Tuesday, August 25, 2015

"याल तर हसाल " विष्णुदास भावे शो - हाउसफुल्ल ..!


नमस्कार ..! 
" याल तर हसाल " चा विष्णुदास भावे मधील पहिलाच शो हाउसफुल ..! सर्व रसिक प्रेक्षक, श्रोते, मित्रमंडळी आणि मान्यवरांचे मन:पूर्वक धन्यवाद ..! नवी मुंबईकरांनी 'याल तर हसाल' चे जल्लोषात स्वागत केले .. त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत ..! श्री रवीशेठ पाटील ( वहाळ ) , मनोज म्हात्रे , निलेश पाटील ( म्हात्रे & पाटील असोसीएटस ) , बी.ए.पाटील ( घणसोली ), मंगेश म्हात्रे,  रवी मढवी , महेंद्र दळवी ( दिवा ) , सुरज भगत ( शेलघर ) , अनिल ठाकूर (जसखार ). संजीव पाटील ( मोरावे ) , भूपेश म्हात्रे ( कोपर ) , सुनील म्हात्रे ( करावे )  आणि माझे अनेक मित्रमंडळी यांनी अपर मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी श्री दिनेश पाटील ( विश्वस्त जे.एन.पी.टी. ), संतोष चौधरी ( दादुस ) , पी .सी .पाटील ( अध्यक्ष ज्ञान विकास संस्था , कोपरखैरणे ) नंदकुमार म्हात्रे ( मांडवाचे मंगारी ) अशा मान्यवरांनी कार्यक्रमाला शोभा आणली.  सर्वांचे म:पूर्वक धन्यवाद ...! ज्या पद्धतीने रसिकांनी कार्यक्रमाला गर्दी केली ....दाद दिली ...आम्हा कलाकारांचे कौतुक केले ...सर्व रसिकांना आमचे लाख लाख सलाम...!  हे सर्व रसिकांमुळेच आम्ही करू शकलो ...या यशाचे मानकरी माझे रसिक प्रेक्षकच ...!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार  संजीवन म्हात्रे 

Friday, August 14, 2015

"याल तर हसाल " विष्णुदास भावे - पहिला प्रयोग - १५ ऑगस्ट २०१५

नमस्कार ..!
                  खूप वर्षापसून इच्छा होती ..विष्णुदास ला प्रयोग करण्याची ..! 'याल तर हसाल' जेव्हा सुरु केला तेव्हापासून ,,हे स्वप्न पाहिलं ..! नाटक बघायला ज्यावेळी विष्णुदास भावे नाट्यगृहात  जायचो त्यावेळी मला स्वतःला रंगमंचावर बघायचो . आपल्या स्वत;च्या नाटकाचा banner इतर मोठ्या नाटकांच्या रांगेत बघायचो .. .स्वप्नच वाटायचं त्यावेळी ..!  पण आज माझ्या रसिकांच्या, श्रोत्यांच्या आणि मित्रमंडळी यांच्या  कृपेने आज इथपर्यंत येऊन पोहोचलो. आज ५२१ व्या प्रयोगापर्यंत आल्यानंतर कार्यक्रमच काही अप्रूप वाटत  नाही पण रंगमंचाच जरूर आहे ..! व्यावसायिक रंगभूमीवर यायचं काही ठरविलं नव्हत पण हौशी कलाकार म्हणून कार्यक्रम करता करता व्यावसायिक रंगभूमीवर कधी आलो कळलच नाही ...!
                 हे श्रेय वरवर माझे दिसत असले तरी यामध्ये अनेक लोकांचा वाटा आहे. खरं म्हणजे तेच या सर्व माझ्या यशाचे शिल्पकार आहेत. मी केवळ निमित्त मात्र आहे, असे प्रामाणिकपणे मला वाटते.  या कार्यक्रमाचे सर्व कलाकार , निर्माते श्री शेखर म्हात्रे , या कार्यक्रमाचे आधारस्तंभ श्री. रवीशेठ पाटील , माझे मित्र मनोज म्हात्रे आणि निलेश पाटील ( म्हात्रे & पाटील असोसिएट्स ) , रवी मढवी, महेंद्र दळवी ( दिवा ),  बी. ए. पाटील ( घणसोली ) , अनिल भोईर (जसखार), ह्रीशिकेश ठाकूर , सुरज भगत ( शेलघर ) अशी अनेक नावे सांगता येतील. आज हे लिहिताना तिकीट खिडकीचा रिपोर्ट सुद्धा एकदम जबरदस्त आहे. शो हाउसफुल होण्याच्या मार्गावर आहे .        
आयुष्यात आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याची संधी परमेश्वर देतोय ...सर्वांचे मनापासून धन्यवाद ..! अजून अनेक नाट्यगृहे आहेत, वेगवेगळे प्रयोग आहेत ...सर्व रसिकांचे आशीर्वाद आणि सहकार्य असल्यावर  काहीही अशक्य नाही ...!
संजीवन म्हात्रे . १५ ऑगस्ट २०१५ , सकाळी ६:२३ वाजता.


Monday, July 27, 2015

नमस्कार ...!'
माझ्या " बाल्या गारी हलू चालव , चिंता कर आस बाप्पासशी " या ओळी अनेक टेम्पो च्या मागे अपघात विषयी जनजागृती करण्यासाठी अनेक चाहत्यांनी लिहिल्या होत्या. आता माझं आणखी एक गाणं " आई बाप्पासशी वळवतान बोबरी, हि पोरा पोरींची लफरी " हे whatsup वर status म्हणून गाजतंय ..! रसिक आणि चाहत्यांचे मन:पूर्वक धन्यवाद ..!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, July 20, 2015

खंत ...!


खंत ...!

                                 दु:खात एक आशा
                                        येईल सुख कधीतरी 
                                               सुखात एक निराशा 
                                                       येईल दु:ख कधीतरी 
                                                               या कधीतरी ला नसतो अंत 
                                                                       हीच तर मानवाच्या जीवनाची खंत ....!
                                                                                       संजीवन म्हात्रे .

Saturday, June 20, 2015

घाई आणि हातघाई ..!

                     
  आजकाल कुणाला वेळच नाही. प्रत्येकजण पळतोय ....प्रत्येकाला घाई आहे... कुठेतरी पोहोचण्याची...कुठे पोहोचायचं हे माहित नाही. पण फक्त पळत राहायचं ...सारखा पळत राहायचं...जो जास्त पळेल तो पुढे जातो...मग आपण आपला वेग वाढवायचा ...त्याच्या पुढे जायचं ...मग तो वाढवतो...आपल्यापुढे निघून जातो ...मग आपण काहीतरी नवीन कारवाया करून ..शर्यत जिंकायचीच ...जोरात पळायचं...  जीवघेणं पळायचं...आणि मग कुठेतरी अपघात हा ठरलेलाच आहे...तो झाला कि बाकीचे थबकतात  ...थांबतात ...भांबावून जातात ...पण मग इतर पुढे गेलेले बघून...पळणं अपरिहार्य समजून पुन्हा शर्यतीत सामील होतात ....जीवनाचा प्रवास पूर्ण होतो ...पण जगणे राहूनच जातं...!!
                                रोजची वर्तमानपत्र उघडून पहा...हजारो अपघात ..मोटारसाइकलचे अपघात...कार चे अपघात, मोठ्या गाड्यांचे अपघात, कोण रेल्वेखाली सापडलं , ...हजारो घटना रोज आपण पाहतो ...कधीतरी आपण सुद्धा याचे शिकार होऊ याची साधी कल्पना सुद्धा आपल्याला शिवत नाही ...आपण रोज त्याच रस्त्यावरून येतो....जिथे अपघात घडतात ..आपण रोज तेच करतो...जे अपघात झालं त्यांनी केलं..पण आज त्यांच्या जीवावर बेतल ..उद्या आपलाही जीव यात जाऊ शकतो....स्वत;च्या चुकीने नाही तर इतरांच्या बेजबाबदार वृत्तीने आपण मारू शकतो याचा साधा विचार हि आपल्याला कधी शिवत नाही ...आपल्याला फक्त एकाच गोष्ट असते ...सकाळ, दुपार, संध्याकाळ , रात्र आणि ती म्हणजे घाई , घाई....आणि  घाई....काम , काम आणि काम.....!!
                               त्यामुळे जीवनात आनंदाचे क्षण येताच नाही ...आले तरी ते समजत नाहीत, जाणवत नाहीत , आणि समजले तरी ते उपभोगता येत नाहीत ..कारण आपल्याला वेळच  नसतो ...मग एवढी क्षणाक्षणाला घाईत असलेली माणसे करतात तरी काय..? यांचा वेळ कुठे जातो ? का सतत मानसं एकमेकांवर उखडलेली , चिडलेली , वैतागलेली , जळलेली ...काय कारण असेल याचं ? उत्तर सोप्पं आहे अगदी ...आपण आनंदी नसल्यामुळे आपण कुणाला आनंदी बघू शकत नाही ...आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण कुणाला आरामात बसलेला बघू शकत नाही...आपल्याला सन्मान मिळत नसल्यामुळे आपण कुणाला सन्मान देत नाही....आपण सुखी नाही तर कुणाला सुखी बघायचं नाही...आणि त्याला जर काही सुखाचे क्षण मिळू द्यायचे नाही ...या वृत्तीमुळे ..स्पर्धा सुरु आहे.....स्पर्धेला वेग आहे ...वेगळा अपघात ...आणि अपघातात पडताहेत हजारो लोकांचे बळी ...!!

हे सर्व थांबले पाहिजे...!! हे थांबविण्याचे अनेक चांगले मार्ग उपलब्ध आहेत ,...आपण याचा शोध घ्यायला हवा ...थांबलो तर किर्र अंधारात सुद्धा हळू हळू दिसायला लागत नाही का ...?
संजीवन म्हात्रे ..!