Thursday, May 19, 2016

'संकलन स्टुडीओ '

नमस्कार …!
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने अनेक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट करतोय. त्याचाच एक भाग म्हणून ओशिवरा येथील 'संकलन स्टुडीओ ' मध्ये गाणं रेकॉर्ड होतेय . लवकरच हा प्रोजेक्ट सुद्धा मार्गी लागेल. वेळोवेळी आपल्याला सांगत असतोच काही नवीन असेल तर …आपन सर्व जण सोबत आहातच … सध्या 'याल तर हसाल ' च्या ६०० व्या प्रयोगाचे वेध लागलेत . आपण नेहमीच भरभरून प्रतिसाद देत असता , यापुढेही आपण असेच कौतुक कराल हीच अपेक्षा आणि खात्री सुद्धा …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Wednesday, May 18, 2016

मे महिन्याचा उत्तरार्ध सुरु आहे

नमस्कार …!
मे महिन्याचा उत्तरार्ध सुरु आहे … उन 'मी ' म्हणतंय … सकाळी १० वाजल्यानंतर बाहेर जाणं जिकिरीच झालय … अंगाची काहिली होतेय … उष्णतेने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळालेय … अशा वेळी समुद्रात , नदीत , तलावात , डुंबायला मिळालं तर …! फक्त आठवणीनेच बरं वाटलं ना … आयुष्याचं पण असच आहे … जेव्हा सर्व बाजूनी दु:ख , समस्या तुम्हाला घेराव घालतात … दु:खाचं रणरणत उन सुरु होतं …तेव्हा सुखाचे पावसाळे आठवायचे … मस्त सुखातील क्षण आठवायचे … आठवणींचा उपयोग यासाठीच तर करायचा असतो …वाइट आठवणीना 'डिलीट ' मारून … चांगल्या क्षणांना 'स्पेस' द्यायचा असतो … ! असो … थोड्याच दिवसात मस्त पावसाला सुरुवात होईल अशी आशा करू या …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Monday, May 16, 2016

दि. १५ मे २०१६ -तुर्भे , नवी मुंबई …'याल तर हसाल '

नमस्कार …!
दि. १५ मे २०१६ -तुर्भे , नवी मुंबई …'याल तर हसाल ' चा ५९८ वा कार्यक्रम धम्माल साजरा झाला. रसिकांची तुडुंब गर्दी आणि मान्यवरांची उपस्थिती … सलमान खान च्या ' चिल्लर पार्टी ' या चित्रपटाचे कथालेखक प्रेमकुमार शर्मा , के. सी. बोकाडिया यांचे दिग्दर्शनातील शिष्य आणि अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक सुनीत कुमावत, आणखी एक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक डॉ. सैफ , इस्माईल दरबार यांच्या बरोबर संगीत क्षेत्रात काम केलेलं साहीर सुलतानपुरी असे अनेक मान्यवर हजर होते. कार्यक्रम करताना खूप मजा आली. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Saturday, May 14, 2016

कुसुम्बळे ( अलिबाग ) येथे जिल्हास्तरीय नृत्यस्पर्धा

नमस्कार … !
दि. ६ मे २०१६ - कुसुम्बळे ( अलिबाग ) येथे जिल्हास्तरीय नृत्यस्पर्धेत सतत सहा वर्षे नेहमीच 'सेलेब्रिटी गेस्ट ' म्हणून हजेरी लावतो. या वर्षी सुद्धा अत्यंत रंगलेल्या अशा नृत्यस्पर्धेत कार्यक्रम सादर करताना खूप आनंद वाटला. श्री. व सौ . खरसांबळे या स्पर्धेसाठी खूप मेहनत करतात. प्रत्येकी वर्षी काहीतरी नवीन कराव अशी त्यांची नेहमीच धडपड सुरु असते. सर्व कलाकारांना एक चांगला 'स्टेज' या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध होतेय . सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद … !!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Friday, May 6, 2016

याल तर हसाल ' गडब ता. पेण ३ मे २०१६


नमस्कार …!
' याल तर हसाल ' चा कार्यक्रम …रसिकांची तुडुंब गर्दी ... २;३० तास हास्याचा धबधबा …. हे समीकरण नेहमीचेच …! गडब ता. पेण येथील ३ मे २०१६ चा कार्यक्रम याला अपवाद नव्हता …मस्त धम्माल आली कार्यक्रम करताना … रसिकांच्या फर्माईश ने तर कार्यक्रमाला आणखी उत्स्फूर्तता आली . सर्वांचे मन :पूर्वक धन्यवाद …!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Tuesday, May 3, 2016

'Certificate Distribution ceremony' - Panamax Institute of Logistics & Shipping

Namaskar ..!
Panamax Institute of Logistics & Shipping celebrates the 'Certificate Distribution ceremony' to honor the Diploma holders of the Institute. They worked very hard and 'all set' to enter into the logistics industry. Wishing ' All the best ' to them. Me and whole Staff of Panamax Institute is always with you ..! Many thanks to Suraj Bhagat & Shubhangi thakur that they did a splendid Job. Till date we have produced 400 + graduates in the logistics & supply chain management industry.
Thanks to all ...!
- Hasyprabodhankar Sanjeevan mhatre.

Monday, May 2, 2016

First Time facing Cine - Camera


नमस्कार … !
सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द सिनेमटोग्राफर श्री . सुधीर  हुलगे आणि सुप्रसिद्ध छायाचित्रकार विजय तस्वीर यांच्यामुळे पहिल्यांदाच चेहऱ्याला रंग लावून कॅमेऱ्या समोर उभा राहिलो … आणि स्वत:ला पाहून माझा विश्वासच बसेना …हे फोटो माझेच आहेत का ? असाच विचार मनात आला … माझ्या रसिक प्रेक्षक , चाहते , हितचिंतक आणि मित्रमंडळी साठी काही फोटो शेअर करत आहे.
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.