Monday, April 3, 2017

"सेल्फ असेसमेंट"

नमस्कार ...!
"सेल्फ असेसमेंट" साठी जरा एक आठवडा जरा फेसबुक आणि Whatsup पासून दूर राहिलो. अनेक घडामोडी  माझ्या चाहत्यांना, रसिकांना आणि मित्रमंडळी ना सांगण्यासारख्या घडत होत्या ...'याल तर हसाल " चे कार्यक्रम , गुडीपाडवा वैगेरे अनेक गोष्टी ...! ३१ मार्च ला आपण सर्वजण ' आर्थिक असेसमेंट" करतो आणि त्यावर कर भरतो ...आणि हे सर्वाना कायद्याने करावेच लागते ...पण मनात एक विचार आला..कि कित्येक वर्ष आपण आपल्या  भावनांची, शरीराची , मनाची आत्म्याची आणि हो ..अर्थात आपल्या जीवनाची असेसमेंट केली आहे का ? याचं सर्वांचं उत्तर नाही च मिळेल ...माझ्याही मनात हा विचार आल्यानंतर मी शहारलो ...कारण  ...असा विचारच केला नाही ..किंवा असे करण्यासाठी वेळ च मिळाला नाही ..( कुणालाच वेळ नसतो आजकाल, आणि कशासाठीही वेळ  नसतो ...वेळ कुठे जातो हे सुद्धा न उमगणार कोडचं आहे ...) असो ..जीवन कोणत्या मार्गाने धावतंय ...स्पीड काय ? दिशा काय ? आणि हो धावण्याचं कारण काय ? काही माहिती नाही ...पळत सुटलोय ...तो पळतोय म्हणून मी हि ..त्याने स्पीड वाढवला ...मग मी हि वाढवणार ....जबरदस्त वेग ....2G , 3G,4G....रस्ते , हायवे , एक्स्प्रेस हायवे ..मोनो , मेट्रो ,बुलेट ट्रेन्स , .1000CC, 2000 CC, 3000CC ....अजून गाड्यांचे इंजिन मोठे होताहेत ...आणि हो या सर्व वेगात ..सर्वात वेगात धावतोय वेळ ! ...तो आपल्या पुढे पळतोय ...त्याला काबूत ठेवण्यासाठी ही स्पर्धा सुरु झालीय ...आणि या जीवघेण्या स्पर्धेत ...जगायचं विसरलोय आपण ..! निसर्गाची देणगी विसरलोय ...सुंदर आकाश , मस्त चांदण्या , शीतल चंद्र ..विशाल सागर , झाडे वेली ,वनराई .. पक्षांची किलबिल , गाई गुरे ,  ...हिरावून गेलंय सर्व ..! कितीतरी सुखं अजूनही आहेत या दुनियेत जी पैसे न मोजता सुद्धा घेता येतात , अनुभवता येतात ...! ( हजारो माणसे असतील कि दिवसभरात एकदाही आकाशात पाहत नसतील  ...त्याचं सौंदर्य नाहाळत नसतील ...आपणही कधी चांदण्याकडे पाहिलंय आठवा जरा ...! ) विषय एवढाच ...जीवनाच्या धकाधकीत ..जरा थांबा ...असेसमेंट करत राहा... वेळोवेळी ...आणि काहीतरी नवीन करत राहा ...आनंदी रहा आणि खऱ्या अर्थाने  समृद्ध व्हा  ..!
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

No comments:

Post a Comment