Saturday, November 9, 2019

राजकारण 2019

तुम्ही करा खेळ 
        राजकारणांचे
आणि लपेटून घ्या पांघरून
        समाजकारणांची ..! 
द्या तिलांजली सद्गगुणांना
         सत्ताकरणासाठी ..!
आणि एकच मंत्र जपा, माफ असतं,
सर्व काही, प्रेमात , लढाईत 
          आणि राजकारणात ..!! 
तुमच्यामुळे राजकारण शिजू लागलंय
घरात, ऑफिसात, शाळेत...कुठेही ..!! 
कळप, टोळ्या , गट, संघटना ,पक्ष स्थापन होताहेत 
            स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी .. 
पूर्वी सुद्धा लढाया सत्तेसाठीच होत्या ...
आणि आताही सत्तेसाठीच आहेत ..! 
 चांगलं आहे ...
तलवारच्या ऐवजी लेखणी 
भाल्याच्या ऐवजी भाषणं..!! 
आणि आहेत , 
सोशल मीडियावरील भालदार, चोपदार..! 
तुम्ही घ्या सत्तेनंतर ..
गाड्या , बंगले , सगळे ऐशोआराम , अगदी विमानसुद्धा 
बळकवा जमिनी समुद्र मोठमोठाले कारखाने ..!! 
पण एक करा ...
शेतकऱ्याला न्याय द्या 
भ्रष्टाचाराच्या उरावर पाय द्या 
दहशतवाद्यांना तोडा
जातीयवादाला गाडा
माणुसकीला जोडा
कट्टरतेला सोडा
हातांना काम, प्रमाणिकपणाला इनाम, 
खोट्याना लगाम आणि सैनिकांना सलाम द्या ..!! आणि मग राजकारणाचे कितीही भोंगे वाजवा...
आम्ही सहन करू ..!! 
संजीवन म्हात्रे 
10 नोव्हेंबर 2019 

20 comments:

  1. अर्थपूर्ण आणि वास्तववादी काव्य!

    ReplyDelete
  2. Kya bath hai Sir, perfect for present situation ����

    ReplyDelete
  3. सुंदर , वैचारिक , चिंतनीय कविता

    ReplyDelete
  4. सध्याच्या विदारक अशा राजकीय परिस्थितीवर ज्वलंत भाष्य....

    ReplyDelete
  5. सध्याच्या विदारक अशा राजकीय परिस्थितीवर ज्वलंत भाष्य....

    ReplyDelete
  6. ज्वलंत लिखाण .......
    आपण कितीही लिहू,कितीही टाहो फोडू पण गेंड्यांची कातडी पांघरलेला राजकारण्यांना ताच काहीही नाही . हीच खंत ...

    ReplyDelete
  7. क्या बात है संजीवन दादा! खरं लिहिणारे हात कमी झालेत, वास्तव आणि भिडणारं..

    ReplyDelete
  8. प्रत्येकाच्या मनातील भावना आपण व्यक्त केल्या🙏🙏

    ReplyDelete