Wednesday, January 18, 2017

१. झाडे लावा , झाडे जगवा ...!

 १. झाडे लावा , झाडे जगवा ...!

झाडे लावा झाडे जगवा, खूप दिवस वाचत आहे
एवढी वर्ष  का नाही सुचलं, हाच प्रश्न जाचत आहे ...!

एवढी वर्ष 'वृक्षारोपण ' पुढाऱ्यांच्या हस्ते होत होते
सामाजिक वनीकरण फक्य कागदावरती रुजत होते
दुष्काळाने आता जेव्हा पुरती कसर काढली
तेव्हा आम्हाला सगळ्याना झाडे वेली दिसली
हिरवा रंग हळू हळू मागे मागे सरत आहे ....
एवढी वर्ष  का नाही सुचलं, हाच प्रश्न जाचत आहे ...!

वस्त्या , अत्याधुनिक शहरे , नित्यनेमाने वसत गेली
निसर्गाचे देखावे हळू हळू पुसत गेली
प्रवासात कुठेही जा , शहरे आता संपत नाहीत
मानवाने निसर्गाला लुटले ,कुठेही आता लपत नाही
किडा , मुंगी, पशु, पक्षी कुणालाही आम्ही सोडलं नाही
एक तरी जागा दाखवा जिथलं झाड आम्ही तोडलं नाही
नदी, नाले, धरण -बिरण सर्व काही आटत आहे ...
एवढी वर्ष  का नाही सुचलं, हाच प्रश्न जाचत आहे ...!

नदी , नाले , झरे जाऊन गटारांचं 'SANITESHAN' झालं
फोरेस्ट , बिरेस्ट, एन ए करून सात बाराच VERIFICATION झालं
करोडोंची सॉलिड टाउनशीप याचं मस्त PRESENTATION झालं
नेते, बिल्डर, कारखानदार , व्यापारी सगळ्याचं COLABORATION झालं
निसर्गाला जगवायला पाहिजे यांना अजून कसे सुचत नाही
पांघरलेल्या गेंड्याच्या कातडीला पाझर कसा फुटत नाही
दिवसेन दिवस सारखा सारखा प्राणवायू आटत आहे
एवढी वर्ष  का नाही सुचलं, हाच प्रश्न जाचत आहे ...!
                                                                -  हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.


1 comment: