Wednesday, March 30, 2016

' याल तर हसाल ' चा होळी चा कार्यक्रम कोपर , भिवंडी


नमस्कार …!
या वर्षी ' याल तर हसाल ' चा होळी चा  कार्यक्रम कोपर , भिवंडी येथे संपन्न झाला. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात होळी असूनही रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ग्रामपंचायत कोपर आणि विशेषता साधनाताई घरत आणि त्यांचे सर्व सहकारी  यांनी या कार्यकम आयोजनासाठी खूप परिश्रम घेतले . सर्व रसिक श्रोत्यांचे मन:पूर्वक धन्यवाद … !
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

अखेर एक स्वप्न पूर्ण झालं …!

नमस्कार …!
अखेर एक स्वप्न पूर्ण झालं …! ' मला शिवाजी व्हायचंय …!' चा पहिला प्रयोग यशस्वीरीत्या , रसिकांच्या गर्दीत पार पडला. खूप वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे अतुल्य व्यक्तिमत्व सर्व तरुणांसमोर साकार करावं…. असे मनापासून वाटत होते. नाटक , पोवाडे , व्याख्याने , कादंबरी , चित्रपट इत्यादी अनेक माध्यमातून हा विषय अनेकांनी प्रभावीरीत्या जनतेसमोर ठेवला होता. परंतु एकपात्री संगीतमय कार्यक्रमातून हा विषय मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला. संकल्पना ते सादरीकरण या संपूर्ण जबाबदारी मध्ये माझी संपूर्ण टीम , रवीशेठ पाटील , एविएशन टीम , इंनोव्हेटीव ग्रुप , मित्रमंडळी , हितचिंतक , आयोजक - ग्रामस्थ मंडळ वहाळ , या सर्वानीच प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम सादर करायला मला बळ दिले . रसिक प्रेक्षकांच्या प्रोत्साहनामुळेच मी हे करू शकलो याची जाणीव मला आहे …सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ….!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Monday, March 28, 2016

वहाळ ग्रामपंचायतीचे मन:पूर्वक अभिनंदन …!

नमस्कार … !
'मला शिवाजी व्हायचय …!' चा पहिला प्रयोग 'वहाळ  ग्रामपंचायत' यांनी आयोजित केलेल्या भव्य शिवजयंती उत्सवात संपन्न झाला . संपूर्ण तालुक्यात  एक वेगळी आणि भव्य स्वरुपात शिवजयंती आयोजित करून वहाळ ग्रामपंचायतीने  एक नवीन आदर्श घालून दिला. भव्य मिरवणूक , छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण, गुणवंतांचा सत्कार तसेच पंचक्रोशीतील विधवा महिलांना आर्थिक मदत हा नवीन स्तुत्य सामाजिक उपक्रम…. ! तसेच शिवाजी महाराजांचे चरित्र घरोघरी पोहोचावे म्हणून प्रशांत  देशमुख यांचे व्याख्यान , शिवशाहीर वैभव घरत यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आणि समारोपाला 'संजीवन मार्ग निर्मित 'मला शिवाजी व्हायचंय …ह संगीतमय कार्यक्रम …! दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये चाललेल्या या दैदिप्यमान सोहळ्याने सर्व नागरिक , तरुण , आबालवृद्ध  प्रभावित झाले .श्री . राजेंद्र पाटील , श्री रवीशेठ पाटील , श्री बाळाराम पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी , वहाळ  ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या अपार मेहनतीने हा सोहळा पार पडला . आम्हा सर्व कलाकारांचा सत्कार झाला …माझे  सर्व सहकारी खूप भारावून गेले ….!  वहाळ  ग्रामपंचायतीचे मन:पूर्वक अभिनंदन …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . 

Saturday, March 26, 2016

'मला शिवाजी व्हायचय … !' चा पहिला प्रयोग शिवजयंती च्या निमित्ताने वहाळ , पनवेल

नमस्कार …!
गेली तीन चार वर्ष मनात खूप इच्छा होती कि छत्रपति शिवाजी महाराजांवर कार्यक्रम करावा आणि महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आजच्या तरुणांना माहित करून द्यावा. आज ती इच्छा पूर्ण होतेय … 'मला शिवाजी व्हायचय … !' चा पहिला प्रयोग शिवजयंती च्या निमित्ताने वहाळ , पनवेल येथे आज संध्याकाळी सादर होतोय … एक नवीन सुरुवात करतोय … माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा दिवस आहे. आपला आशीर्वाद आणि शुभेच्छा ची खूप आवश्यकता आहे …सोबत 'याल तर हसाल ' चा धुमधडाका सुरूच आहे …! हा प्रयोग सुद्धा माझ्या रसिक प्रेक्षकांना अर्पण …! आयोजक वहाळ ग्रामपंचायत , श्री रवीशेठ पाटील आणि राजेंद्र पाटील आणि सहकार्यांचे मन:पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा - हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Tuesday, March 22, 2016

पहिली परदेश वारी …. !


नमस्कार …!
पहिल्या परदेश वारीचं प्रत्येकालाच अप्रूप असतं … तसं मलाही होतं …! पण 'कलाकार' म्हणून तुमचं विमानतळावर कुणीतरी स्वागत करतं … ते ही परदेशात …. हा खूप मोठा सुखद धक्काच …! माझे "पूजा हॉलिडेज " मधील पार्टनर श्री. सुधीर हुलगे यांनी माझ्यासाठी खूप आरामदायी अशी सफर आयोजित केली. त्यांचा या व्यवसायातील अनुभव अत्यंत दांडगा आणि थायलंड , मलेशिया आणि सिंगापूर आणि इतर आशियाई देशांमध्ये नेटवर्क सुद्धा जबरदस्त आहे. टुरिझम च्या क्षेत्रात आपली लोक तसे फार कमीच …परन्तु सर्वात जास्त पर्यटनाची आवड मात्र आपल्याच लोकांमध्ये आढळते . या सर्वाना आपुलकीने आणि त्यांच्या खर्चाचा योग्य मोबदला देत उत्तम सहलीचा आनद देत यावा म्हणून 'इनोव्हेटीव ग्रुप' आणि 'संजीवन मार्ग' यांनी एकत्र येउन आपल्यासाठी विशेष सहलीचे आयोजन केल आहे. निसर्गाची नवलाई , वेगळ्या भाषा , संस्कृती , समुद्र, पर्यटकांसाठी केलेले विशेष आयोजन … आणि अशा कितीतरी गोष्टी … हे सर्व जरूर पाहण्यासारखे आहे …अनुभवण्यासारखे आहे … !
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Monday, March 21, 2016

नवी दिशा…. नवी आशा …!

नमस्कार …!
'थायलंड आणि मलेशिया ' या देशांची यशस्वी 'बिझिनेस टूर ' करून परतल्यानंतर मी 'इनोव्हेटीव ग्रुप ' आणि 'संजीवन मार्ग ' यांच्या समन्वयातून 'टुरिझम , सिनेमा आणि हेल्थ अवेरनेस ' या क्ष्रेत्रात  व्यावसायिक रित्या उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ' संजीवन मार्ग ' च्या माध्यमातून विविध रंगमंचावरील कार्यक्रम , व्याख्याने, कॉर्पोरेट ट्रेनिंग, Logistics  आणि एविएशन या सर्वांमध्ये राहून या नवीन क्षेत्रात पदार्पण करत आहे. आपण  नेहमीच एक मित्र हितचिंतक , मार्गदर्शक , चाहते म्हणून मला सर्वतोपरी मदत करता आणि प्रोत्साहन हि देता. आपल्या शुभेच्छांची, आशीर्वाद आणि मार्गदर्शनाची गरज वेळोवेळी लागणार आहेच. संजीवन मार्ग च्या माध्यमातून 'सभेत कसे बोलावे' प्रशिक्षण सुरु झाले आहे, 'मला शिवाजी व्हायचंय। ! हा रंगमंचावरील कार्यक्रम येत्या २६ तारखेला सुरु होतोय. तसेच ' पूजा holidays' च्या माध्यमातून दक्षिण आशियातील थायलंड , मलेशिया , सिंगापूर इत्यादी सर्व देशांमध्ये सहली सुरु करतोय ….नवी मुंबई सिनेमाच्या माध्यमातून लवकरच एक मराठी चित्रपट करतोय … अनेक उपक्रम आहेत … वेळोवेळी विविध माध्यमातून आपल्याशी संवाद आहेच… असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Sunday, March 20, 2016

'याल तर हसाल ' पेण , दादर कार्यक्रम - १७ मार्च २०१६


नमस्कार..!
 ' याल तर हसाल ' च्या पेण दादर मधील कार्यक्रमाला नेहमीसारखीच तुफान गर्दी...प्रचंड उत्साह , हशा आणि टाळ्या...!  पेण तालुक्यातील कोणत्याही कार्यक्रमाला रसिकांचा असाच उत्साह असतो हालौकिक इथेही कायम राहिला...! आयोजकांचे , रसिकांचे मन:पूर्वक धन्यवाद...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार  संजीवन म्हात्रे