Saturday, April 29, 2017

मुकद्दर का सिकंदर ..!


२७ एप्रिल हा दिवस नकोसा वाटला ...कारण विनोद खन्ना ने EXIT घेतली होती. माझ्या लहानपणी 'Black & White' दूरदर्शन वर 'इन्कार' पहिला ..आणि तेव्हा पासून माझ्या मनावर विनोद खन्नाच अधिराज्य सुरु झालं. त्या चित्रपटातील पळवून नेलेल्या लहान मुलाला शोधून आणणारा इन्स्पेक्टर 'विनोद खन्ना' मला देवदूत वाटला. "सॉलिड HANDSOME ' कसं दिसावं तर ते 'विनोद खन्ना' सारखं..! रोमांटिक राजेश खन्ना , अंग्री यंग मन अमिथाभ बच्चन , हि मन धर्मेंद्र या समकालीन हिरोंमध्ये 'सॉलिड मर्दानी हिरो ' म्हणून विनोद खन्ना चा एक जमाना होता. 'मर्दानी मार्दव ' काय असतं ते फक्त विनोद खन्ना ला तारुण्यात पाहिल्यावर कळत..! कुठल्याही तरुण मुलाने  स्वप्नात स्वताला 'असं दिसावं '  असा विनोद खन्ना त्यावेळी दिसायचा ....!
                 पण काळ आपली खेळी खेळत असतो ...कोणताही कलाकार त्याच्या उतारवयात बघताना मनाला खूप त्रास होतो , वेदना होतात, कारण त्यांची जबरदस्त 'छबी' आपल्या मानावर कोरलेली असते. प्रचंड धक्का जाणवतो अशा वेळी...आणि तो कलाकार करोडोंच्या मनावर अधिराज्य गाजविणारा असेल तर त्याची तीव्रता अधिकच जाणवते ..! 'मन का मित ' मधून 'खलनायक' म्हणून आलेला विनोद खन्ना बॉलीवूड वर अधिराज्य गाजविणारा 'नायक' ठरला. अमिताभ बरोबर तर त्याची अदाकारी सॉलिड रंगायची ..हेराफेरी , खून पसीना , मुकद्दर का सिकंदर ..परवरीश आणि अमर अकबर अन्थनि यामध्ये या दोघांनी धमाल केली . फिरोज खान बरोबर 'कुर्बानी' आणि ;दयावान' सारखे हिट देताना दोघांची मैत्री पण विशेष गाजली ...एवढच नव्हे तर दोघांच्या म्र्त्युची तारीख आणि कारण सुद्धा योगायोगाने एकच होतं...!
                  हे सर्व लिहायचं कारण ..विनोद ..तू एक कलाकार होतास ...आपल्या अभिनय कलेचा बेताज बादशाह ..! वार्धक्यामुळे झुकलेले कलाकार पाहताना मन हेलावून जातं पण कन्सर शी झुंज देताना तुझा फोटो पहिला आणि डोळ्यात पाणी तरळलं..कलाकार कला सादर करताना अनभिषिक्त समराट वाटतात ....पण वार्धक्य आणि जर्जर रोगांशी  झुंजताना आम्हाला त्यांना पाहवत नाही ..आपण कलाकार सुद्धा माणूस आहोत हेच खरं...!
              लिहिल्याशिवाय राहवलं नाही तुझ्याबद्दल ....! तुझं आयुष्य तू खऱ्या अर्थाने जगलास ...ऐन कारकीर्दीच्या शिखरावर असताना 'ओशो ' कडे जाण्याचा तुझा निर्णय ...राजकारणात पदार्पण करून तीन वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम , बॉलीवूड मध्ये पुनरागमन करून आपल् अभिनय कौशल्य  साऱ्या जगाला सादर करणं....हे सर्व निर्णय खूप कठीण होते ...परंतु तुझ्या निर्णयावर तू जगलास ...आयुष्यात अनेक वादळ पचवून खरा 'हिरो ' ठरलास ..! आणि तरीही कोणत्याही 'वादग्रस्त' गोष्टीत न अडकता सर्वांचा लाडका 'विनोद खन्ना' झालास ..!
               आम्हाला माहीत होतं आम्हाला आवडणारा तरुण विनोद खन्ना दिसणार नव्हता ...परंतु अभिनयावर प्रेम करणारा कसदार कालावंत तुझ्या रूपाने जिवंत होता हे आमचा भाग्यच होतं...! आज तू नाहीस ...परंतु पडद्यावर आमच्यासाठी एक आनंदाची मेजवानी तू ठेवून निघून गेलायस...आणि हो , तुझ्या रूपाने कलाकारांना शिकण्यासाठी आणि आयुष्य परिपूर्ण कसं जगावं हे दाखवून ...तू EXIT घेतलीस ....तुझ्याच चित्रपटातून आम्ही शिकलो ....जिंदगी तो बेवफा है...   एक दिन ठुकरायेगी
                 मौत मेहबूबा ही अपने  साथ लेकर जायेगी ...
                 मर के जिने कि अदा को ,दुनिया को दिखालायेगा
                 वो 'मुकद्दर का सिकंदर' जानेमन कहलायेगा ...!

                                                  सुप्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...!
                                                              - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.
                 

1 comment:

  1. Great, Vinod khanna in acting,in spirituality, in politics, in Cancer hospital....everywhere a man fought with heart....lived....left legacy. Thanks Sanjivan I could see this personality in minute details because of U.

    ReplyDelete