झाडांचे प्रकार असतील तेवढ्या पेक्षा जास्त माणसांचे प्रकार असतील ...त्त्यात झाडांना धर्म नसतो ..जात नसते ...इथे माणसांनी धर्म , जाती, पोटजाती एवढ्या निर्माण केल्यात कि त्यांची गणती करवत नाही ...! प्रत्येक धर्माने , जातीने, पोटजातीने आपापला एक देव निर्माण केला आणि त्यांना नावही देऊन टाकली आणि मग आशा या रंगीबिरंगी दुनियेत आपला जन्म झाला. या वैविध्यपूर्ण दुनियेत माणसाने आनंदी , सुखी , मस्त जीवन जगणे साहजिकच अपेक्षित होते ...पण सगळा घोटाळा झाला .....
            झाडांमध्ये आणि माणसांमध्ये मुलभूत फरक आहे. झाडे जन्मापासून मृत्युपर्यंत एका जागी राहतात , कुठेही जात नाहीत , येत नाहीत , बोलत नाहीत, चालत नाहीत ....! आपल्या जवळ आलेल्या माणसाला , प्राण्याला सावली देणं , फळ देणं , फुलं देणं हे काम इमाने इतबारे करतात झाडं ...! कोणतीही स्तुतीची अपेक्षा नाही , सन्मानाची इच्छा नाही , पैसा साठवून ठेवायचा नाही , घर बांधायची नाही , इस्टेट कमवायची नाही , पोरांना मोठं करायचं नाही ....मस्त सुखी असावीत हि झाडे ....!!!
             माणसांचा इथेच मोठा प्रोब्लेम झाला....माणसे दुसऱ्यांच्या आयुष्यात दखल द्यायला लागली ...नाही स्वतः जगण्यासाठी त्यांना ती द्यावी लागली ...त्यामुळे माणसा-माणसांमध्ये तुलना सुरु झाली ...तुलनेमुळे स्पर्धा वाढली ....स्पर्धेमुळे धावपळ , दगदग , पळापळ सुरु झाली ..पूर्वीच्या काळात राज्य बळकावण्यासाठी युद्धे सुरु झाली ....माणसांच्या कत्तली झाल्या ...जीवघेण्या स्पर्धेसाठी ..अत्याधुनिक हत्यारे निर्माण झाली ...वेळ वाचविण्यासाठी वेगवान वाहने तयार झाली ....! आणि त्यानंतर माणसे पैसा कमविण्याच्या आणि साठविण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत उतरली ...! विज्ञान युगात  भौतिक  सुखाच्या मागे धावताना त्यांना कसलीच परवा राहिली नाही ..! दुसऱ्याला कसं खाली खेचता येईल याचं विचाराने माणसे जगायला लागली ...स्वत: आनंद घेण्याचं सोडुन दुसऱ्याला कसं दु;ख देता येईल यातच मग्न झाली ...गुलझार यांनी खूप सुंदर लिहिलं आहे ....
\                   जिंदगी जाया कर दी.....
                         दुसरो के जिंदगी में झाकते झांकते....
                                  खुद के जिंदगी को तराशा होता
                                          तो फरिश्ते बन जाते ...!!!
अजूनही वेळ नाही गेलेली ...'सावर रे ' असाच म्हणावं लागेल ...थोडं थांबा ...विचार करा ...आयुष्य खूप छोटं आहे ...प्रत्येक क्षण स्वतः:चा आणि इतरांचा सुखाचा करा ....सर्वानाच हे माहिती आहे ...नवीन काही नाही ...तरीपण सांगण्याचा फुटकळ प्रयत्न केल्याशिवाय राहवलं नाही ...कारण आयुष्य तुमचं...विचार तुमचे ...आचरण तुमचं ...आणि हो ...त्यातून येणारे परिणाम पण तुमचेच ....कुठल्यातरी कवीने म्हटलं आहे ...
                                 हर एक लम्हें से ..
                                      खुशिया निचोड लो यारो ...
                                                घडी जो बीत गयी.....
                                                           लौटकर नाही आती .....!!!
                                                                                                - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 

Saturday, April 29, 2017

मुकद्दर का सिकंदर ..!


२७ एप्रिल हा दिवस नकोसा वाटला ...कारण विनोद खन्ना ने EXIT घेतली होती. माझ्या लहानपणी 'Black & White' दूरदर्शन वर 'इन्कार' पहिला ..आणि तेव्हा पासून माझ्या मनावर विनोद खन्नाच अधिराज्य सुरु झालं. त्या चित्रपटातील पळवून नेलेल्या लहान मुलाला शोधून आणणारा इन्स्पेक्टर 'विनोद खन्ना' मला देवदूत वाटला. "सॉलिड HANDSOME ' कसं दिसावं तर ते 'विनोद खन्ना' सारखं..! रोमांटिक राजेश खन्ना , अंग्री यंग मन अमिथाभ बच्चन , हि मन धर्मेंद्र या समकालीन हिरोंमध्ये 'सॉलिड मर्दानी हिरो ' म्हणून विनोद खन्ना चा एक जमाना होता. 'मर्दानी मार्दव ' काय असतं ते फक्त विनोद खन्ना ला तारुण्यात पाहिल्यावर कळत..! कुठल्याही तरुण मुलाने  स्वप्नात स्वताला 'असं दिसावं '  असा विनोद खन्ना त्यावेळी दिसायचा ....!
                 पण काळ आपली खेळी खेळत असतो ...कोणताही कलाकार त्याच्या उतारवयात बघताना मनाला खूप त्रास होतो , वेदना होतात, कारण त्यांची जबरदस्त 'छबी' आपल्या मानावर कोरलेली असते. प्रचंड धक्का जाणवतो अशा वेळी...आणि तो कलाकार करोडोंच्या मनावर अधिराज्य गाजविणारा असेल तर त्याची तीव्रता अधिकच जाणवते ..! 'मन का मित ' मधून 'खलनायक' म्हणून आलेला विनोद खन्ना बॉलीवूड वर अधिराज्य गाजविणारा 'नायक' ठरला. अमिताभ बरोबर तर त्याची अदाकारी सॉलिड रंगायची ..हेराफेरी , खून पसीना , मुकद्दर का सिकंदर ..परवरीश आणि अमर अकबर अन्थनि यामध्ये या दोघांनी धमाल केली . फिरोज खान बरोबर 'कुर्बानी' आणि ;दयावान' सारखे हिट देताना दोघांची मैत्री पण विशेष गाजली ...एवढच नव्हे तर दोघांच्या म्र्त्युची तारीख आणि कारण सुद्धा योगायोगाने एकच होतं...!
                  हे सर्व लिहायचं कारण ..विनोद ..तू एक कलाकार होतास ...आपल्या अभिनय कलेचा बेताज बादशाह ..! वार्धक्यामुळे झुकलेले कलाकार पाहताना मन हेलावून जातं पण कन्सर शी झुंज देताना तुझा फोटो पहिला आणि डोळ्यात पाणी तरळलं..कलाकार कला सादर करताना अनभिषिक्त समराट वाटतात ....पण वार्धक्य आणि जर्जर रोगांशी  झुंजताना आम्हाला त्यांना पाहवत नाही ..आपण कलाकार सुद्धा माणूस आहोत हेच खरं...!
              लिहिल्याशिवाय राहवलं नाही तुझ्याबद्दल ....! तुझं आयुष्य तू खऱ्या अर्थाने जगलास ...ऐन कारकीर्दीच्या शिखरावर असताना 'ओशो ' कडे जाण्याचा तुझा निर्णय ...राजकारणात पदार्पण करून तीन वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम , बॉलीवूड मध्ये पुनरागमन करून आपल् अभिनय कौशल्य  साऱ्या जगाला सादर करणं....हे सर्व निर्णय खूप कठीण होते ...परंतु तुझ्या निर्णयावर तू जगलास ...आयुष्यात अनेक वादळ पचवून खरा 'हिरो ' ठरलास ..! आणि तरीही कोणत्याही 'वादग्रस्त' गोष्टीत न अडकता सर्वांचा लाडका 'विनोद खन्ना' झालास ..!
               आम्हाला माहीत होतं आम्हाला आवडणारा तरुण विनोद खन्ना दिसणार नव्हता ...परंतु अभिनयावर प्रेम करणारा कसदार कालावंत तुझ्या रूपाने जिवंत होता हे आमचा भाग्यच होतं...! आज तू नाहीस ...परंतु पडद्यावर आमच्यासाठी एक आनंदाची मेजवानी तू ठेवून निघून गेलायस...आणि हो , तुझ्या रूपाने कलाकारांना शिकण्यासाठी आणि आयुष्य परिपूर्ण कसं जगावं हे दाखवून ...तू EXIT घेतलीस ....तुझ्याच चित्रपटातून आम्ही शिकलो ....जिंदगी तो बेवफा है...   एक दिन ठुकरायेगी
                 मौत मेहबूबा ही अपने  साथ लेकर जायेगी ...
                 मर के जिने कि अदा को ,दुनिया को दिखालायेगा
                 वो 'मुकद्दर का सिकंदर' जानेमन कहलायेगा ...!

                                                  सुप्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...!
                                                              - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.
                 

Monday, April 3, 2017

"सेल्फ असेसमेंट"

नमस्कार ...!
"सेल्फ असेसमेंट" साठी जरा एक आठवडा जरा फेसबुक आणि Whatsup पासून दूर राहिलो. अनेक घडामोडी  माझ्या चाहत्यांना, रसिकांना आणि मित्रमंडळी ना सांगण्यासारख्या घडत होत्या ...'याल तर हसाल " चे कार्यक्रम , गुडीपाडवा वैगेरे अनेक गोष्टी ...! ३१ मार्च ला आपण सर्वजण ' आर्थिक असेसमेंट" करतो आणि त्यावर कर भरतो ...आणि हे सर्वाना कायद्याने करावेच लागते ...पण मनात एक विचार आला..कि कित्येक वर्ष आपण आपल्या  भावनांची, शरीराची , मनाची आत्म्याची आणि हो ..अर्थात आपल्या जीवनाची असेसमेंट केली आहे का ? याचं सर्वांचं उत्तर नाही च मिळेल ...माझ्याही मनात हा विचार आल्यानंतर मी शहारलो ...कारण  ...असा विचारच केला नाही ..किंवा असे करण्यासाठी वेळ च मिळाला नाही ..( कुणालाच वेळ नसतो आजकाल, आणि कशासाठीही वेळ  नसतो ...वेळ कुठे जातो हे सुद्धा न उमगणार कोडचं आहे ...) असो ..जीवन कोणत्या मार्गाने धावतंय ...स्पीड काय ? दिशा काय ? आणि हो धावण्याचं कारण काय ? काही माहिती नाही ...पळत सुटलोय ...तो पळतोय म्हणून मी हि ..त्याने स्पीड वाढवला ...मग मी हि वाढवणार ....जबरदस्त वेग ....2G , 3G,4G....रस्ते , हायवे , एक्स्प्रेस हायवे ..मोनो , मेट्रो ,बुलेट ट्रेन्स , .1000CC, 2000 CC, 3000CC ....अजून गाड्यांचे इंजिन मोठे होताहेत ...आणि हो या सर्व वेगात ..सर्वात वेगात धावतोय वेळ ! ...तो आपल्या पुढे पळतोय ...त्याला काबूत ठेवण्यासाठी ही स्पर्धा सुरु झालीय ...आणि या जीवघेण्या स्पर्धेत ...जगायचं विसरलोय आपण ..! निसर्गाची देणगी विसरलोय ...सुंदर आकाश , मस्त चांदण्या , शीतल चंद्र ..विशाल सागर , झाडे वेली ,वनराई .. पक्षांची किलबिल , गाई गुरे ,  ...हिरावून गेलंय सर्व ..! कितीतरी सुखं अजूनही आहेत या दुनियेत जी पैसे न मोजता सुद्धा घेता येतात , अनुभवता येतात ...! ( हजारो माणसे असतील कि दिवसभरात एकदाही आकाशात पाहत नसतील  ...त्याचं सौंदर्य नाहाळत नसतील ...आपणही कधी चांदण्याकडे पाहिलंय आठवा जरा ...! ) विषय एवढाच ...जीवनाच्या धकाधकीत ..जरा थांबा ...असेसमेंट करत राहा... वेळोवेळी ...आणि काहीतरी नवीन करत राहा ...आनंदी रहा आणि खऱ्या अर्थाने  समृद्ध व्हा  ..!
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, February 9, 2017

अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोली भाषेतील कथाकथन मध्ये- संजीवन म्हात्रे ( आगरी भाषा )

नमस्कार ..!
अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोली भाषेतील कथाकथन मध्ये ..प्रथमच आगरी भाषेचा समवेश होता ..आणि आगरी भाषेतून कथा सांगण्यासाठी आयोजकांनी माझी निवड केली होती ..महाराष्ट्रातून आलेल्या मान्यवर कथाकारांच्या पंक्तीत बसने हे सौभाग्यच ...आणि माझा श्वास असलेली आगरी भाषा संपूर्ण महाराष्ट्राला ऐकवणं हे तर परमभाग्यचं...! बाबा पारिट (कोल्हापुरी), प्रसाद कांबळी ( मालवणी) विलास सिंदागीकर ( मांगी), राम निकम ( मराठवाडी ), डॉ. सुमिता कोन्द्बात्तुनावर ( झाडी बोली ) सुनील गायकवाड ( अहिराणी ) आणि संजीवन म्हात्रे ( आगरी ) ...! साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नाव असणं हे देखील खूप प्रतिष्ठेच मानलं जातं...माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला हा सन्मान दिला ..त्याबद्दल आयोजकांचे आभार ..! आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांचे विशेष आभार .. ! 'पैशाचा पाऊस' या माझ्या कथेने उपस्थित रसिकांची वाहव्वा तर मिळवलीच ,,..परंतु आगरी भाषेची गोडी , लहजा, सुद्धा मान्यवरांना अनुभवायला मिळाला ...! सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Monday, February 6, 2017

९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन - 'आगरी कलादर्शन' कार्यक्रमात' याल तर हसाल '

९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ...महाराष्ट्रातील दिग्गज कवी, लेखक, विचारवंत, समीक्षक, गझलकार , साहित्यिक , साहित्यप्रेमी अशा सर्व सारस्वतांचा हा मेळावा ...या सर्व दिग्गजांसमोर 'आगरी कलादर्शन' कार्यक्रमात' याल तर हसाल ' चा काही भाग सादर करण्याची संधी मिळाली. आगरी समाजातील अनेक दिग्गज कलाकार यामध्ये एकवटले होते ..या सर्वांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्राला आगरी भाषा, संस्कृती , लोकगीते , नृत्य , आणि परंपरा याचे जबरदस्त प्रात्यक्षिक घडविले. लोकगीतांचे आणि कोलीगीतांचे बादशाह नंदेश उमप, जगदीश पाटील , संतोष चौधरी ( दादुस ), किसान फुलोरे , शिवशाहीर वैभव घरत ..आगरी झेंडा दिल्लीत नेणारी रुद्राक्ष डान्स अकॅडेमी आणि इतर अनेक कलावंत याबरोबर "याल तर हसाल " च्या सर्व कलाकार आणि मलाही संधी मिळाली याबद्दल आम्ही सर्व कलाकार स्वतःला खूप भाग्यवान समजतो. या कार्यक्रमासाठी श्री अरुण म्हात्रे आणि मयुरेश कोटकर आणि त्यांचे सहकारी ,या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. शिवाय हा कार्यक्रम संमेलनाच्या मुख्य रंगमंचावर ठेवण्यात आलं होता यासाठी स्वागताध्यक्ष आणि आगरी युथ फोरम चे अध्यक्ष श्री . गुलाब वझे आणि आयोजनातील सर्व सहकारी यांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .